महाराष्ट्र, नाथ संप्रदाय आणि योगी आदित्यनाथ : एक अज्ञात कनेक्शन
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
योगी आदित्यनाथ – उत्तरप्रदेशचे सलग दुसऱ्या वेळी मुख्यमंत्री झालेली ही व्यक्ती सध्या बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. उत्तरप्रदेशचा विकास करण्याच्या हेतूने झपाटलेल्या योगी आदित्यनाथ यांच्यावर समाजातील एका वर्ग त्यांच्या ‘भगव्या पेहराव’मुळे टीका सुद्धा करत असतो.
पण, योगी आदित्यनाथ यांचं लक्ष हे केवळ आपल्या कामाकडे असतं आणि त्यामुळेच कदाचित उत्तरप्रदेशच्या लोकांनी दुसऱ्या वेळेस त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.
‘योगी’ म्हणजे काय? हा प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर शोधण्याचा कित्येक लोकांनी आजवर प्रयत्न केला आहे.
सोप्या शब्दात सांगायचं तर हे ते लोक असतात जे नेहमीच शाकाहारी आहाराचं सेवन करतात, मद्यपान प्राशन करत नाहीत आणि त्यांचं जीवन हे सात्विक पद्धतीने जगण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल अधिक माहिती घेतली तर हे लक्षात येतं की, ते ‘नाथ संप्रदाया’चे अनुयायी आहे. ‘गोरक्षनाथ’ यांनी स्थापन केलेल्या नाथ संप्रदायाचे बरेच तत्व हे वारकरी संप्रदायासारखे आहेत.
नाथ संप्रदायाची सुरुवात कधी झाली? आणि योगी आदित्यनाथ यांचं त्याद्वारे महाराष्ट्रासोबत काय कनेक्शन आहे ? जाणून घेऊयात.
नाथ संप्रदाय :
‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, १० व्या शतकात नाथ संप्रदायाची सुरुवात झाली होती. भारतीय संस्कृतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.
प्राचीन काळातील रूढी, परंपरा यांचं आजच्या जीवनात असलेलं महत्व लोकांना सांगणं हे नाथ संप्रदाय स्थापन करण्यामागचे उद्देश होते. देवाची भक्ती करतांना त्यात कोणत्याही वर्णभेद, जातीभेद यांना थारा असू नये हे नाथ संप्रदायाचा मूळ सिद्धांत आहे.
नाथ संप्रदायाची सुरुवात ही उत्तर भारतातील गोरखपूर इथून गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ यांनी केल्याची सुद्धा इतिहासात नोंद आहे.
नाथ संप्रदाय हा ‘गुरू-शिष्य’ परंपरेसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये आदित्यनाथ (शंकर) यांचे शिष्य मच्छिन्द्रनाथ हे शिष्य होते आणि गोरक्षनाथ हे मच्छिन्द्रनाथ यांचे शिष्य होते.
प्रत्येक गुरूला आपला शिष्य निवडण्याची मुभा असायची. गोरक्षनाथ यांनी गहिनीनाथ यांना दीक्षा दिली होती आणि गहिनीनाथ यांनी निवृत्तीनाथ यांना १२८८ मध्ये त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावर असतांना आपलं शिष्य केलं होतं.
निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे भाऊ आणि गुरू होते. निवृत्तीनाथ यांचे गुणगान करण्यासाठी संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदाय सुरू केल्याची नोंद आहे.
—
- करौली इथली सांप्रदायिक दंगल आणि योगी आदित्यनाथ यांचं कनेक्शन: वाचा सत्य काय?
- उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी!
—
योगी आदित्यनाथ यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं हे नाथ संप्रदाय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यामुळे आहे. नाथ संप्रदाय हा योग मार्गाने जीवन जगण्याची पद्धत सांगत असतो. नाथ संप्रदायाने प्रचार केलेल्या ‘अष्टांग योग’चा उल्लेख भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये देखील आढळतो.
नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्रात मोठे होत गेले आणि त्याचे अनुयायी हे आज जगभरात असल्याचं सांगितलं जातं.
नेपाळचा राजा देखील गोरक्षनाथ यांना आपला गुरू मानायचा. नेपाळमध्ये गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. शिवाय, गोरक्षनाथ यांचा फोटो नेपाळच्या चलन असलेल्या नोटांवर आहे.
योगी आदित्यनाथ यांचं योगी जीवन :
योगी आदित्यनाथ हे गोरक्षनाथ यांना आपले गुरू मानतात. गोरखपूर मधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या भक्ती, सेवांमुळे गोरखपूर येथील गोरखपीठाचे महंत हे पद देखील देण्यात आलं आहे.
नाथ संप्रदायचं शिष्यत्व स्वीकारल्यानंतर १२ वर्षासाठी संन्यास घ्यावा लागतो आणि मग तुम्हाला ‘योगी’ हे पद मिळत असतं. शाही भोजनाचा त्याग करणे हे योगी लोकांकडून अपेक्षित असतं.
‘कान टोचणे’ ही एक बाब योगी लोकांना सहनशक्ती वाढवण्यासाठी आचरणात आणावी लागते. योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायाचा ‘न शिवलेले कपडे वापरण्याचा’ नियम आज एका राज्याचे मुख्यमंत्री असूनही तंतोतंत पाळतात ही एक आश्चर्याची बाब आहे.
योगी लोक हे आयुष्यभर योग साधना करत असतात आणि आयुष्याच्या शेवटी हिमालयात जातात किंवा जिवंत समाधी घेत असतात. योगी तत्वांचं पूर्णपणे पालन करणाऱ्या व्यक्तींना ‘अवधूत’ ही उपाधी सुद्धा दिली जाते.
योगी लोक वापरणारे ‘अलख’ या शब्दाचा अर्थ ‘वरिष्ठ व्यक्तीचा आदेश’ असा होत असतो.
योगी आदित्यनाथ हे नेहमीच योग मार्गावर आयुष्य जगत उत्तरप्रदेशची आणि पर्यायाने देशाची सेवा करतील आणि आपल्या आचरणाने जगात योगी लोकांची प्रतिमा उंचावतील अशी आशा व्यक्त करूयात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.