Site icon InMarathi

सहा मुली, फोटोत दिसताहेत पाचजणींचेच पाय! काय आहे गौडबंगाल?

illision im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोफ्यावर बसलेल्या ६ जणींचा एक जुना फोटो आहे, पण या फोटोत पाचच जणींचे पाय दिसत आहेत. मध्ये बसलेल्या मुलीचे पायच दिसत नाहीयेत. काय आहे ही भानगड?

सहा मैत्रिणी सोफ्यावर बसल्या आहेत. त्यांच्यातली एक सोफ्याच्या कडेच्या हातावर बसली आहे. तिचे पाय कुठले आहेत हे तर आपल्याला फोटोत स्पष्ट दिसतंय. त्यामुळे नेमकी गफलत ही त्या पाच जणींच्या पायांमध्ये आहे. हा फोटो पाहून गोंधळून जायला होतंय ते सोफ्यावर बसलेल्या या पाच मुलींमुळे.

 

 

सोफ्यावर पाच मुली बसल्या आहेत. पण फक्त त्यातल्या चारच जणींचे पाय आपल्याला दिसत आहेत. तिसऱ्या मुलीचे पाय दिसत नाहीयेत. हे कसं शक्य आहे?

आपल्या लक्षातही येणार नाही असा मजेशीर खेळ इथे आपल्या दृष्टीच्या बाबतीत घडतो. ज्या मुलीचे पाय दिसत नाहीयेत तिचे पाय कुठे आहेत असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर खरंतर त्या मुलीचे पाय त्या फोटोत अगदी स्पष्टपणे आपल्या समोर आहेत.

आपलं डोकं ठराविक पद्धतीने विचार करतं. एखादी व्यक्ती साधारण कशी बसते याचंही प्रोग्रामिंग आपल्या डोक्यात आपोआप सेट झालेलं असतं. त्यामुळे त्या प्रोग्रामिंगपेक्षा वेगळा असा कुठलाही संदेश मेंदूपर्यंत चटकन पोहोचू शकत नाही.

चित्रातली ती तिसरी मुलगी बाकी मुलींपेक्षा थोडी वेगळी बसली आहे. एका बाजूला कलून. त्यामुळे तिच्या पायांवरच्या शरीराचा भाग आणि पाय एका रेषेत नाहीत. तिच्या पायांवरच्या शरीराचा भाग एका बाजूला झुकलाय आणि पाय दुसऱ्या बाजूने पुढे आलेत. त्यामुळे ते पाय त्या तिसऱ्या मुलीचे न वाटता डावीकडून दुसऱ्या मुलीचेच आहेत असा भास तो फोटो बघताना आपल्याला होतो.

डावीकडून दुसऱ्या बसलेल्या मुलीने काळ्या रंगाच्या पँट्स घातल्या आहेत आणि तिचे पाय लपले गेलेत. डावीकडून पहिल्या बसलेल्या मुलीच्या पायांमुळे ते झाकले गेलेत. दिसत आहेत की नाहीत इतपत ते अस्पष्ट दिसत आहेत. हे सहजासहजी लक्षात येत नाही. पण लक्षात आणून दिल्यामुळे त्यातली गंमत कळते.

 

 

अशा भ्रमामुळे भांबावून जाण्याची लोकांची ही पहिलीच वेळ नाही. ‘ऑप्टिकल इल्युजन’चं असंच एक उदाहरण गेल्या वर्षी एका फोटोतून दिसलं होतं.

बॅगपॅकिंग करून जंगलात भटकायला गेलेल्या ४ जणांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोच्या मध्ये चार व्हिस्कीच्या बाटल्या आपल्या दिसतात. पण पटकन बघितलं तर १०तल्या ९ वेळा आपल्या मेंदूला चौथा हात दिसतच नाही.

 

 

४ व्हिस्कीच्या बाटल्या आणि तिघांचे हात दिसतात. फोटोतल्या खडकांचा रंग आणि चौथ्या माणसाने घातलेल्या कपड्याचा रंग इतका मिळताजुळता आहे की आपल्याला तो चौथा हात पटकन दिसतच नाही आणि ‘ऑप्टिकल इल्युजन’ तयार होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version