पैसे पाठवताना चुकीच्या अकाउंटला गेले? फिकर नॉट, या पद्धतीने मिळवा परत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रांत बराच बदल झाला आहे, पण सगळ्यांत लक्षणीय बदल झाला असेल तो डिजिटल पेमेंटमध्ये. सुरवातीला हे बुवा आपल्याला कधी जमणारच नाही असे म्हणणारे लोक आता सर्रास ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करतात.
छोट्या मिठाईच्या दुकानातून समोसा घेतल्यानंतर ते मोठ्या हॉटेल मध्ये जेवण केल्यानंतर सगळीकडेच ऑनलाईन पैसे भरले जातात. आत्ता तर भाजीवाले, रिक्षावाले सुद्धा डिजिटल झाले आहेत त्यांच्या कडे सुद्धा क्यू आर कोड असतो. तो स्कॅन करून पैसे भरल्याने वेळही वाचतो आणि सुट्टे पैसे देण्याघेण्याची कटकट सुद्धा मिटते.
परंतु ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याचे जसे खूप फायदे आहेत तशीच ह्यात थोडी जोखीम पण आहे. पैसे ट्रान्स्फर करताना एखादा नंबर चुकीचा टाकल्यास भलत्याच अकाउंटला पैसे जाण्याची शक्यता असते. असे झाल्यास संबंधित व्यक्तीला मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ येते, परंतु टेन्शन घेण्याचं गरज नाही कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकिंग खासकरून ऑनलाईन बँकिंग सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी आवश्यक अशी जी पावले उचलली आहेत त्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
—
- शेअर मार्केटमधील सर्वात घातक वृत्ती – “असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर शिमगा!”
- रशिया-युक्रेन युद्धामुळे होतेय De-dollarisation च्या दिशेने वाटचाल?
—
सर्वप्रथम जर तुमच्या कडून चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर झाले, तर तुमच्या बँकेला सूचित करा. यानंतर तुमची बँक तुमच्या माहितीची शहानिशा करेल त्यानंतर जर खरचं चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्स्फर झाले असतील किंवा चुकीच्या पद्धतीने तुमचे पैसे काढले असतील, तर बँक तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी नक्की मदत करेल. पण त्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील.
जर तुमचे पैसे चुकीच्या अकाउंटला गेल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही असे झाल्यास तुम्ही लगेच कस्टमर केअरला कॉल करा. झालेल्या घटनेची माहिती तात्काळ त्यांना द्या. त्यानंतर ट्रांसॅक्शनचा स्क्रीन शॉट काढून पैसे ट्रान्स्फर केल्याचा पुरावा म्हणून बँकेच्या मेल आयडीवर पाठवून द्या. यानंतर बँक या सगळ्याची चौकशी सुरू करेल आणि मग काही दिवसांतच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
कार्यवाही दरम्यान बँक ज्या व्यक्तीच्या अकाउंटला चुकून पैसे गेले आहेत त्या व्यक्तीला पैसे परत करण्याची परवानगी मागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमानुसार जर चुकीच्या अकाउंटला पैसे गेल्यास संबंधित बँकेला तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
चुकीच्या अकाउंटला गेलेले पैसे त्या व्यक्तीला पुन्हा मिळवून देण्याच्या व्यवस्था बँकेला करावी लागेल. ज्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत त्या व्यक्तीने अनुमती दिली तर ७ दिवसांत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला परत येतील.
याशिवाय तुमच्या तक्रारीच्या आधारे त्या व्यक्तीच्या अकाउंटची माहिती तुम्हाला देण्यात येईल. जर त्या व्यक्तीने पैसे परत देण्यास नकार दिला तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रार करू शकता.
यासाठी तुम्हाला बँकेकडून लिखित स्वरूपात माहिती घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच आर बी आयने अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आणखी एक योजना बनवली आहे.
जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे पाठविता, तेव्हा अकाऊंट मधून पैसे कट होण्याआधी एक मेसेज पाठवण्याची तरतूद असावी असे सांगितले आहे. या मेसेज मध्ये असे विचारले जाते की तुम्ही चुकून तर पैसे पाठविले नाही ना? तसेच या मेसेज मध्ये तुम्हाला एखादा नंबर किंवा मेल आयडी पाठविला जाईल. जेणे करून जर चुकून पैसे ट्रान्स्फर झाले असतील तर त्या नंबरवर किंवा मेल आयडी वर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. हा चुकून गेलेले पैसे परत मिळवण्यासाठीचा सोपा मार्ग आहे. यासाठी वेळ ही कमी लागतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.