छत्रपतींचे राज्य नेमके पेशव्यांच्या हाती गेले कसे?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यावर असं जाणवतं की, आपल्या या जाणत्या राजाने केवळ गड किल्लेच जिंकले नाहीत, तर त्यासोबत त्यांनी जनतेची मनंसुद्धा जिंकली होती. हिऱ्या सारख्या लोकांना त्यांनी आपल्या ‘स्वराज्य आणि सुराज्य’ या मोहिमेत सामील करून घेतलं होतं.
एकीकडे त्यांनी स्वराज्य मिळवून देणारे मावळे आपल्या हाताशी ठेवले होते, तर दुसरीकडे राज्यात प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सेनापती, सुमंत, न्यायाधीश, मंत्री, पंडितराव, सचिव, अमात्य आणि पंतप्रधान असं अष्टप्रधान मंत्रिमंडळ देखील त्यांनी स्थापन केलं होतं. पंतप्रधान हे पद त्या काळात ‘पेशवा’ या नावाने संबोधित केलं जायचं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘पेशवे’ पदाची सुरुवात कधी झाली ?
१७०७ या वर्षी जेव्हा छत्रपती शाहू महाराज हे मुघलांच्या तावडीतून सुटून महाराष्ट्रात परत आले होते तेव्हा त्यांना राजकारण आणि प्रशासनाचा काहीच अनुभव नव्हता. तेव्हा त्यांनी ‘बहिरोजी मोरेश्वर पिंगळे’ या स्वराज्य सेवकाला त्यांनी पहिले पेशवे म्हणून नियुक्त केलं होतं.
१७१३ मध्ये जेव्हा बहिरोजीपंत यांना मुघलांनी आग्रा येथे बंदिस्त करून ठेवलं होतं तेव्हा ‘बाळाजी विश्वनाथ भट’ यांना शाहू महाराजांनी पंतप्रधान (पेशवा) पदाची जबाबदारी सोपवली होती. बाळाजीपंत हे १७२० पर्यंत पेशवे पदावर विराजमान होते. त्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी हे पद २० वर्षीय सुकुमार विश्वास म्हणजेच ‘बाजीराव’ यांच्यावर पेशवे पदाची जबाबदारी सोपवली होती. पण, त्यांचं १७४० मध्ये कमी वयात निधन झालं आणि मग स्वराज्याला ‘नानासाहेब पेशवे’ यांच्या रूपाने एक कुशल प्रशासक मिळाला.
नानासाहेब पेशवे यांनी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. आपल्या स्वराज्यात एक अशीही वेळ आली होती की, नानासाहेब पेशवे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेब पेशव्यांना या पदावरून पायउतार होण्यास सांगितलं होतं. तेव्हा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा विरोध पत्करून नानासाहेब पेशवे यांना पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवली होती.
सप्टेंबर १७५० मध्ये शाहू महाराजांच्या कार्यकाळानंतर स्वराज्याचा कारभार बघणाऱ्या रामराजे महाराजांनी नानासाहेब पेशवे यांच्यासोबत ‘सांगोला’ करार केला आणि त्यानंतर पेशवे काळाची खरी सुरुवात झाली.
हे सर्व घडलं कसं?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा ‘मोरोपंत पिंगळे’ हे पेशवे होते. आपल्या कामात निष्णात असलेले मोरोपंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या कामाने महाराजांचं मन जिंकलं होतं. पण, काही वर्ष सत्तेत महत्वाचं पद भूषवल्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात मोरोपंत आणि अनाजीपंत यांनी मिळून एक कट रचून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यामध्ये मोरोपंत पकडले गेले आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
संभाजी महाराजांनी कोणावरही अन्याय होऊ नये या विचाराने कैदेत मृत्यू झालेल्या मोरोपंत यांचा मुलगा निळोपंत यांना सन्मानाने पेशवे पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत असं कोणतंही कट कारस्थान झालं नाही आणि त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला.
काही वर्षांनी राजाराम महाराजांवर स्वराज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी येऊन ठेपली होती. त्या काळात निळोपंत आणि त्यांचे बहिरोपंत यांना संयुक्तपणे पेशवेपद देण्यात आलं होतं. राजाराम महाराजांच्या निधनानंतर पराक्रमी ताराराणी यांनी सत्ता राखली होती. बहिरोपंत पेशवे यांना हा बदल मान्य नव्हता, म्हणून ते शाहू महाराजांच्या पक्षात सामील झाले होते.
शाहू महाराजांची दूरदृष्टी
औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर झालेले साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज हे मराठी साम्राज्यातील एकहाती सत्ता प्रस्थापित करणारे शेवटचे महाराज म्हणून ओळखले जातात.
शाहू महाराजांनी बहिरोपंत पेशवे यांना पेशवेपदी बसवलं आणि त्यांच्यावर कान्होजी आंग्रे यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली. पण, बहिरोपंत यांना या मोहिमेत यश आलं नाही आणि त्यांना कान्होजी आंग्रे यांनी कैदेत टाकलं. कारण, या मोहिमेची बातमी शाहू महाराजांचे सेनापती चंद्रसेन जाधव यांनी आधीच कान्होजी आंग्रे यांच्यापर्यंत पोहोचवली होती.
—
- केवळ आज नव्हे, पेशवेकाळातही पैसा पुरवायला “बारामतीकर”च असायचे!
- इंग्रज असो वा मुघल, शस्त्रांनी नव्हे, कुशाग्र बुद्धीने शत्रूशी लढणारा पेशवाईतील चाणक्य
—
पहिले पेशवे – बाळाजी भट
बहिरोपंत पेशवे यांच्या कैदेत असतांना ‘बाळाजी विश्वनाथ भट’ हे त्यावेळी समोर आले आणि त्यांनी कान्होजी आंग्रे यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी स्वीकारली. शाहू महाराजांनी नोव्हेंबर १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिलं आणि ही मोहीम पार पाडण्यासाठी आवश्यक ती सामुग्री देऊन त्यांना मोहिमेवर पाठवलं. मोहीम फत्ते झाली.
इतकंच नव्हे तर, त्यांनी खुद्द कान्होजी आंग्रे यांनाच शाहू महाराजांच्या पक्षात समाविष्ट होण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यामध्ये देखील बाळाजी भट यांना यश आलं.
बाळाजी भट यांनी ही कामगिरी खेडच्या लढाईत धनाजी जाधव यांच्याबरोबर देखील करून दाखवली होती. शत्रू पक्षातील व्यक्तीला शाहू महाराजांच्या पक्षात समाविष्ट करून आपल्या चाणाक्ष बुद्धीचं त्यांनी प्रदर्शन केलं होतं. आपलं पेशवेपद त्यांनी सार्थ ठरवलं होतं. पुढे बाळाजी भट यांनीच दिल्ली मोहीमेचं देखील नेतृत्व केलं आणि त्यांनी महाराणी येसूबाई यांची सुटका केली होती.
बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे आलेली पेशवाई ही पुढे १८१८ पर्यंत त्याच घराण्याकडे राहिली होती. १०५ वर्षांच्या या कालावधीत त्यांच्या घराण्यातील ७ पेशव्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. बाळाजी विश्वनाथ भट किंवा त्यांच्या घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने कधीच सत्तेवर डोळा ठेवला नाही. शाहू महाराजांचे ते सर्वात निष्ठावान पेशवे म्हणून कायमच ओळखले जातात.
बाजीराव पेशवे यांचा कार्यकाळ
बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव यांच्या गळ्यात पेशवाईची माळ पडली होती. २० वर्षांच्या बाजीराव यांनी आपल्या युद्ध कौशल्याने शाहू महाराजांना प्रभावित केलं होतं. बाजीराव पेशवे यांनी संपूर्ण राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळल्याने शाहू महाराजांनी सत्तेतून लक्ष कमी केलं होतं.
बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे यांच्यावर पेशवेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सत्तेचं केंद्र हे आता सातारा न राहता पुणे हे झालं होतं. नानासाहेब पेशवे यांच्यावर शाहू महाराजांचा पूर्ण विश्वास होता.
१७ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचे सातारा येथे निधन झालं. शाहू महाराजांना पुत्र नसल्याने सत्तेचा वारसदार कोण ? हा प्रश्न तेव्हा सर्वांसमोर होता.
शाहू महाराजांनी याबाबत नानासाहेब पेशवे यांना एक चिठ्ठी लिहून त्यांच्या पश्चात पेशवेपद कोणाकडे जावं हे सांगितलं होतं. त्यांच्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की, राणी ताराबाई यांचा नातू रामराजा यांना सत्तेवर बसवणे किंवा नानासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशातील जबाबदार व्यक्तींनी पेशवेपद स्वीकारावं हीच शाहू महाराजांची इच्छा होती.
नानासाहेब यांनी शाहू महाराजांच्या इच्छेचा मान ठेवत ताराबाई यांच्या नातू असलेल्या रामराजा यांना साताऱ्याच्या गादीवर बसवले होते. रामराजे यांचं अर्ध आयुष्य हे गुप्ततेत गेल्याने त्यांना प्रशासनाचा अनुभव कमी नव्हता. त्यामुळे रामराजे यांच्याकडून सत्ता काढून घेण्यात आली आणि पेशवाई ही परत नानासाहेबांकडे आली होती. पुढे ‘सांगोला करार’ करून पेशव्यांनी अधिकृतपणे सत्तेवर आपलं नाव कोरले.
सांगोला आणि मंगळवेढे या ठिकाणी सदाशिवराव पेशवे हे चाल करून गेले आणि त्यांनी ही ठिकाणं काबीज केले. ५६ लाख रुपयांच्या मुद्रा आणि सत्तेवर पेशव्यांचं पूर्ण नियंत्रण हे सांगोला करारात छत्रपतींनी मान्य केलं होतं.
बाळाजी विश्वनाथ भट यांची शाहू महाराजांवर असलेली निष्ठा आणि पहिल्या तीन पेशव्यांनी दाखवलेला पराक्रम हे पेशवाई काळ सुरू होण्याचं आणि पेशवाई टिकण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. पुढे भारतात इंग्रजांची ताकत वाढत गेली आणि दुसऱ्या बाजीराव पेशवे गादीवर बसेपर्यंत पेशवाईचं वैभव रसातळाला लागलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याची धुरा ही अशाप्रकारे पेशव्यांकडे आली असं आपला इतिहास सांगतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.