Site icon InMarathi

आईच्या वेदना पाहून त्याने जे केलं त्यासाठी जगभरातील महिला त्याचे आभार मानतील

breast caancer bra inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दिवसेंदिवस कॅन्सरचा विळखा मानवी जीवन कठीण करत आहे. १४ डिसेंबर २०२० या दिवशी IARC म्हणजे (इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर) ने कॅन्सर संबंधी आलेल्या जागतिक अहवालानुसार जगभरात १९ दशलक्ष लोकांना कॅन्सर झाला तर २० दशलक्ष लोक कॅन्सर मुळे मृत्यू पावले असल्याचं जाहीर केलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पाच पैकी एक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी कॅन्सरला सामोरी जाणार आहे. त्यांनी केलेला अभ्यास दर्शवतो की ५० दशलक्ष लोक कॅन्सर होण्याच्या वाटेवर आहेत.

 

 

२०२० च्या अहवालानुसार जगभरातील कॅन्सर रुग्णांमधील स्त्रियांच्या स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ २०२० मध्ये जगभरातील २२ लाखांपेक्षा जास्त स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे.

भारताचा विचार केला तर भारतातही इतर कोणत्याही कॅन्सरच्या तुलनेत ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण सगळ्यात अधिक आहे. शास्त्रज्ञांच्या मते २०३० पर्यंत केवळ ब्रेस्ट कॅन्सर मुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल अशी भीतीही व्यक्त होत आहे.

मात्र भविष्याचा वेध घेत एका तरुणाने केलेला प्रयोग संपूर्ण जगासाठी महत्वाचा ठरणारा आहे, अनेकींसाठी वरदान करू शकणारा आहे. 

खरंतर ब्रेस्ट कॅन्सर जर सुरुवातीच्या स्टेज मध्येच कळला आणि डॉक्टरांना दाखवला, त्यावर इलाज केला तर बरा होण्यासारखा आजार आहे. पण केवळ महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांना दाखवायला जात नाहीत किंवा तपासणीही करून घेत नाहीत. त्यामुळे तो ब्रेस्ट कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात जाऊन महिलेचा मृत्यू होऊ शकतो.

 

 

एखाद्या महिलेला कॅन्सर झाला की त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. त्या महिलेचे उपचार, दवाखान्यात येणे जाणे, याच बरोबर त्या संपूर्ण घराला आलेला टेन्शन, प्रत्येकाचीच परीक्षा पाहत असतं. विशेषतः त्या स्त्रीची मुलं लहान असतील तर त्यांना आपल्या आईचा त्रास बघवत नाही. आईला नक्की काय होतं हे त्यांना कळत नाही. आपण काय करावं हेही त्यांना समजत नाही.

आपल्या आईला कॅन्सरमुळे होणारा हा त्रास एका मेक्सिको मधल्या मुलाला देखील बघवला नाही. ‘जुलियन रॉयस कांटू’ हा सध्या अठरा वर्षांचा मुलगा आहे. जेव्हा तो तेरा वर्षांचा होता त्यावेळेस त्याच्या आईला दुसऱ्यांदा ब्रेस्ट कॅन्सर झाला.

 

 

हा कॅन्सर अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला होता. त्यामुळे त्यावर जे उपचार होत होते त्यामुळे देखील आईला त्रास होत होता.

किमोथेरपी, रेडिएशन हा त्रास अजून वेगळाच. आईचं वेदनेने विव्हळण त्याला पाहवत नव्हतं. सुदैवाने त्याची आई त्या कॅन्सर मधून वाचली, पण तिला आपले दोन्ही स्तन गमवावे लागले. त्यावेळेस त्याला इतकंच कळलं होतं, की जर ब्रेस्ट कॅन्सर आहे हे लवकरच समजलं असतं तर कदाचित आईला इतका त्रास झाला नसता.

तिथूनच मग जुलियनचं विचार चक्र सुरु झालं. आपल्या आईचा आरोग्य विमा उतरवलेला आहे, त्यामुळे कॅन्सरवरच्या उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची आर्थिक झळ आपल्या कुटुंबाला पोहोचली नाही. पण ज्या देशांमध्ये आरोग्याच्या सुविधा चांगल्या नसतील किंवा एखाद्या गरीब घरातील स्त्रीला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला तर तो त्रास आणि त्याचा खर्च ते कुटुंब कसं उचलू शकेल याचा तो विचार करू लागला.

यासंबंधी काही तरी करायला हवं याचा तो विचार करत होता. त्यावेळेस त्याच्या हेही लक्षात होतं की जर कॅन्सर आहे हे लवकर समजलं तर उपचार करणं सोपं जातं आणि त्या स्त्रीला फारसा त्रास होणार नाही. परंतु कधीकधी कॅन्सरच्या गाठी अगदी शेवटी येतात तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यामुळेच अशा पेशंटला उपचार घेतानाही त्रास होतो.

म्हणूनच जुलियने यासंदर्भात काय करता येईल याचा अभ्यास अगदी तेराव्या वर्षापासून चालू केला. त्याच्या पाच वर्षाच्या रिसर्च नंतर त्याने ब्रेस्ट कॅन्सर लवकरात लवकर ओळखू यावा याकरिता सेन्सर असलेल्या EVA ब्रा तयार केल्या.

 

 

जुलियन आणि त्याचे काही मित्र या सगळ्यांनीच या संदर्भात रिसर्च केला. यासंदर्भात या मुलांनी एक वेबसाईट काढली आहे. ज्याचा उद्देश हाच आहे की स्त्रियांना कॅन्सरच्या त्रासापासून मुक्ती मिळावी.

आता या ब्रा कशा काम करतात? आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही हे कसं ओळखलं जातं?

तर या ब्रा स्तनांचा नकाशा तयार करतात. त्यात स्तनाचं तापमान ,स्तनांचा पोत आणि स्तनांचा रंग याचं निरीक्षण केलं जातं. सर्वसाधारणपणे जर एखाद्या महिलेला कॅन्सर नसेल तर स्तनांचा पोत, रंग आणि तापमान यामध्ये कोणताही फरक पडणार नाही.

पण स्तनांमध्ये जर गाठ तयार होत असेल तर त्यावेळेस स्तनांचा तापमान वाढतं आणि तिथला रक्तप्रवाह देखील वाढलेला असतो. हे सर्वसाधारण परिस्थितीत म्हणजे साध्या ब्रा घातल्या तर लक्षातही येणार नाहीत.

 

 

पण जुलियनने बनवलेल्या ब्रा घातल्यास लगेच स्तनांमध्ये झालेले बदल दिसतात. कारण त्या ब्रा मध्ये २०० सेन्सर्स आहेत. ज्यामुळे स्तनांमध्ये गाठ आहे की नाही याचा डेटा तयार होईल. हा डेटा आपल्या मोबाईल मधील ॲपला कनेक्ट करता येतो, ज्यामुळे मोबाईल वर लगेच अलर्ट येतो. म्हणूनच एखाद्या स्त्रीला कॅन्सर होण्याची सुरुवात लगेच समजू शकेल आणि उपचार करणे सोपे जाईल. पुढचा वेदनादायक काळ स्त्रीच्या आयुष्यात येणार नाही.

या ब्रा तशा अजून मेडिकल ट्रायल मध्येच आहेत. त्याच्या भरपूर ट्रायल्स घेतल्यावरच त्या सगळ्यांसाठी उपलब्ध होतील पण तरीही वेबसाइटवरून लोक अशा ब्राची मागणी करत आहेत. यावरूनच स्त्रियांना स्तनाच्या कॅन्सरचा धोका किती आहे याची कल्पना येते.

पण जुलियनला त्याच्या या कामासाठी,’ ग्लोबल स्टुडन्ट अंत्राप्रेनर अवॉर्ड’ मिळाला आहे. जगभरातून आलेल्या पंचावन्न स्टुडन्ट पैकी जुलियन हा एकटाच असा विद्यार्थी आहे की ज्याने २०००० डॉलरचे बक्षीस जिंकले.

 

 

ब्रा द्वारे येणाऱ्या माहितीतून कॅन्सर आहे की नाही हे लगेच कळणार नाही. पण कोणत्या त्रासाची सुरुवात असेल तर लगेच त्याची जाणीव होईल.

कॅन्सर आहे की नाही हे डॉक्टरांकडे जाऊनच तपासावं लागेल. पण जुलियनच्या या शोधामुळे स्त्रियांना धोक्याची घंटा लवकर ऐकू येईल हे मात्र नक्की. फक्त आता त्या ब्रा लवकरात लवकर जगभरातील स्त्रियांसाठी लवकर उपलब्ध व्हाव्यात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version