' नंबर सेव्ह न करताही तुम्ही समोरच्याला ‘व्हाट्सॲप’ करू शकता, काय आहे ट्रिक? – InMarathi

नंबर सेव्ह न करताही तुम्ही समोरच्याला ‘व्हाट्सॲप’ करू शकता, काय आहे ट्रिक?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

व्हाट्सॲपनं आपल्या आयुष्यात क्रांतीकारक बदल केलेत. कौटुंबिक गप्पागोष्टी असोत किंवा कार्यालयीन संदेश देवाण घेवाण, व्हाट्सॲपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.

व्हाट्सॲप नाही अशी व्यक्ती जवळपास दुर्मिळ आहे. या ॲपमधे वेळोवेळी अपग्रेडेशन होत असतं. पूर्वी फ़क्त संदेश देवाण घेवाण करणारं व्हाट्सॲप आता व्हिडो कॉन्फ़रसन्सपर्यंत येऊन पोहोचलं आहे.

कामानिमित्त आपल्याला अनेक अनोळखी लोकांशी तात्पुरतं संपर्कात रहावं लागतं. यांचा नंबर सेव्ह केल्याशिवाय आपल्याला त्यांना व्हाट्सॲप करता येत नाही.

 

whatsapp message inmarathi

 

उदाहरण द्यायचं, तर घरात किरकोळ दुरुस्तीसाठी बोलवलेल्या व्यक्तीला कामानिमित्त व्हाट्सॲप मेसेज करायचा असतो. एखादी डिजिटल रिसिट पाठवायची असते, अलिकडे सर्रास गुगल पे केलं जातं, तर जीपे पेमेंट केलेली रिसिट पाठवायची असते, अशा वेळेस खास तो नंबर सेव्ह करा आणि नंतर डिलिट, ब्लॉक करा इतकं करायची इच्छा नसेल तर?

त्याचप्रमाणे काही व्यक्तींशी कामानिमित्त तात्पुरता संबंध येणार असतो, मात्र यांचा मोबाईल नंबर सेव्ह केल्याशिवाय त्यांना काही माहिती पाठवणं शक्य होत नाही, अन्यथा हा मोबाईलनंबर कायम लक्षात ठेवावा लागेल.

 

whatsapp privacy policy inmarathi

 

हे प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. कधी कधी अगदी एखाद- दुसराच मेसेज पाठवायचा असतो अशावेळेस हा नंबर सेव्ह करा आणि मग काम झालं की तो ब्लॉक करावा लागतो. अन्यथा आपल्या स्टेटसपासून डीपी पर्यंत सगळं या व्यक्तीला दिसत रहातं.

काहीजणांना यात काही गैर वाटत नाही मात्र काहीजणांना अनोळखी, अपरिचित व्यक्तींनी आपले डिपी, स्टेटस पाहिलेलं आवडत नाही. तर असा नंबर सेव्ह न जाताही आपण मेसेज पाठवू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. मात्र यासाठी तुम्हाला व्हाट्सॲपची एक हॅक वापरायची आहे. काय आहे ही हॅक?

खूप सोपी अशी युक्ती आहे जिच्या मदतीनं तुम्ही नंबर सेव्ह न करताही या व्यक्तीला संदेश पाठवू शकता. गुगल अनेक कुलुपांची किल्ली आहे. या गोष्टीतही आपण गुगलची मदत घेऊ शकतो, कसं ते पाहू….

 

google search engine IM

 

सगळ्यात आधी गुगल ओपन करायचं (तुम्ही मोबाईलवरच्या गुगल सर्चमधेही थेट टाईप करु शकता) आणि त्यावर सर्च मधे wa.me/ असं टाईप करुन पुढे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाइप केला, की तुम्ही त्या व्यक्तीच्या व्हाट्सॲप खिडकीत थेट जाता. इथे जाऊन जो काही संदेश पाठवयचा तो पाठवू शकता, नंबर सेव्ह न करता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?