Site icon InMarathi

“आमच्या आंब्यावर अन्याय का?” फिटनेस गुरु रुजुता दिवेकरांचा सवाल!

mango final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे, घराघरात AC, कूलर पुन्हा एकदा सुरु झाले, उबदार थंडीनंतर आता उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. उन्हाळा म्हंटल की लहानपणी बर्फाचे गोळे, जाम, करवंदे आणि शाळेची सुटी असं समीकरणच बनलेले असायचे. याचबरोबरीने संपूर्ण वर्षभर आपण सगळेच आणखीन एका गोष्टीची आवर्जून वाट बघतो ती म्हणजे आंबे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एप्रिल मे महिन्यातच आंब्याचा सीजन असल्याने आंबे प्रेमी अक्षरशः त्यावर तुटून पडतात. आमरस, आंबा पोळी, जॅम अशा आंब्यापासून तयार होणाऱ्या गोष्टी घराघरात बनवल्या जातात. डायबेटीस ज्यांना आहे अशी मंडळी देखील थोडासा कानाडोळा करून आंब्यांवर ताव मारतात

असा हा फळांचा राजा असलेला आंबा अगदी चवीपरीने खाल्ला जातो, मात्र फिटनेस गुरु  ऋजुता दिवेकर यांच्या आंब्यावरच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे ती नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

फणसाच्या गऱ्यांवर मनसोक्त ताव मारा, मात्र त्यानंतर चुकूनसुद्धा हे ५ पदार्थ खाऊ नका

देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स… चुकूनही विसरू नका!

ऋजुता दिवेकर आपल्या पोस्टमधून कायमच आरोग्याविषयी आणि फिटनेसच्या बाबतीतले आपले विचार मांडत असतात. या एका नवीन पोस्टमध्ये त्यांनी आंब्याचा फोटो टाकून त्यात कॅप्शन असा दिला आहे की वॉशिंग्टनचे सफरचंद बरोबर, न्यूझीलंडचे किवी योग्य मात्र आमचा हापूस आंबा अयोग्य, आंब्याने डायबेटीस वाढतो. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी ही पोस्ट टाकली आणि नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली, नेमक काय म्हणाले नेटकरी जाणून घेऊयात…

 

 

नेटकऱ्यांनी देखील या मिथ्याचा चांगलाच समाचार घेतला आणि आंब्याचे महत्व सांगितले. तसेच ऋजुता दिवेकरांचे देखील आभार मानले आहेत.

 

 

हंगामी फळांचे कायमच सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला मोठ्या काळासाठी nutrients मिळतात अशी प्रतिक्रिया एका नेटकाऱ्याने दिली आहे, तसेच एकाने कॉमेंट केली आहे की मला शक्य होईल तेवढी आंबे मी खातो.

 

 

आंबा जसा फळांचा राजा आहे तसा तो nutrients चा देखील राजा आहे.

 

 

कट्टर आंबा पप्रेमींनी तर आंब्याची चाहूल लागताच किंमत किती हि असो आंब्याची पेटी मागवली आहे.

 

 

आंब्याचे महत्व केवळ ऋजुता दिवेकरांनीच नव्हे सांगितले तर कॉमेंट्समधून नेटकरी देखील महत्व सांगत आहेत.

 

 

ज्या न्यूझीलंडच्या किवी फळाबद्दल चक्क तिकडचे स्थानिक जे भारतीयच आहेत त्यांनी मात्र या फळाला विरोध केला आहे आणि आपल्या आंब्याला मिस करत आहेत असे पोस्टमधून सांगितले आहे.

 

 

आंबा सालीसकट जर खाल्ला तर त्यातून व्हिटॅमिन a,b, c देखील मिळते तसेच साखरेचे प्रमाण देखील कमी होते असं एका नेटकाऱ्याचे मत आहे.

 

 

लोकांना आपल्या स्थानिक गोष्टींच्या मागे लागत नाही मात्र जे इम्पोर्ट करणारे महागड्या गोष्टी असतात त्याच्या मागे लागतात हा सगळं प्रतिष्ठतेचा विषय आहे.

 

 

नेटकऱ्यांनी तर आंब्यासारख्या फळाचा प्रचार केल्याने ऋजुता दिवेकरांचे आभार मानले आहेत.

ऋजुता दिवेकर कायमच भारतातील पौष्टिक अशा खाण्याच्या गोष्टींना प्रोत्साहन देत असतात. आज सर्रास व्हाट्सअँपवर मेसेजस मध्ये हेच सांगितले जाते हे खाऊ नका ते खाऊ नका, मग त्यावरून घराघरात चर्चा रंगतात. शेवटी ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार काय खायचे हे ठरवले पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version