आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दारूची नशा वाईटच मात्र वाईटातूनही कधी कधी चांगलं होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या गाजत असणार्या RRR मधील खलनायक.गव्हर्नर स्कॉटचं पात्र सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे.
अत्यंत क्रूर असं हे पात्र प्रेक्षकांच्या मनात चीड निर्मांण करत असून ही या अभिनेत्याच्या कामाची एक प्रकारे पावतीच म्हणली पाहिजे. पडद्यावर कमी सीन असले तरिही हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात रहात आहे.
समोरच्यावर गोळी न झाडणार्या गव्हरर्नर स्कॉट हे दयेपोटी करत नाही तर समोरच्या शत्रूसाठी आपली एक गोळीही वाया घालवू द्यायची नाही, समोरच्याची तितकी लायकीच असत नाही असं त्याचं तत्वज्ञान आहे. मोजक्या सीनमधेही छाप पाडून जाणारी ही भूमिका साकार केली आहे,स्टीव्हन्सननं.
२५ मार्च १९६४ साली आर्यलंडमधे जन्मलेल्या रे स्टिव्हन्सननं चित्रपटात प्रवेश कसा केला याची अजब कहाणी आहे. स्टिव्हन्सनचे वडिल युनायटेड किंगडम एअरफ़ोर्समधे पायलट होते. त्याची आई आयरिश होती. स्टिव्हन्सनला दोन भाऊही आहेत. ही तिनही मुलं जेव्हा कळत्या वयात आली तेव्हा जसं इतर चार घरात सांगतात तसंच त्यांना एक करियर निवडण्यास सांगण्यात आलं. त्याच्या वडिलांचं मत होतं की एकतर तुम्ही करियर निवडा अन्यथा करियर तुम्हाला निवडेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
- ऑस्कर सोहळ्यातल्या विल स्मिथच्या वर्तणूकीमागे ‘ही’ कारणं असू शकतात!
- जेव्हा हॉलिवूडचा सुपरस्टार हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे स्वतःच्या मुलाचं श्राद्ध घालतो!
–
मुलांच्या भविष्याचा विचार करुन हे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरीत झालं. इथूनच स्टिव्हन्सनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. स्टिव्हन्सन त्यावेळेस अवघा आठ वर्षांचा होता मात्र या लहान वयातच त्याला अभिनयाची ओढ निर्माण झाली आणि ही ओढ निर्माण होण्याचं कारण होतं, सॅटर्डे मॉर्निंग पिक्चर शो.
कामावर जाणारे पालक आपल्या मुलांना याठिकाणी सोडून जात असत आणि मुलं अक्षरश: दिवसभर विविध चित्रपट बघत असत. स्टिव्हन्सन सांगतात की त्यांनी या ठिकाणी अगदी हर तर्हेचे चित्र्पट पाहिले.
कृष्णधवल ते रंगीत आणि ए पासून बी ग्रेड पर्यंत. या चित्रपटांना लहानग्या स्टिव्ह्जन्सनला भुरळ घातली होती. या जादुई दुनियेत त्याला जायचं होतं मात्र एक प्रकारचा न्यूनगंडही होता.
कालांतरानं त्याचं हे झपाटल्यासारखं चित्रपट बघणं बंदच झालं. एकप्रकारे त्याचं मन उडालं होतं. मात्र मनात कोपर्यात कुठेतरी अभिनेता बनण्याचं स्वप्न तसंच होतं. दरम्यान त्यांनी शिक्षणही पूर्ण केलं आणि ते इंटिरियर डिझाईनर बनले.
नोकरी आणि सरधोपट आयुष्य चालू झालं होतं मात्र मनातून कुठेतरी त्यांना स्वत:ला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना बघण्याची इच्छा प्रबळ होतीच. असं म्हणतात की तुमच्या मनात एखादी इच्छा प्रबळपणे ठाण मांडून बसली असेल तर कधी ना कधी ती पूर्ण होतेच. स्टिव्हन्सनच्याबाबतीतही हा चमत्कार घडला.
ऑस्ट्रेलियात रहाणारा त्याचा मित्र त्याला भेटायला आला होता. हा मित्र अभिनेता होता. दोन मित्र बर्याच काळानं भेटले असल्यानं चारचौघांचे बनतात तसाच या दोघांचाही दारू पिण्याचा प्लॅन बनला.
दोघं मित्र मनमोकळ्या गप्पा आणि ग्लास मागून ग्लास रिचवत होते. दारुच्या नशेचा अंमल जसजसा चढत गेला तसतसा स्टिव्हन्सन मनातलं भडाभडा बोलू लागला.
अनेक वर्षांची अभिनय करण्याची इच्छा त्यानं बोलून दाखविली. जागेपणी जे बोलायला त्याची जीभ रेटत नसे ती गोष्ट नशेनं सोपी केली होती. या मित्रानं त्याला सल्ला दिला की त्यानं अभिनयाची शिकवणी लावावी आणि याचं तंत्र शिकावं.
दारुचा अंमल उतरला तरीही नंतर हे सगळं बोलणं स्टिव्हन्सनच्या लक्षात राहिलं होतं. पहिलं काम त्यानं काय केलं असेल तर अभिनयाची शिकवणी लावली. नोकरीच्या बरोबरीनं त्यानं अभिनय तंत्र शिकायला सुरवात केली. हे साधारं वर्षभर चाललं त्यानंतर त्यानं हा क्लास आणि नोकरी दोन्ही सोडून ड्रामा स्कूलमधे रितसर प्रवेश घेतला.\
ॲक्टिंग इज यंग प्रोफ़ेशन या उक्तीला खोडून काढत वयाच्या तब्बल २७ व्या वर्षी त्यानं या स्कूलमधे फक्त प्रवेशच घेतला असं नाही तर यात झेपही घेऊन दाखविली.
१९९८ साली प्रदर्शित द थिअरी ऑफ़ फ़्लाईटमधून त्यानं पदार्पण केलं. यानंतर दहा वर्षं पुन्हा खडतर गेली. सहाय्यक भूमिकांवरच त्याला समाधान मानावं लागलं. २००८ साली प्रदर्शित आऊटपोस्ट हा त्याचा पहिली लीड रोल असणारा चित्रपट.
मार्वल सेरीजमधील एक भूमिका- पनिशरही त्याला मिळाली, ज्यासाठी त्यानं खूप कष्ट घेतले होते मात्र दुर्दैवानं चा चित्रपट तिकीटखिडकीवर चमक दाखवू शकला नाही. यानंतर थॉरच्या चित्रपटात त्यानं वॉलस्टॅग नावाचं सहाय्यक पात्र साकारलं. याशिवाय टेलिव्हिजनवरही त्यानं भूमिका साकारायला सुरवात केली.
२००५ ते २००७ या दरम्यान प्रदर्शित झालेली रोम ही त्याची आजवरची सर्वात चमकदार अभिनय कामगिरी आहे. या शोमुळे अमेरिकेतल्या घरा घरात पोहोचलेल्या स्टिव्हन्सनला आता RRR नं भारतीय प्रेक्षकांत नवी ओळख दिलेली आहे. भारतीय प्रेक्षकांनी त्याच्या कामाला दिलेली पसंती पहाता आणखिनही काही चित्रपटात तो दिसल्यास नवल नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.