Site icon InMarathi

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही, वाचा यामागचे विज्ञान

pressure cooker IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आजच्या काळात स्वयंपाक करणे खुप सोपे झाले आहे, एकीकडे चूलीचे गॅसमध्ये रूपांतर झाले आहे, तर अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या भांड्यांमध्येही बरेच बदल झाले आहेत. पूर्वीचे लोक अन्न शिजवण्यासाठी कढाई किंवा तपेली वापरत असत. पण बदलत्या काळानुसार यामध्येही बरेच काही बदलले आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रेशर कुकर. ज्यामध्ये स्वयंपाक करणे खूप सोपे झाले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्वयंपाक जलद, सुलभ आणि आरोग्यदायी करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कुकर मध्ये अन्न चांगल्याप्रकारे शिजते आणि त्यांच्यातील पोषक घटक ही टिकून राहतात. प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करताना इंधनही कमी लागते. तसेच आपण हे कुकर एखादे पदार्थ उकळण्यासाठी, वाफेसाठी किंवा अन्य दूसरे काही पदार्थ जसे की भाजी बनवण्यासाठी देखील वापरू शकतो. अशा या कुकरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कुकर मध्ये असलेली शिट्टी.

 

 

प्रेशर कुकरमध्ये कुठलेही पदार्थ बनवायचे असेल तर, कुकर मध्ये असलेल्या शिट्टीवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जसे की काही पदार्थ करतांना आपण शिट्टी करतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येते की आपली भाजी अथवा इतर जे काही बनतोय ते शिजल आहे. पण काही जण म्हणतात की शिट्ट्या अजिबात करू नयेत. परंतु यामागची कारणे तुम्हाला माहिती आहे का, माहीती नसेल तर चला जाणून घेऊया कुकरच्या शिट्ट्या का करू नयेत?

scroll.in

शिट्टी न होऊ देण्यामागे विज्ञान आहे, आपल्याला शाळेमध्ये शिकवले गेले असेलच की पाणी हे १०० अंश तापमानावर उकळायला सुरुवात होतो. याचाच अर्थ आपण पाण्याला जास्तीत जास्त १००° तापमानापर्यंत उकळू शकतो.

आता समजा आपण प्रेशर कुकर मध्ये तांदूळ शिजायला ठेवले आहे. यानंतर जसे जसे कुकर गरम होतो, तसे-तसे त्यामधील पाणी उकळायला लागते आणि हळू-हळू त्याच पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होते. आता जोपर्यंत कुकरच्या आतमध्ये वाफेचा उच्च दाब तयार होत नाही तोपर्यंत शिट्टी उचलल्या जाणार नाही. तसेच द्रव पदार्थांचा एक विशेष गुण असा आहे की, प्रेशरमध्ये असतांना त्यांचे उकळण्याचे प्रमाण अजुन वाढते.

समजा जो तांदूळ कुकरमध्ये १०० अंश तापमानावर उकळत होता तोच प्रेशर कुकर मध्ये १२० अंश पर्यंत जाऊ शकतो, आणि जेवढ्या जास्त तापमानावर हा तांदूळ उकळला  जाईल, तेवढ्याच लवकर हा भात होईल. परंतु जर आपण या कुकर मध्ये शिट्टी केल्या तर कुकर मध्ये तयार झालेली संपूर्ण वाफ निघून जाईल आणि मग पुन्हा वाफ तयार होण्यासाठी आपल्याला पाणी टाकावे लागेल आणि आपला वेळही जाणार

 

याच कारणामुळे बरेच लोक सांगतात की कुकर ची शिट्टी होऊ देऊ नका. त्यामुळे ही वाफ कुकरच्या आतमध्ये ठेवण्यासाठी शिट्टी ची उपाययोजना केली गेली आहे.

 

 

● प्रेशर कुकरचा इतिहास

साधारण १६७२ सालची गोष्ट आहे. फ्रान्समधील ब्लॉइस येथून एक तरुण इंग्लंडला पोहोचला. त्या तरुणाला विज्ञानात प्रचंड रस होता. त्याने तिथल्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर रॉयट बाउमले यांच्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम मिळवले. तो तरुण सतत नवनवीन गोष्टी करून बघायचा. एके दिवशी एक प्रयोग करत असतांना तरुणाच्या मनात विचार आले की, पाण्यावर दाब वाढला तर त्याचा उत्कलनबिंदूही वाढला पाहिजे.

तरुणाने प्रयोगशाळेत असलेले आटोक्लेव मशीन पाण्याने भरले आणि स्क्रू आणि लीव्हरच्या सहाय्याने त्याचे झाकण घट्ट बंद करून त्याला चूली वर ठेवले. काही मिनिटांमध्येच त्याच्या लक्षात आले की भांड्यामध्ये प्रचंड वाफ तैयार झाली आहे आणि दबाव वाढतच आहे. त्या तरुणाने निरीक्षण केले की त्या भांड्यातील पाणी उघड्या किंवा झाकलेल्या भांड्यापेक्षा जास्त वेगाने उकळते.

यानंतर तरुणाने आणखी एक प्रयोग करून बघितला. त्याच बंद भांड्यात त्याने काही भाज्या उकळल्या, इथेही त्याला लक्षात आले की भाजी खुप लवकर शिजल्या आहेत. परंतु तो तरुण एका प्रश्नामुळे गोंधळला होता ते म्हणजे, बंद भांड्यात वस्तू उकळत राहिल्यास आत निर्माण होणारी वाफ संपूर्ण भांडे उडवू शकते.

 

 

हा धोका दूर करण्यासाठी तरुणाने भांड्याच्या झाकणाला छिद्र पाडले आणि तेथे हलका धातूचा स्क्रू टाकला. त्यामुळे पात्रात आवश्यकतेपेक्षा जास्त वाफ निर्माण झाल्यास तो स्क्रू फुटून वाफ बाहेर पडेल, याचाच दुसरा अर्थ असा की, भांड्याला कुठलाही अपाय होत नाही. तरुणाने या उपकरणाला डायजेस्टर असे नाव दिले आहे. काही काळातच हे उपकरण प्रचंड गाजले आणि लोकांना आवडायलाही लागले. तरुणाने आपल्या प्रयोगाच्या नादात प्रेशर कुकरचा शोध लावला होता.

 

 

या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ नाव डेनिस पापिन होते. त्यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीलाही आपल्या या ‘स्टीम डायजेस्टर’ चे प्रात्यक्षिक दाखवले होते. तथापि, त्याकाळी ते वापरायला किचकट होते आणि यासाठी एक विशेष प्रकारची भट्टी लागायची, याच कारणामुळे हे फक्त हॉटेल्स आणि उद्योगांमध्ये वापरले जाऊ लागले. परंतु हळू हळू त्यामध्ये सुधारणा होत गेल्या आणि आता ते प्रत्येक घरामध्ये वापरले जात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version