Site icon InMarathi

गर्भधारणा टाळण्यासाठी प्राचीन काळात वापरले जायचे हे १० उपाय!

Old methods IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि ही काही मोठी अभिमानास्पद गोष्ट नाहीये, कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर कित्येक समस्या सुद्धा वाढीस लागल्या आहेत यांची आपल्याला जाणीव सुद्धा नाहीये!

पूर्वी किमान लोकसंख्या नियंत्रणाचे काही उपाय तरी केले जायचे पण सध्याच्या काळात कुणाचाच कुणावर कंट्रोल नाहीये!

आताच्या काळामध्ये कुटुंबनियोजन करण्यासाठी खूप वेगवगेळ्या प्रकारची औषधे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने कुटुंबनियोजन करणे सोपे झाले आहे. तसेच, कंडोमचा वापर केल्यामुळे तर कधी – कधी या औषधांचा देखील वापर करावा लागत नाही.

 

 

आता विज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे, पण प्राचीन काळामध्ये कोणत्याही प्रकारची औषधे आणि कंडोम यासाठी उपलब्ध नव्हती.

मग तेव्हा त्या काळातील पुरुष आणि स्त्रिया कुटुंब नियोजनासाठी नक्की कोणता उपाय करत असतील? प्राचीन काळामध्ये देखील असे काही पदार्थ होते आणि अजूनही आहेत. ज्यांच्या सहाय्याने गर्भधारणा रोखता येत होती आणि कुटुंब नियोजन करता येत होते.

 

 

आज अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊयात, ज्यांच्या साहाय्याने प्राचीन काळातील स्त्रिया आणि पुरुष कुटुंब नियोजन करत असत.

१. कदंब फळ :

 

 

कदंबाचे फळ हे एक चतुर्थांश मधामध्ये टाकून गरम पाण्यासोबत तीन दिवस घ्यावे. जर हे स्त्रीने लागोपाठ तीन दिवस घेतले, तर स्त्रीमध्ये वंध्यत्व निर्माण होते.

२. हळद :

 

 

हळदीच्या मुळाचा एक तुकडा दररोज सहा दिवसांसाठी घेतला पाहिजे. तीन दिवस मासिक पाळीच्या दरम्यान आणि तीन दिवस मासिक पाळीच्या नंतर हा घ्यावा. असे केल्याने त्या स्त्रीमध्ये वंध्यत्व येईल, पण तिला मासिक पाळी येणे चालूच राहील.

 

३. काकडीचे बियाणे :

 

 

एखाद्या स्त्रीने जर मासिक पाळी सुरु झाल्यानंतर काकडीच्या बिया सलग सात किंवा आठ दिवस खालल्या, तर ती स्त्री परत कधीही गर्भधारणा करू शकत नाही.

. एरंडेल बियाणे :

 

 

 

मासिक पाळीच्या दरम्यान एक किंवा दोन एरंडेल बियाणांचे लगदे खालल्यास तुम्ही अनुक्रमे एक किंवा दोन वर्ष योग्यरीत्या गर्भधारणा टाळू शकता.

५. सशाचे रक्त :

 

 

सशाचे रक्त मासिक पाळीच्या वेळी घेणे किंवा गर्भधारणेच्या काळामध्ये घेतल्यास यामुळे स्त्रीमध्ये वंध्यत्व निर्माण होते.

 

६. जमुनांची फुले :

 

 

गाईच्या मूत्रासह म्हणजेच गोमूत्रासह जमुनाच्या फुलाचा रस मासिक पाळीच्या काळामध्ये घेतल्यास हे घेणाऱ्या स्त्रीमध्ये वंधत्व निर्माण होते.

 

७. पपई :

दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा पूर्णपणे बंद करण्यासाठी कच्च्या पपईचा वापर केला जातो. पपई पिकल्यानंतर लगेचच त्यात प्रोजेस्टेरॉनमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या गर्भनिरोधक आणि गर्भपाताचे गुणधर्म असलेल्या फायटोकेमिकल्सची निर्मिती होते.

 

 

पपईचे बीज हे प्रत्यक्षात पुरुष एक प्रभावी पुरुष गर्भनिरोधक म्हणून काम करू शकते. दररोज पपईची बियाणे खाल्ल्यास एखाद्या पुरुषाची शुक्राणूंची संख्या शून्यावर आणू शकते आणि दीर्घकाळाच्या वापरासाठी हे खूप सुरक्षित आहे.

हा सर्वात उत्तम उपाय आहे. जर त्या पुरुषाने हे बियाणे खाणे बंद केले, तर त्याच्या शुक्राणूंची संख्या परत सामान्य होईल.

 

८. पारा :

प्राचीन चीनमध्ये स्त्रियांना गर्भधारणा टाळण्यासाठी गरम पारा पिण्याचा सल्ला दिला जाते असे. गर्भवती होण्यासाठी ज्या स्त्रीचे शरीर अजून पूर्णपणे तयार नसायचे, अशा स्त्रियांना असे करण्यास सांगितले जात असे. त्यामुळे त्याप्रमाणे गर्भनिरोधक म्हणून त्याचा वापर केला जात असे.

 

 

तथापि, आज आपल्याला माहित आहे की, पारा हा अत्यंत विषारी असतो. पार हा मूत्रपिंड आणि फुफ्फुस खराब करण्यास कारणीभूत ठरू शकते. तसेच, मेंदूला दुखापत होऊन मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे आता त्याचा वापर केला जात नाही, कारण ते धोकादायक ठरू शकते.

 

९. जंगली गाजर :

 

 

जंगली गाजराच्या सुक्या बियांचा रस घेतल्याने गर्भधारणा टाळण्यास मदत होऊ शकते आणि ते बराच काळ गर्भनिरोधक म्हणून काम करते. डिंब व्हॅलिडेशन प्रक्रिया विस्कळीत करण्याचे आणि प्रोजेस्टेरॉन संश्लेषण अवरोधित करण्याचे काम हे गाजर करते, असे आढळून आले आहे.

 

१०. हत्तीची विष्ठा :

 

 

प्राचीन भारतामधील स्त्रिया असे मानत होत्या की, हत्तीच्या विष्टेपासून तयार करण्यात आलेली पेस्ट योनीमध्ये ठेवल्यास ही पेस्ट वीर्य आणि त्यांचा परिणाम यांच्यामध्ये अडथळा निर्माण करते, त्यामुळे त्या ही पेस्ट वापरत असत. काही संशोधकांना याबद्दल असे वाटते की, विष्ठेमधील अल्कधर्मी प्रकारामुळे शुक्राणूंचा मृत्यू होऊ शकतो.

या सर्व पदार्थांचा वापर प्राचीन काळामध्ये लोक गर्भनिरोधक म्हणून करत असत आणि अशाप्रकारे त्यांचे कुटुंब नियोजन होत असे.

 

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version