आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पूर्वी फोन, मोबाईल नव्हते तेव्हा संपर्क साधण्याचं एकमेव साधन होते ते म्हणजे पत्रव्यवहार, माणूस आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना अगदी भरभरून लिहायचा मग त्यानंतर आपल्या लाडक्या व्यक्तीच्या उत्तराची वाट बघायचा. आज पोस्ट खात मागे जरी पडले असले तरी एकेकाळी याच पोस्टात नोकरीसाठी रांग लागत असे.
जसा खासगी पत्रव्यवहार होत असे तसेच राजकीय पत्रव्यवहार देखील आपण पहिला. अनेक वर्षांपासून हा पत्रव्यवहार नावाचा प्रकार सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील नेत्यांचा सुरु असलेला पत्रव्यवहार आपण बघत आलो आहोत मात्र तिकडे पाकिस्तानमध्ये देखील एका पत्रामुळे इम्रान खान गोत्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की इम्रान खानचं सरकार पडणार आणि तो दिवस उजाडला जेव्हा त्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला, आणि इथपासूनच तिथल्या राजकीय घडामोडींना एक वेगळे वळण येण्यास सुरवात झाली. इम्रान खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विरोधकांकडून होतेय , नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
इम्रानवर नेमके काय आरोप केले जात आहेत?
पीएमएल-एन पक्षाच्या उपाध्यक्षा मॅरियम नवाज यांनी असा आरोप केला आहे की जनतेची दिशाभूल करण्यासाठी या पत्राच वापर केला जात आहे. आणि या पत्राचा संबंध थेट विदेशी षडयंत्राशी केला जात आहे. त्या पुढे असं म्हणाल्या की जर इम्रान खान यांना कोणतेही धमकीवजा पत्र मिळाले असेल तर ते सर्व जगासमोर का आणत नाही? त्यामुळे इम्रान खान यांना कोणतेही असे पत्र मिळाले नसून त्यांनी स्वतःच हे पत्र विदेश मंत्रालयातून लिहून घेतले असून या पत्राला परदेशी षडयंत्र असे नाव दिले.
मरियम नवाज यांनी दूतावासाचा उल्लेख करत इम्रानवर निशाणा साधत म्हणाल्या की अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाला हे धमकीवजा पत्र मिळाले आहे, तर मग त्या दूतावासाला अमेरिकेस का पाठवण्यात आले? त्याला सुप्रीम कोर्टासमोर हजर करा. तसेच इम्रान खान यांनी जे पत्राचे नाटक केले आहे त्याच्या आदल्या दिवशी या दूतावासला का पाठवण्यात आले? याचे उत्तर इम्रान यांनी द्यावे.
आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप बाहेर येऊ नयेत म्हणून हे सगळी नाटक सुरु आहेत, असा आरोप मॅरियम यांनी केला, त्या नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत. तसेच या प्रकारावर लष्करी कारवाई व्हावी अशी मागणी होताना दिसून येत आहे.
–
३ लग्नं, असंख्य लफडी आणि क्रिकेट : राजकारणी इम्रान खानचा वादग्रस्त प्रवास!
इम्रान खान सरकार पडल्याचं खापर ज्याच्यावर फोडतोय, त्याचं आहे भारताशी कनेक्शन?
–
त्या पत्रात नेमकं काय आहे?
काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी इस्लामाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात या पत्राचा उल्लेख करून हे पत्र अमेरिकेकडून एक धमकीवजा पत्र आले आहे असे सांगितले, आमचं सरकार अस्थिर करण्यामागे विदेशी शक्तींचा हाथ आहे असा इम्रान यांनी केला, मात्र काही पाकिस्तानी पत्रकारांचं म्हणणं आहे की हा पेपर म्हणजे मूर्खपणा असून इम्रान खान खोटं बोलत आहे.
ज्येष्ठ पत्रकार रिझवान रझी असं म्हणाले की अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत आहे, तो खार तर इम्रान खान यांच्या पक्षातला एक सदस्य आहे आणि त्यांचा खास मित्र आहे. ते पुढे म्हणाले की राजदूताला एका मिशनवर पाठवण्यात आले होते ज्याचं काम होते बायडेन सरकारने इम्रानशी संपर्क साधावा जे काही शक्य झाले नाही म्हणून यांनी शक्कल लढवून बायडेन प्रशासनाला इम्रान खान सरकार बद्दल काय वाटते याचा एक अंतर्गत मेमो लिहला ज्यात अनेक गोष्टी अतिशयोक्ती होत्या. त्यामुळे अशा प्रकारच्या पत्राला कोणताच अर्थ नाही.
काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब फोडला होता, पाकिस्तानमध्ये देखील अशा प्रकारचा लेटर बॉम्ब फुटल्याने इम्रान यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.