' फणसाच्या गऱ्यांवर मनसोक्त ताव मारा, मात्र त्यानंतर चुकूनसुद्धा हे ५ पदार्थ खाऊ नका – InMarathi

फणसाच्या गऱ्यांवर मनसोक्त ताव मारा, मात्र त्यानंतर चुकूनसुद्धा हे ५ पदार्थ खाऊ नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोकणची भूमी ही अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या रांगा, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, काजू, कोकमाची झाडे भव्य समुद्र किनारा आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे तिथे खूप मोठ्या प्रमाणात अढळते, निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण प्रदेश म्हणजे स्वर्गच आहे.

असे म्हंटले जाते की कोकणातील माणसे ही फणसाच्या गर्‍यासारखी असतात. वर वर कितीही काटेरी असली तरी मनातून मात्र अतिशय गोड असतात. म्हणूनच की काय पण कोकणामधे फणसाची झाडे देखील खूप प्रमाणात आढळतात.

 

jackfruit IM

 

फणस किंवा जॅकफ्रूट ही सर्वात स्वादिष्ट भाज्यांमध्ये गणली जाते. फणसाची भाजीच नाही तर त्याच्या आतल्या पिकलेल्या बियाही शिजवल्या की खाता येतात. फणसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

अँटिऑक्सिडंट्स, लैक्टिक अॅसिड, व रफगेज भरपूर प्रमाणात असलेले जॅकफ्रूट हे पोट आणि वजन दोन्हीसाठी अतिशय चांगले आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लोह व व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा फणस चांगला म्हंटल्या जातो. रक्तातील इन्सुलिनची पातळी फणसामुळे सुधारते.

याचे सेवन केल्याने हृदयविकाराची समस्या दूर राहते आणि अशक्तपणामुळे होणाऱ्या आजारांपासून म्हणजेच रक्ताच्या कमतरतेपासून आपले संरक्षण होते. OnlyMyHealth नुसार, फणसाच्या सेवनाने हृदयविकार दूर राहतो.

 

jackfruit 3 IM

 

फायबर, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स जीवनसत्त्वे ए, सी आणि बी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम झिंक आणि फॉस्फरस इत्यादी पोषक तत्वे असणार्‍या फणस या फळाला खाताना आयुर्वेदानुसार काही गोष्टी त्यासोबत खाणे टाळले तर त्याचा पुरेपूर फायदा आपल्या शरीराला मिळू शकतो.

तर कुठल्या कुठल्या गोष्टी फणसासोबत खाऊ नयेत याची यादी आम्ही पुढे देत आहोत.

१) दूध :

 

 

फणस व दूध एकमेकांना पूरक नसल्याने फणस खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन कधीही करू नये. एवढेच नाही तर दूध प्यायल्यानंतर फणसाचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दोन्ही एकत्र सेवन केल्याने पचनसंस्थेशी व त्वचेशी संबंधित समस्या व आजार उद्भवू शकतात जसे की दाद, खरुज, खाज सुटणे, एक्जिमा आणि सोरायसिस.

२) मध :

 

honey inmarathi

 

आयुर्वेदानुसार मधासोबत फणसाचे सेवन केले देखील आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. फणस खाल्ल्यानंतर मध खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. विशेषतः पिकलेले फणस खाल्ल्यानंतर मधाचे सेवन करण्याची घाई करू नये.

३) पपई :

 

papaya-inmarathi

 

फणसाची भाजी किंवा शिजवलेले फणस खाल्ल्यानंतर पपई खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.

४) पान :

 

paan IM

 

आपल्यापैकी बर्‍याच जणांनी आपल्या आजी आजोबांना किवा वडील धार्‍या लोकांना जेवण झाल्यानंतर पान खाताना पहिले असेल परंतु फणसाची भाजी खाल्ल्यानंतर पान सुपारीचे सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहोचते.

पान व फणसाच्या एकत्र सेवनाने शरीरात अनेक समस्या उद्भवन्याची शक्यता असते

५) भेंडी :

 

bhindi IM

 

जर तुम्ही फणस आणि भेंडीची भाजी या दोघांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात त्वचेच्या समस्या, पांढरे डाग यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?