आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
घड्याळ हे माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आजच्या काळात घड्याळाला माणूस नाही आणि माणसाला घड्याळ चालवतं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. घड्याळे दोन प्रकारची असतात एक २४ ताशी आणि दुसरे १२ ताशी. १२ ताशी घड्याळामध्ये AM आणि PM असे दोन भाग पडतात.
अनेकदा आपण AM आणि PM हे डिजीटल घडाळ्यामध्ये पाहतो, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की “वेळ आणि कालावधी” सांगणाऱ्या या शॉर्ट फॉर्मचा अर्थ काय होतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
AM (Ante Meridiem) चा अर्थ सकाळ आणि PM (Post Meridiem)चा अर्थ मध्यानंतर असा होतो.
यामुळे २४ तासांच्या एका दिवसाला दोन कालावधीत विभागले जाते. AM ज्याचा अर्थ मध्याचा पहिला भाग आणि PM ज्याचा अर्थ मध्याचा पुढचा भाग असा होतो. संख्येच्या दृष्टीने प्रत्येक कालावधीत १२ तास असतात. त्यामुळे AM आणि PM शब्द वेळ आणि कालावधीशी जोडलेले आहेत. AM आणि PM हे दोन्ही शब्द लॅटीन भाषेचे शब्द आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :-
घड्याळ मानवजातीच्या आरंभिक अविष्कारांपैकी एक आहे.घड्याळ शब्द डच, उत्तर फ्रांसिसी आणि मध्यकालीन लॅटीनचे केल्टिक शब्द क्लेगन आणि क्लोक्का पासून घेतला आहे. त्याचा अर्थ होतो “घंटी”. हे उपकरण दिवसाच्या प्राकृतिक दिवस/रात्रीला समजण्यासाठी डिझाइन केले गेले होते. हे दोन चक्रांमध्ये बनवले गेले होते, कारण त्यावरून सूर्याची स्थितीचा आढावा घेता येणार होता आणि रात्री चंद्र- ताऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेणे शक्य होणार होते.
–
- जाहिरातीत घड्याळातील वेळ नेहमी १०:१० का असते? कारण जाणून घ्या
- भारतीयांच्या मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या पहिल्या स्वदेशी कंपनीचा उदयास्त!
–
इजिप्तच्या लोकांनी १२ च्या आधाराचा उपयोग करून सर्वात प्रथम दिवस समान २४ भागांमध्ये विभागला. घड्याळाचे पूर्ण प्रकरण आणि विभागलेला वेळ आणि कालावधी फक्त पृथ्वीच्या फिरण्याला प्रतिबिंबित करण्यासाठीच होता, म्हणून प्राचीन काळात सौर घड्याळाचा प्रयोग अक्षांशच्या माहितीच्या आधारावर सौर वेळ मापण्यासाठी करत होते. जे ६ हजार वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये बनवले गेले होते.
१२ तासांच्या घड्याळामध्ये १२ PM व Noon ची अस्पष्टता:-
१२ PM किंवा १२ AM बोलणे चुकीचे आहे, कारण १२ ही वेळ ना दुपारच्या नंतर असते ना दुपारच्या आधी असते. त्यामुळे १२ च्या या तासांना मध्यरात्र आणि मध्यान्ह म्हणून ठरवण्यात आले असावे.
दिवसाच्या प्रत्येक तासाच्या नंतर (मध्यरात्री आणि मध्यान्ह सोडून) AM किंवा PM जोडले जाते, त्यामुळे हे समजते की ती वेळ सकाळची होती, दुपारची होती की संध्याकाळची होती.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.