' पेप्सीचं ६ व्या क्रमांकाचं ‘नौदल’ त्यांनी सोडायुक्त गोड पाणी बनवण्यासाठी विकलं! – InMarathi

पेप्सीचं ६ व्या क्रमांकाचं ‘नौदल’ त्यांनी सोडायुक्त गोड पाणी बनवण्यासाठी विकलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा अगदी कडक हिवाळा असो बाटलीबंद शीतपेय म्हणजेच कोल्ड्रिंकला नेहमीच वाढती मागणी असते. काहींना सोडायुक्त कोल्ड्रिंक आवडतात तर काहींना विना सोड्याची. सध्या बाजारात परदेशी आणि देशी कोल्ड्रिंक्सचा सुळसुळाट आहे. त्यांच्यात जीवघेणी स्पर्धाही सुरू आहे.

मात्र काही वर्षांपूर्वी म्हणजे खरं सांगायचं तर ६०-६५ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्ड्रिंक्सना एवढा भाव नव्हताच मुळी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोल्ड्रिंक कंपनीवाले इतर देशांमध्ये जाऊन मार्केट काबीज करण्याची स्वप्नं बघत असतानाचा तो काळ. पण भारतात जागतिकीकरण यायच्या २ वर्षं आधीच एका अमेरिकन कोल्ड्रिंक कंपनीकडं स्वतःच्या मालकीचं नौदल होतं, होय… स्वतःच्या मालकीचं नौदल!

 

cold drinks IM

 

एखाद्या कोल्ड्रिंक कंपनीकडं स्वतःच्या मालकीचं नौदल असण्याचं काम काय? स्पर्धा होती मान्य आहे.. पण त्यांच्यात काय खरंखुरं युद्ध लढलं जाणार नसतानाही युद्धनौका आणि पाणबुड्यांची गरज काय? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या लेखात मिळतील…त्यामुळे लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा!

मुळात पेप्सीचा रशियात शिरकाव झालाच कसा?

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर निकिता ख्रुश्चेव्ह यांच्या अधिक उदारमतवादी धोरणाखाली तेव्हाच्या युएसएसआरनं अमेरिकेशी हातमिळवणी केली, म्हणजे थोडक्यात शीतयुद्ध संपल्याची घोषणा केली.

 

Coldwar.Inmarathi1
pindex.com

 

निकिता ख्रुश्चेव्ह यांना अमेरिकेत आमंत्रितही केलं गेलं. त्यामुळं अमेरिकन कंपनींना रशियासारखी मोठी बाजारपेठ खुली झाली. यासाठी अमेरिकेचं मॉस्कोमध्ये आणि युएसएसआरचं न्यू यॉर्कमध्ये प्रदर्शन भरवलं गेलं. युएसएसआरमधील लोकांना भांडवलशाही देशात राहण्याची अनुभूती मिळावी आणि अमेरिकेतील लोकांना साम्यवादी देशात राहण्याची अनुभूती मिळावी हाच हेतू होता.

अमेरिकेचं मॉस्कोमधलं प्रदर्शन १९५९ च्या उन्हाळ्यात झालं. त्यावेळी निकिता ख्रुश्चेव्ह आणि अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी किचन डिबेटमध्ये आपापल्या सिस्टीमच्या गुणवत्तेवर चर्चा केली.

 

khruschev and nixon IM

असं म्हटलं जातं की यानंतरच आयबीएम, डिस्ने यांसारख्या अमेरिकन कंपन्यांना रशियन बाजारपेठ खुली झाली. पण या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री पेप्सी कंपनीचे एक्सिक्युटीव्ह डोनाल्ड केंडल यांनी निक्सन यांना असं सुचवलं होतं की त्यांनी ख्रुश्चेव्ह यांना किचन डिबेटनंतर पेप्सी पिण्यास द्यावी.

निक्सन यांनी अगदी तसंच केलं आणि पेप्सीचा रशियात शिरकाव झाला. क्वोरामधल्या एका प्रश्नोत्तराच्या सेक्शनमध्ये असं म्हटलं आहे की निक्सन आणि ख्रुश्चेव्ह यांच्यात प्रदर्शनादरम्यान वादावादी झाली होती.

त्याचवेळी केंडल यांनी मधे पडून ख्रुश्चेव्ह यांना पटकन पेप्सी प्यायला दिली होती. त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी पेप्सीला परवानगी दिली. मात्र झालेला वाद केंडल आणि निक्सन यांनी आधीच ठरवलेला होता असंही त्यात म्हटलं आहे.

 

pepsi IM

मग नौदलाची काय भानगड?

रशियन मार्केटमध्ये पेप्सी विकायला सुरुवात तर झाली. पण यानंतर पेप्सीसमोर मोठी समस्या उभी राहिली. पेप्सीसाठी मिळणारा रुबल (रशियन करन्सी) हा रशियाखेरीज बाकी कुठंच चालत नव्हता. त्यामुळं पेमेंट म्हणून रुबल घेण्याऐवजी पेप्सीनं पारंपरिक पर्याय स्वीकारला.

वस्तूच्याऐवजी वस्तू. त्याप्रमाणं त्यांनी पेप्सीच्या बदली घेतला तो जगमान्य असणारा व्होडका. काही वर्षं ही देवाणघेवाण उत्तम चालू होती. मात्र १९८० मध्ये रशियानं अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यामुळं अमेरिकेनं रशियन वस्तूंवर बंदी घातली.

त्यामुळं रशियाचा व्होडका अमेरिकेत बंद झाला आणि पेप्सीसमोर पुन्हा प्रश्न निर्माण झाला. यावेळी त्यांनी वेगळ्या स्वरूपात त्यांचे पैसे मागितले. मग रशियानं काय करावं? पेप्सीच्या बदल्यात त्यांनी कंपनीला १७ पाणबुड्या आणि ३ युद्धनौका दिल्या.

 

pepsi 3 IM

 

हे भंगार विकून पेप्सीला उत्तम पैसे मिळाले. लोक कशासाठी काय काय करतील काही सांगता येत नाही. सोडायुक्त गोड पाण्यासाठी रशियानं नौदलाचा काही हिस्साच काढून टाकला. यानंतर पेप्सीनं पुढचं पाऊल टाकलं.

२००० सालापर्यंत पेप्सी पुरवण्याचा मात्र त्याबदल्यात रशियामध्ये पिझ्झा हट उघडण्याचा परवाना पेप्सीनं १९९० च्या करारात मिळवला. हा करार ३०० मिलियन डॉलर्सचा म्हणजे आपल्या भारतीय भाषेत २२ अब्ज ६४ कोटी ७९ लाख ४५ हजारांचा होता.

१९९० मध्येच युएसएसआरचं विभाजन झालं आणि पेप्सीची मोनोपोली संपली. यावेळी त्यांचा कट्टर स्पर्धक कोकोकोलानं रशियन बाजारपेठेत उडी घेतली.

 

pepsi ships IM

 

१९८९ च्या करारानुसार, पेप्सीकडे जगातल्या सहाव्या क्रमांकाचं नौदल होतं. पण असं म्हटलं जातं की त्यांनी केवळ बाटलीबंद सोडायुक्त साखरेचं पाणी बनवण्यासाठी ते नौदल विकलं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?