आयएनएस विक्रांतवरून वाद पेटलाय; पण या युद्धनौकेबाबतची वैशिष्ट्ये ठाऊक आहेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे ज्यात त्यांनी आरोप केले आहे की, किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून लोकांकडून सुमारे ५० कोटी रुपये गोळा केले होते, पण ते पैसे त्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा केले नाहीत.
तसेच त्यांनी पुढे प्रश्न निर्माण केला, की ‘ईडी आणि इतर एजन्सी आता कुठे गेल्या आहेत?’ केंद्र सरकार द्वारे विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. पण जेव्हा आपल्या नेत्यांचा प्रश्न येतो तेव्हा भाजप मौन बाळगतो, असेही आरोप त्यांनी केले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आईएनएस विक्रांत (R11) ही भारतासाठी कुठल्याही वरदानापेक्षा काही कमी नव्हती. सुरुवातीला ही युद्धनौका ब्रिटीश रॉयल नेव्हीमध्ये HMS हर्क्युलस या नावाने ओळखली जायची, दुसरे महायुद्ध सुरू असतांना या जहाजाचे बांधकाम सुरू झाले होते, परंतु युद्ध संपल्यानंतरही तिचे बांधकाम पूर्ण झाले नाही आणि भारताने असेच अपूर्ण बांधलेले जहाज १९५७ विकले गेले, ज्याचे १९६१ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि तिचे नाव बदलून ‘विक्रांत’ असे ठेवले.
आईएनएस विक्रांत (R11) ला ४ मार्च १९६१ रोजी बेलफास्टमध्ये युनायटेड किंगडममधील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी भारतीय नौदलात शामिल केले होते.
विक्रांत हे नाव संस्कृत शब्द विक्रांत वरून घेतले गेले आहे. ज्याचा अर्थ “पलीकडे पाऊल टाकणे”, म्हणजेच “धाडसी” असे आहे. या आईएनएस विक्रांतची एकूण लांबी ७०० फूट होती, तर रुंदी १२८ फूट होती. तसेच आईएनएस विक्रांतला “लाइट फ्लीट कॅरियर” म्हणून ओळखले जात असे. औपचारिकपणे, आईएनएस विक्रांत ही मॅजेस्टिक-श्रेणीच्या विमानवाहू जहाजांतर्गत येते.
कुठलेही यंत्र चालवण्यासाठी ऊर्जेची गरज असते. त्यामुळे प्रत्येक यंत्रामध्ये ऊर्जा तैयार करण्यासाठी एक प्रणाली असते. हे जहाज एकूण ४०,००० हॉर्सपावर (30,000 kW) पर्यंत ऊर्जा निर्माण करु शकत होते. याने या जहाजाला २५ नॉट्सचा वेग मिळत असे, जो सुमारे ४६ किमी/तास आहे. आईएनएस विक्रांतची सुमारे ११०० लोकांना नेण्याची क्षमता होती.
या युद्धनौकेने युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग १९७१ च्या भारत-पाक युद्धात घेतला होता. यावेळी आईएनएस विक्रांतच्या मदतीने हवाई हल्ले सुरू करण्यात आले आणि मुख्यतः हॉकर सी या फायटर – बॉम्बर्स विमानांनी पाकिस्तानचे अतोनात नुकसान केले होते.
या युद्धनौकाच्या सहाय्याने पाकिस्तानी लष्कराच्या जमिनीवरील हालचालींना दडपून टाकण्यात आणि पूर्व पाकिस्तानला हवाई आणि समुद्रमार्गे होणारा अत्यावश्यक पुरवठा रोखण्यामध्ये भारत यशस्वी झाला.
परंतु आपण या विक्रांत (R11) आणि विक्रांत (IAC-1) मध्ये गोंधळून जाऊ नका. विक्रांत (R11) हा १९९७ मध्येच निवृत्त झाला आहे तर विक्रांत (IAC-1) याचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले असून, २०२२ पर्यंत भारतीय नौदलाच्या सेवेत शामिल होईल असे अंदाज आहे.
चला तर विक्रांत (IAC-1) या युद्धनौकेविषयी अधिक जाणून घेऊया :-
१) ही भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असून हिचे वजन ४० हजार टन आहे. हे जहाज २०२२-२३ मध्ये नौदलाकडे अधिकृतपणे सुपूर्त केले जाईल, सध्या याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेणे सुरु आहे. या चाचण्यांमध्ये हे जहाज किती शक्तिशाली, टिकाऊ, मजबूत आणि विश्वासार्ह आहे हे बघितले जाते.
२) आयएनएस विक्रांत वर शक्तिशाली टर्बाइन बसवण्यात आले आहे, याद्वारे १.१० लाख अश्वशक्ती ऊर्जा निर्माण केली जाते. या युद्धनौकेवर मिग-२९ लढाऊ विमान, १० Kmaov Ka-31 आणि MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टर स्क्वाड्रन असतील. तसेच ही नौका बराक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असणार आहे, बराक मिसाईल जमिनीवरून हवेत मारा करण्यात सक्षम आहेत.
३) आयएनएस विक्रांतची लांबी ८६० फूट, बीम २०३ फूट, खोली ८४ फूट आणि रुंदी २०३ फूट आहे. तसेच तिचे एकूण क्षेत्रफळ २.५ एकर आहे. हे जहाज ताशी ५२ किलोमीटरच्या वेगाने प्रवास करू शकते.
यात एका वेळी १९६ नौदल अधिकारी आणि इतर ११४९ खलाशी आणि हवाई दलाचे कर्मचारी सामावून घेऊ शकतात. तसेच या जहाजवार अत्याधुनिक तोप आणि मशीन गन ही लावण्यात आल्या आहेत.
४) आयएनएस विक्रांतवर एकाचवेळी ३६-४० लढाऊ विमाने तैनात केली जाऊ शकतात. या नौकेवर २६ मिग-२९ के आणि १० कामोव्ह का-31, वेस्टलँड सी किंग किंवा ध्रुव हेलिकॉप्टर तैनात केले जाणार आहे. याची फ्लाइट डेक १.१० लाख स्क्वेअर फूट आहे, ज्याच्या मदतीने लढाऊ विमाने सहज टेक ऑफ किंवा लँडिंग करू शकतात.
—
- युद्धनौका INS Vikrant – एका आकर्षक bike च्या रूपात !
- मनसेच्या नेत्याने लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा लावली आणि…
—
५) आईएनएस विक्रांतचे नाव ५० वर्षांपूर्वी १९७१ च्या युद्धात वापरण्यात आलेल्या युद्धनौकेवरून ठेवण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे उत्तम उदाहरण आहे.
या युद्धनौकेवरील ७६ टक्के भाग स्वदेशी आहे. पुढच्या वर्षी ती पूर्णपणे तयार युद्धनौका असेल, म्हणजे त्यात शस्त्रे, क्षेपणास्त्रे इ. तैनात केली जातील.
६) तसेच आज बातमी आली आहे, की या नौकेवर अमेरिकी F-18 विमानांची चाचणी घेतली जाणार आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved