Site icon InMarathi

चिकन बिर्याणी खा किंवा वाट्टेल तेवढं तूप, ही एक गोष्ट तुमचं वजन ठेवेल आटोक्यात!

bhagyashree mote featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस नावाचा प्राणी हा केवळ एक यंत्र बनून राहिला आहे. चाकोरीबद्ध आयुष्यात तेच तेच काम , तीच रोजची रटाळ कहाणी या सगळ्यांनी तो त्रस्त झालेला दिसतो.

रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात जमेल तसा शारीरिक व्यायाम हा शांत सुदृढ आणि संयमी जीवन जगण्याचा ट्रिगर पॉइंट ठरू शकतो. आजकाल आपल्याला सगळे हवे तेव्हा, हवे तसे, हवे त्या वेळेला मिळते, मिळत नाही तो फक्त वेळ.

 

 

आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत असा जबरदस्त उपाय ज्याने आपली तब्येत ठणठणीत ठेऊ शकतो आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी आपण प्रेरित होऊ शकतो. ऑफिस अपार्टमेंट्स, मोठ मोठाल्या इमारती यांच्या मध्ये लिफ्ट किंवा एस्केलेटरयांच्या सोबतच पायर्‍या देखील उपलब्ध असतात.

तुमच्या दिवसभराच्या ओढाताणीमध्ये अतिरिक्त पावले जोडण्याचा आणि तुमचा फिटनेस स्तर सुधारण्याचा एक अतिशय उत्कृष्ट मार्ग म्हणजे पायऱ्या चढणे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लिफ्ट किंवा एस्केलेटर च्या वापराएवजी शक्य असेल तेव्हा जिन्याचा वापर करा. उपलब्ध पायर्‍या चढणे हा कामाच्या दिवसात किंवा घरी काही मिनिटांच्या अॅक्टिव्हिटीमध्ये बसण्याचा आणि आरोग्यदायी फायदे मिळवण्याचा उत्तम राजमार्ग आहे.

बर्‍याच लोकांना दिवस दिवस एकाच जागी बसून काम करावे लागते, बरेचदा तर व्यायाम करायला थोडा सुद्धा वेळ काढणे दुरापास्त होऊन जाते, अशा वेळी जमेल तसे पायर्‍या चढणे व उतरणे हा व्यायाम स्नायू, हाडे, हृदय आणि एकूणच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

 

 

व्यस्त दिवसातही, आपण आपल्यारोजच्या जीवनात हालचालींचे प्रमाण वाढवून आपल्या शरीरास मदत करू शकता. मॅकमास्टर युनिव्हर्सिटी च्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासपत्रात असे निदर्शनास आले आहे की “मध्यम” ते “जोमदार” लेवलच्या पायऱ्या चढण्याच्या रोजच्या व्यायामाने हृदयविकारापासून बचाव होतो आणि शरीराच्या खालच्या म्हणजे पायाकडील स्नायूंचा विकास होतो.

रोजच्या रोज तुमच्या दिवसात अगदी थोड्या प्रमाणात पायर्‍या चढणेदेखील तुमच्या आयुष्याला उत्तम कलाटणी देऊ शकते. पायऱ्या चढण्यासाठी काही चांगली कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१. जिना चढणे तुमच्या हृदयासाठी चांगले आहे :

 

 

पायऱ्या चढल्याने तुमचे हृदय उत्तम प्रकारे पंपिंग होते.ज्यामुळे उच्च रक्तदाबापासून तुमचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते . मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य पायर्‍या चढल्याने कमी करता येते.

प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये २००० साली प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पायऱ्या चढण्याने तुमच्या रक्तातील उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज ७ मिनिटे जिने चढल्याने हृदयविकाराचा धोका १० वर्षांपेक्षा अर्धा कमी होतो.

२. यामुळे स्नायूंची ताकद, हाडांची घनता आणि सांधे लवचिकता सुधारते :

 

 

जेव्हा तुम्ही पायऱ्या चढणे या व्यायाम प्रकाराला अग्रक्रम देता , तेव्हा तुम्ही तुमचे पाय, पोट, पाठ आणि हात यांचे स्नायू वापरता. या प्रकारचा व्यायाम पोटाच्या स्नायूंना टोन करतो. पाय, मांडी आणि नितंब यांच्या स्नायूंची ताकद वाढते.

पायऱ्या चढल्याने खालच्या शरीरात स्नायू बळकट होण्यास मदत होते. हे विशेषतः स्त्रियांसाठी महत्वाचे आहे, ज्यांना ऑस्टियोपोरोसिस होण्याची अधिक शक्यता असते.

३. जॉगिंगपेक्षा जास्त कॅलरी बर्न करते :

 

businesslist.com.ng

 

पायऱ्या चढून तुम्ही एका मिनिटात ५-११ कॅलरीज बर्न करू शकता. हे फारसे वाटणार नाही, परंतु ते कालांतराने काही मोठ्या कॅलरी बर्न करते, जे तुमचे वजन कमी करण्यास किंवा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. तुम्ही लिफ्ट घेण्यापेक्षा सुमारे ७ पट जास्त ऊर्जा वापरता.

४. हे एक उत्तम तणाव निवारक आहे :

 

कामाच्या ठिकाणी प्रचंड तणावाखाली काम करत आहात का? पायऱ्या चढून किंवा खाली उतरून तुमचा काही ताण कमी करू शकता. हा व्यायाम प्रकार तुम्हाला मानसिक दृष्ट्या शांत होण्यास मदत करेल.

५. सहजा सहजी उपलब्ध होणारे :

 

 

तुम्हाला अनेक ठिकाणी पायऱ्या सापडतील – ऑफिस, बँका, घर, कामाचे ठिकाण मॉल अशा अनेक ठिकाणी तुम्हाला अगदी सहज पायर्‍या उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे काही मिनिटांत पायऱ्या चढून पोहोचू शकता.

६. वजन कमी करण्यासाठी :

 

 

फर्स्टपोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, तासभर पायऱ्या चढणे-उतरणे हा अतिशय तीव्र व्यायाम प्रकार असून याचे अतिशय प्रचंड आणि लवकर रिजल्ट देणारे एरोबिक फायदे आहेत.

एक पायरी चढताना तुम्ही सुमारे ०.१७ कॅलरीज आणि एक पायरी उतरताना ०.०५ कॅलरी जाळू शकता. तुम्ही दररोज किमान अर्धा तास अशाचप्रकारे पायऱ्या चढून वर-खाली जात असाल तर तुमच्या कॅलरीज बर्‍याच प्रमाणात बर्न होतात. त्यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.

७. चांगली झोप :

 

 

तुम्ही झोप न येण्याने त्रस्त असाल तर काही दिवस पायऱ्या चढायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या जास्त थकलेले असता,आणि जास्त शारीरिक हालचाली करता, तेव्हा मग झोपही गाढ आणि चांगली लागते.

८. हाडे मजबूत होतात :

 

 

रोज पायऱ्या चढण्या-उतरण्याचा व्यायाम केल्याने हाडांमध्ये होणार्‍या वेदना कमी होतात, त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी आणि हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांच्या सेवनासोबत १५ मिनिटे पायऱ्या चढण्याचा व्यायाम केल्यास सांधे लवचिक होतात,

९. मधुमेह :

 

 

तुम्हाला टाईप-२ मधुमेह असेल तर जेवणानंतर काही मिनिटे पायऱ्या चढा,फायदा होईल. मधुमेहापासून लांब राहण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार समजला जातो. . पायऱ्या चढून चयापचय वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version