Site icon InMarathi

१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता!

money 3 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचा एक छोटासा का होईना पण व्यवसाय असावा. नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय केव्हाही चांगला नाही का? प्रत्येकाकडे व्यवसायाविषयी काही ना काही कल्पना असतात, पण त्या सत्यात उतरवण्यासाठी पुरेसे भांडवल नसते. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न अधुरे राहते.

 

 

परंतु तुम्हाला माहित आहे का, आज आपण जी उद्योगक्षेत्रातील मोठमोठी नावे घेतो त्यांनी सुद्धा खूप लहान लहान गोष्टीपासून सुरुवात करूनच आज स्वत:चे अवाढव्य साम्राज्य तयार केले आहे.

बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग आणि एलोन मस्क यांनी शून्यातून स्वत:चे विश्व निर्माण करून स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. बिल गेट्स यांनी कॉलेज मध्ये ड्रॉप लागल्यानंतर दोन वर्षांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी सुरू करण्याचे ठरवले…ते ही तुटपुंज्या भांडवलावर.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मार्क झुकरबर्गने हार्वर्ड कॉलेजच्या वसतीगृहातील एका खोलीत फेसबुक तयार केले ते पण खूप कमी किंमतीमध्ये!

 

 

आज आम्ही तुम्हाला काही निवडक दहा व्यवसाय सांगणार आहोत, ज्यांची आज मार्केटमध्ये खूप चलती आहे आणि मुख्य म्हणजे हे व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त भांडवल देखील लागत नाही.

 

१. ट्रॅव्हल एजन्सी

 

 

आजकाल प्रवासी उद्योगाचं खूप फॅड आहे. तुम्ही  घरातच एखादी ट्रॅव्हल एजन्सी सुरु करू शकता आणि तिला मुख्य ट्रॅव्हल एजन्सीला जोडू शकता. असे करण्याने तुम्ही खूप जलद गतीने सुविधा मिळवू शकता. या ट्रॅव्हल एजन्सीच्या व्यवसायातून उत्तम कमिशन मिळू शकते.

तुम्ही हा व्यवसाय खूप कमी किंमतीत म्हणजे १०,००० रुपयांमध्ये देखील सुरु करू शकता. प्रत्येकवेळी ट्रॅव्हल एजन्सीचे दर भिन्न असल्याने कमिशन वाढत जाते, परंतु तुमच्या मूळ कराराची किंमत सारखीच राहते.

 

२. मोबाईल रिचार्ज शॉप

 

हे ही वाचा – खाण्याच्या पदार्थांचा घरगुती व्यवसाय करताय? मग या गोष्टी तुम्हाला माहित हव्याच!

बहुतेक लोक रिचार्ज करण्यासाठी रिचार्जच्या दुकानाला भेट देणे पसंत करतात. त्यामुळे हा व्यवसाय करणे खूप सहज शक्य आहे. तुम्ही एखादी छोटीशी जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता.

त्यासाठी तुम्हाला एअरटेल, वोडाफोन, आइडिया अश्या नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांशी चांगले संबंध तयार करण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही ऑनलाईन रिचार्ज करून या कंपन्यांमधून कमिशनद्वारे चांगला नफा करून घेऊ शकता. जर तुम्ही महाग ठिकाणी जागा घेतली नाहीत, तर तुमचे एकूण भांडवल १०,००० रुपयांच्यावर जाणार नाही

 

३. शिकवणी केंद्र

 

 

सुरवातीला कोणताही खर्च नसल्याने हा एक प्रभावी व्यवसाय आहे. शिकवणी घेणारे बहुतेक शिक्षक आपल्या घरातूनच शिकवण्या घेतात, त्यामुळे जागेच्या भाड्यासाठी काहीही खर्च येत नाही.

यामध्ये एकच मेहनत करावी लागते ती म्हणजे सोशल मीडियाद्वारे स्वतःची जाहिरात करावी लागते आणि जुन्या शालेय मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याद्वारे इतर मुलांना जमवावे लागते.

 

४. ब्लॉगिंग

 

 

हे कदाचित डिजिटल युगात प्रवेश करण्यासाठी सर्वात आकर्षक क्षेत्रांपैकी हे एक आहे. व्यवसायिक ब्लॉगिंगसाठी फक्त कमीत कमी प्रारंभिक भांडवल गरजेचे आहे.

तुम्हाला फक्त डोमेन नेम आणि होस्टिंग स्पेस मध्ये गुंतवणूक करायची आहे. यामध्ये जास्तीत जास्त ३६०० रुपये खर्च होतो. तुम्हाला तुमच्या चॅनेलच्या प्रचारासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.

 

५. युट्युब चॅनेल

 

हे ही वाचा – ३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर!

युट्युब चॅनेल हे कमी आर्थिक गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यासाठी उत्तम साधन आहे. युट्युब हे प्रतिभावान व्यक्तींसाठी खूपच चांगले व्यासपीठ आहे.

युट्युब चॅनेलवर आपली कला सादर करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

तुम्ही युट्युब चॅनेल विनामूल्य तयार करू शकता आणि त्यामध्ये कोणतेही शुल्क न देता विडीओ अपलोड करू शकता. ज्यांचे चॅनेल लोकप्रिय आहेत अशा लोकांना युट्युब पैसे देखील देते.

त्यामुळे इथे तुम्ही तुमच्या कलेने चांगली कमाई करू शकता.

 

६. कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट)

 

 

जर तुम्ही नेट्वर्किंग आणि व्यवस्थापनात निपुण आहात तर हा व्यवसाय तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला अनेक ठिकाणे एकाच वेळी सांभाळायची असतात. कार्यक्रम प्रायोजक, जमवाजमव आणि इतर कामासाठी तुम्हाला २४ तास तत्पर राहावे लागते.

या व्यवसायासाठी तुमच्या ब्रँडची मार्केटमध्ये इमेज निर्माण होणे गरजेचे आहे –

कारण तुमच्या ब्रँडवर तुम्हाला लोक ओळखणार आहेत.

त्यासाठी तुम्ही ऑनलाईन जाहिरात करून तुमच्या ब्रँडचे नाव वाढवू शकता.

 

७. गारमेंट टेलर

 

 

कोलकत्ता, मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हाताने बनवलेल्या डिझाइनच्या मागणीमध्ये १० पटीने वाढ झाली आहे.

आजकाल हँडमेड डिझाइनचे कपडे खूपच प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय खूप लवकर यशस्वी होऊ शकतो आणि त्या व्यवसायाला भांडवल सुद्धा खूपच कमी लागते.

 

८. फोटोग्राफर

 

 

जर तुमचा व्यवसायिक फोटोग्राफर बनण्याचा हेतू आहे आणि तुम्ही आधीच चांगला DSLR घेतला असेल आणि तुम्हाला फोटो काढण्यामध्ये खूपच रुची असेल तर मग हा व्यवसाय तुम्ही सहज करू शकता.

पुढील खर्चाचा विचार न करता स्वतंत्र फोटोग्राफर बनून तुम्हाला फक्त ऑनलाईन जाहिरात करायची आहे.

त्यामुळे फक्त ऑनलाईन गुंतवणूक करण्याची गरज आहे.

 

९. स्क्रिप्ट लेखन

 

 

मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतंत्र पटकथालेखक खूप प्रसिद्ध आहेत. ते कुठल्याही प्रसंगी आणि कुठल्याही वेळेत काम करण्यास तयार असतात.

या व्यक्ती मुदतींवर काम करतात आणि एका कराराद्वारे प्रोडक्शन हाउसशी संलग्न असतात.

त्यांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नसते, कारण ते घरच्या घरी सुद्धा काम करू शकतात, त्यामुळे जागा भाडेतत्वावर घेण्याचीही गरज भासत नाही, त्यामुळे तो खर्च वाचतो.

प्रत्येक प्रकल्पासाठी त्यांना केवळ वेळेची गुंतवणूक करायची आहे.

तुम्हाला ही कला अवगत असल्यास तुम्ही यामध्ये करियर करू शकता.

 

१०. जेवणाचे डब्बे पुरवणे 

 

 

अन्न उद्योगात प्रवेश करणे हा नेहमीच एक फायदेशीर मार्ग आहे. शहरात एकटे राहून काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना जेवणाची गरज भासते.

सध्याची जोडपी देखील नोकरी करत असल्याने, सकाळी उठून जेवण बनवणे त्यांना जमत नाही किंवा आवडत सुद्धा नाही. तेव्हा हे सर्व लोक डब्बा सेवेचा लाभ घेतात.

यामध्ये तुम्हाला कोणतीच मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही. तुम्ही तुमच्या घरच्या स्वयंपाकघरात देखील हे जेवण बनवू शकता, म्हणून या व्यवसायात चांगला नफा आहे.

===

हे ही वाचा – ऑनलाईन व्यवसाय करताना या चुका केल्या, तर नुकसान अटळ आहे! वेळीच सावध व्हा

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version