आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एनाबेले हा हॉलिवूडचा हॉरर चित्रपट तुम्हाला माहित असेलच. या चित्रपटाने आणि त्याचाच दुसरा भाग असलेल्या एनाबेले क्रिएशन या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच घाबरवले.
या चित्रपटांमध्ये दाखवलेली बाहुली खूप विचित्र आणि भीतीदायक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, एनाबेले हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.
या चित्रपटामध्ये जसे लोकांना ही बाहुली त्रास देते, तसेच खऱ्या आयुष्यामध्ये देखील झाले आहे.
चित्रपट फक्त बघूनच आपल्याला ते एवढे भयानक वाटते, मग विचार करा की, खऱ्या आयुष्यामध्ये ज्यांनी हे अनुभवले असेल त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
चला मग जाणून घेऊया खऱ्या आयुष्यामधील या एनाबेलेविषयी…
गोष्टीची सुरुवात:
१९७० मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणारी डोना जी तिची मैत्रीण अनंगीबरोबर एका अपार्टमेंट राहत होती. त्यांच्याबरोबर लु नावाचा मुलगा सुद्धा राहत असे.
डोनाच्या आईने तिच्या वाढदिवसाला तिला एन्टिक बाहुली गिफ्ट केली होती. पण तिच्या आईला आणि तिला माहित नव्हते की, काही दिवसामध्येच ती बाहुली त्यांचे जगणे कठीण करून ठेवेल.
डोना आपल्या आईने दिलेली बाहुली आपल्या बेडवर एका कोपऱ्यात सजवून ठेवत असे.
काही दिवसांमध्येच डोनाला आणि तिच्या मैत्रिणीला त्या बाहुलीचा वाईट अनुभव येऊ लागला. त्यांच्या लक्षात आले की, बाहुली स्वतःहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते.
त्या दोघी ज्या ठिकाणी बाहुलीला ठेवून जात असत, घरी आल्यावर बाहुली त्या जागेवर नसायची. ती बाहुली दुसऱ्याच ठिकाणावर असे.
बाहुलीला एखाद्या रुममध्ये ठेवून जर दरवाजा बंद करून जरी त्या दोघी बाहेर गेलेल्या असल्या, तरीसुद्धा ती बाहुली आपली जागा बदलून रुमच्या बाहेर जात असे.
हळूहळू त्यांना रुममध्ये काही चिठ्या मिळू लागल्या, त्यांच्यावर ‘हेल्प मी’ असे लिहिलेले असायचे. ते अक्षर एखाद्या लहान मुलाचे असावे.
त्यानंतर त्यांनी एक आत्माशी संवाद साधणाऱ्या एका व्यक्तीला बोलावले. त्या व्यक्तीने त्यांना सांगितले की, या बाहुलीमध्ये एका लहान मुलीचा आत्मा आहे, तिचे नाव एनाबेले होते.
ती मुलगी पहिले इथेच खेळायची आणि तिचा मृत्युदेखील येथेच झाला आहे. तिला डोना आवडते आणि तिला तिच्याबरोबर राहायचे आहे. डोनाने तिला ठेवण्यास होकार दिला.
थोडे दिवस गेल्यानंतर परत डोनाला भयानक अनुभव यायला सुरुवात झाली. तिच्याबरोबर राहणाऱ्या लु ने सांगितले की, या बाहुलीमध्ये राक्षसी ताकद आहे आणि तिला जवळ ठेवणे खूप भारी पडू शकते.
एकदा लु वर त्या बाहुलीने हल्ला केला. हे त्याने डोना आणि अनंगीला सांगितले पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हळूहळू डोनाला लक्षात आले की, त्या बाहुलीमध्ये कोणत्याही लहान मुलीचा आत्मा नाही आहे.
एके दिवशी दुपारी लु आणि अनंगी घरात गप्पा मारत असताना. त्यांना डोनाच्या रूममधून किंचाळण्याचा आवाज आला, परंतु डोना तर घरात नव्हती.
त्या दोघांनी घाबरतच तिच्या रुममध्ये प्रवेश केला, पण तिथे बाहुली सोडून कोणीच नव्हते.
बाहुलीने अचानक लु वर हल्ला केला आणि त्याला जखमी केले. या घटनेमुळे लु शॉकमध्ये गेला.
–
- म्हणे… हे १० हॉरर चित्रपट भयानक थरकाप उडवणाऱ्या खऱ्या घटनांवर आधारित आहेत!
- टेडी बिअर नाव आलं कोठून? आवडतं टॉय तर कधी प्रेमाचं प्रतिक; एक रंजक गोष्ट
–
पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेशन
लु वर हल्ला झाल्यानंतर डोनाला लक्षात येते की, ही मुलगी शापित आहे आणि तिच्यामध्ये राक्षसी आत्मा आहे.
डोना मदत मिळवण्यासाठी एक बिशप “फादर हेगन” कडे जाते. फादर हेगनला ती बाहुली शापित असल्याचे कळते. म्हणून तो डोनाला आपल्यापेक्षा वरिष्ठ “फादर कुक” कडे पाठवतो.
फादर कुक इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पॅरानॉर्मल एक्सपर्ट वॉरेन दाम्पात्याला (एडवर्ड वॉरेन और लॉरेन रीटा वॉरेन) बोलावतात.
वॉरेन दाम्पत्य त्या तिन्ही मित्रांचे म्हणणे ऐकतात आणि एक आठवडा त्या बाहुलीच्या व्यवहाराचे निरीक्षण करतात.
तेव्हा त्यांना समजते की, त्या बाहुलीला डोनाच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी त्या बाहुलीने एवढा सर्व खटाटोप केला होता.
तिला लु आवडत नसे म्हणून तिने त्याचावर हल्ला केला होता आणि त्यांनी बोलवलेल्या माणसाला सुद्धा त्या बाहुलीने खोटे सांगितले.
शापित बाहुली ओकलट म्युझियम पोहोचणे
त्या घराची त्या शापित बाहुलीपासून सुटका करण्यासाठी वॉरेन दाम्पत्य फादर कुकबरोबर मिळून एक अभिमंत्रित क्रिया करतात आणि बाहुलीला आपल्याबरोबर घेऊन जातात.
गाडीतून जाताना त्यांच्या लक्षात येते की, गाडीचे पॉवर ब्रेक और स्टेरिंग काम करत नाहीत. ते बाहुलीवर पवित्र जल टाकतात, त्यामुळे ती शांत होते आणि वॉरेन दाम्पत्य सुखरूप घरी पोहोचतात.
एक दोन दिवसानंतर बाहुली परत पहिल्यासारखी करू लागते.
घराबाहेर जाताना हे दाम्पत्य त्या बाहुलीला ज्या ठिकाणी ठेवत असत, घरी आल्यावर ती बाहुली त्या जागेवर नसून भलत्याच ठिकाणी त्यांना मिळत असे. त्याच दरम्यान एक घटना घडते.
एकदा फादर जॅसन वॉरेनला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये येतात आणि त्या बाहुलीला उचलून बोलतात की, ही तर फक्त एक बाहुली आहे आणि ही कोणाला नुकसान करू शकत नाही.
घरी जाताना त्यांच्या मोठा अपघात होतो आणि ते जखमी होतात. त्यांनतर वॉरेन त्या बाहुलीला एका अभिमंत्रित बॉक्समध्ये टाकतात आणि आपल्या म्युझियममध्ये ठेवतात.
–
- बाहुलीशी संबंध आणि तिलाच जोडीदार मानणं! असा हा पठ्ठ्या विचित्र की वासनांध?
- …म्हणून या भारतीय दिग्दर्शिकेने हॅरी पॉटरच्या दिग्दर्शनाची ऑफर नाकारली, वाचा!
–
त्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर बाहुली कोणतीही हालचाल करायची नाही. पण त्यानंतर सुद्धा वॉरेन त्या बाहुलीला अजून एकाच्या मृत्यूचे कारण मानतात.
एकदा एक तरुण आणि त्याची प्रेमिका वॉरेन यांचे म्युझियम पाहण्यासाठी आले. ज्यावेळी वॉरेनने त्यांना या बाहुलीची गोष्ट सांगितली तेव्हा त्या तरुणाने या बाहुलीची खूप मस्करी केली.
तो तरुण बोलला की, जर ही बाहुली एखाद्या माणसाच्या शरीरावर घाव करू शकते तर मी नक्कीच ते अनुभवू इच्छितो.
वॉरेनने त्या दोघांना तिथून बाहेर जाण्यास सांगितले. म्युझियमच्या बाहेर गेल्यानंतर काही वेळातच त्या दोघांचा अपघात होतो, त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू होतो आणि ती मुलगी गंभीर जखमी होते.
वॉरेनचे म्हणणे होते की,
“तुम्ही कधीही राक्षसी ताकदीला आव्हान करू नका, कारण त्या शक्ती माणसापेक्षा खूप शक्तिशाली असतात.”
एड और लॉरेन वॉरेन
एडवर्ड वॉरेन आणि लॉरेन रीटा वॉरेन अमेरिकी पॅरानॉर्मल एक्टिविटीज इन्वेस्टिगेटर्स होते.
एडवर्ड दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिका नौसेनेचे अधिकारी होते. त्यांची पत्नी लॉरेन रीटा वॉरेन पॅरानॉर्मल एक्सपर्ट होती.
या दाम्पत्यांनी ‘द वॉरेंस ऑकल्ट’ नावाचे म्युझियम उघडले होते आणि त्यांनी आतापर्यंत जवळपास १०,००० भूतांची प्रकरणे सोडवली होती. एडवर्ड वॉरेनचा २००६ मध्ये मृत्यू झाला.
आजही ती बाहुली त्या म्युजियममध्ये पाहायला मिळते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.