Site icon InMarathi

हिजाब हलाल नंतर मुस्लिमांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायावर बंदी?

chicken seller im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत हा सर्वधर्म समभाव असणारा देश आहे. तरीही धर्मावरून राजकारण रंगलं नाही, असा कदाचित एकही महिना जात नसेल. काही दिवसांपूर्वी हिजाबवरून कोर्टातगेलेलं प्रकरण असो, किंवा नुकतीच राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायची केलेली मागणी आणि त्यावरून पेटलेलं राजकारण असो. कारणावरून घडणारे धार्मिक वाद भारतीयांसाठी नवीन नाहीत.

 

 

अशाच वाद आणि मतभेदांच्या यादीत आणखी एका वादाची भर पडली आहे. हिजाबचा वाद संपला, हलालवरून राजकारण घडून गेलं, आणि आता एका विशिष्ट व्यवसायातील ‘मुस्लिम मक्तेदारी’ संपवण्याचं आवाहनच केलं जात आहे. नेमका कुठला आहे हा व्यवसाय, ज्यात मुस्लिम धर्मियांची मोठी मक्तेदारी असल्याचं मानलं जातं? ही मक्तेदारी संपवण्याची मागणी कोण आणि कशासाठी करतंय, तेच आज जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फळांच्या व्यवसायात…

हलाल आणि मशिदीवरील भोंगे याविरोधात हिंदूंनी वाच्यता केल्यावर तो वादाचा मुद्दा ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. असं असतानाच, कर्नाटकात मात्र मुस्लिम धर्मियांची फळांच्या व्यवसायातील मक्तेदारी संपुष्टात आणावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. फळांच्या व्यवसायावर मुस्लिमांची मक्तेदारी असल्याचं अनेकदा अगदी सहजपणे पाहायला मिळतं. मात्र त्यांनी या व्यवसायात असणं हा एकमेव मुद्दा त्रासाचा राहिला नसून, या मक्तेदारीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून गैरवर्तन होत असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. फळ व्यवसायातील त्यांची मक्तेदारी संपावी अशी मागणी होण्याचं कारण काहीसं निराळं आहे.

 

‘थुंकी जिहाद’चा किळसवाणा प्रकार…

फळांची आणि ब्रेडची विक्री करणारे मुस्लिम लोक या वस्तू विकण्याआधी त्यावर थुंकत असल्याचं पाहिलं असून, हा त्यांच्या ‘थुंकी जिहाद’चा प्रकार असल्याचं मत कर्नाटकमधील हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक चंद्रू मोगर यांनी व्यक्त केलं आहे.

 

 

हा मुद्दा ट्विटरवर लावून धरत, त्यांनी हिंदूंना एक आवाहन केलं आहे. हिंदूंनी हिंदू फळविक्रेत्यांकडूनच फळं घ्यावीत असं आवाहन चंद्रू यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. मुस्लिमांची या क्षेत्रातील मक्तेदारी या गैरवागणुकीला कारणीभूत असल्याचं सुद्धा त्यांचं मत आहे.

भाजपचे मंत्री महोदय म्हणतात…

कर्नाटक राज्य सरकारमधील शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी सुद्धा या विषयावर आपलं मत मांडल्याचं पाहायला मिळतंय. एका विशिष्ट संघटनेकडून हा वाद भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारा भाजप आणि त्यातील कार्यकर्ते व नेतेमंडळी यांचा यात सहभाग नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

‘आमच्यासाठी इतर जाती-धर्मातील लोक भावंडांप्रमाणे’ असल्याचं ते म्हणतात. भारतीय बांधवांच्या विरोधात ते किंवा त्यांचा पक्ष नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकार संपूर्णपणे या गोष्टीच्या विरोधात असून, धार्मिक आणि जातीय सलोखा राखणं हेच आमचं उद्दिष्ट आहे, असं मत सुद्धा मंत्री महोदयांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय.

माजी मुख्यमंत्रीही व्यक्त झाले…

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सुद्धा या विषयवार मतप्रदर्शन केलं आहे. “मुस्लिम बांधवांकडून आंबे किंवा इतर फळांची खरेदी न करणं हे देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील पाऊल असेल” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मुस्लिम व्यक्ती आंबे विकत असली, तरी ते आंबे हिंदूंकडूनच खरेदी केलेले असतात. त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतो

शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी हा व्यवसाय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच हिंदूंनी ही फळं घेण्याचा विरोध करणं हा देशद्रोह ठरतो.

 

 

हिंदूंनी मुस्लिम धर्मीय व्यक्तीकडून फळं घेऊ नयेत असं आवाहन करणं, हे देश आणि शेतकरी विरोधी असल्याचं मत सुद्धा कुमारस्वामी यांनी मांडलं. महाराष्ट्रात मशिदीच्या भोंग्यावरून राजकारण पेटलेलं असताना, कर्नाटकात फळ विक्रीच्या व्यवसायावरून सुद्धा एक वेगळंच राजकीय नाटक रंगलं आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version