Site icon InMarathi

देशभ्रमंती करणाऱ्या मोदींचं घर नेमकं कसं आहे? वाचा मोदींच्या अलिशान घराविषयी…

narendra modi im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागच्या काही दिवसात आमदारांना फुकटात मिळणाऱ्या घरांचा विषय फारच चर्चेत होता. अगदी ‘आमदारांना घरांची गरज काय?’ पासून सुरु झालेलं राजकारण, राजकीय पक्षांनीही यावर केलेली टीका, आमदारांनी घर नाकारणं, राज्य सरकारची सारवासारव या आणि अशा अनेक गोष्टींमुळे हा विषय अनेक दिवस चर्चेत राहिला.

अगदी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हा विषय विनोदासाठीही वापरून घेतला, तर कुणी खरोखर पोटतिडकीने ‘आमदारांच्या घरावर खर्च करण्याऐवजी इतर सामाजिक कार्यांमध्ये हा पैसा वापरला जावा’, याबद्दल मतं मांडली. राजकीय नेत्यांची घरं हा चर्चेचा विषय तर नेहमीच ठरतो. विशेषतः मंत्र्यांच्या घरांबद्दल चर्चा करायला सामान्यांना मनापासून आवडतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला असो, किंवा इतर मंत्र्यांचे बंगले, त्यांचा विषय निघाला की चर्चेला उधाण येतं. आज मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ते थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराविषयी. जाणून घ्यायची इच्छा असेलच ना? चला तर मग…

कोर्टात पोचलंय प्रकरण…

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच पूर्ण होणार असलेला सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट, हे विद्यमान सरकारचं एक मोठं प्रोजेक्ट आहे. पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानासह संसद भवन, केंद्रीय सचिवालय, या वास्तू आणि राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंतच्या ३ किलोमीटर रस्त्याचे सुशोभीकरण असा या प्रोजेक्टचा भाग असणार आहे. मात्र विरोधी पक्षांनी केलेला विरोध आणि टीका यामुळे सुद्धा हे प्रोजेक्ट फार रंगलं.

एवढंच नाही, तर सर्वोच्च न्यायालयात या विरोधात याचिका टाकण्यात आली आहे. म्हणजेच सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

 

 

हे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐंशीच्या दशकात उभारण्यात आलेल्या रेस कोर्स बंगल्यातच राहत आहेत. ५ वर्षांचे अनेक कार्यकाळ झाले, आजवर अनेक पंतप्रधानांनी इथे अनेक वर्षांचं वास्तव्य केलं. मात्र आजही सर्वसामन्यांना या घराविषयी फारसं माहित नसतं.

चला मग आज जाणून घेऊयात या घराविषयी थोडंसं…

१. या परिसरात आहेत, चक्क ५ बंगले

पंतप्रधानांचं निवासस्थान असलेली ही वास्तू चक्क १२ एकर जागेवर पसरलेली आहे. ७ रेस कोर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या निवासस्थानी नरेंद्र मोदी २६ मे २०१४ पासून राहत आहेत.

 

 

या परिसरात बंगल्यांची एकूण संख्या ५ आहे. यात पंतप्रधान निवासस्थान, कचेरीसह, गेस्ट हाऊस आणि एसपीजी निवासस्थानाचा सुद्धा समावेश होतो.

२. गेस्ट हाऊससह हेलिपॅड सुद्धा

पंतप्रधान मोदी ५ नंबरच्या बंगल्यात राहतात. या ५ नंबर बंगल्यासह १, ३, ७ आणि ९ क्रमांकाचे बंगले या परिसरात आहेत. २ बेडरूम्स, त्यासह डायनिंग रूम आणि अधिकची एक रूम असं साधारणपणे या बंगल्याचं स्वरूप आहे. याशिवाय प्रत्येक बंगल्यात एका ड्रॉईंग रूमचा सुद्धा समावेश आहे. एका ड्रॉईंग रूममध्ये एकावेळी ३० जण सहजपणे बसू शकतील इतकी ही खोली मोठी आहे.

 

बंगला नंबर ७ मध्ये मोदींचं कार्यालय, ९ मध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या एसपीजी जवानांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बंगला नंबर ३ म्हणजेच पाहुण्यांसाठीचं गेस्ट हाऊस असून, बंगला क्रमांक १ मध्ये खास पंतप्रधानांसाठी हेलिपॅड बांधण्यात आलं आहे.

३. ब्रिटिश वास्तुकाराने बनवला होता प्लॅन

या वास्तूमध्ये राहण्याचा सर्वप्रथम मान पंतप्रधान राजीव गांधी यांना मिळाला. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी इथे वास्तव्याला होते. तेव्हापासूनच या वास्तूचा पत्ता ७, रेसकोर्स असा सांगण्यात येतो. रॉबर्ट टॉर रसेल या ब्रिटिश वास्तुकाराने या वास्तूचा प्लॅन तयार केला आहे. म्हणेजच भारतीय पंतप्रधान राहत असणारी वास्तू ही एका ब्रिटिशांच्या सुपीक डोक्यातून तयार झाली आहे.

 

 

एडविन लुटियन यांच्या अध्यक्षतेखाली १९२० ते १९३० या काळात नवी दिल्ली विभागाचा नकाशा आणि प्लॅन तयार करण्यात आला होता. रॉबर्ट टॉर रसेल हे याच टीमचा भाग होते. व्ही. पी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या वास्तूला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान घोषित केले.

४. या परिसरात भुयार आहे कारण…

पंतप्रधान वास्तव्याला असल्यामुळे, या संपूर्ण भागात ‘नो फ्लायिंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. ही गोष्ट तर सहज मान्य करण्यासारखी आहे. मात्र पंतप्रधान निवासात चक्क एक भुयार आहे. आहे की नाही, आश्चर्य वाटावं अशी बाब!

या भुयाराचा वापर सुरक्षेसाठी नाही, तर चक्क प्रवासासाठी केला जातो. या भुयारी मार्गाने दिल्लीच्या सफदरजंग येथील व्हीआयपी विमानतळापर्यंतचा प्रवास करता येतो. ज्यामुळे, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नियमित वाहतुकीवर कुठलाही परिणाम होत नाही. २०१० साली काँग्रेसकाळात सुरु झालेल्या या भुयाराची निर्मिती २०१४ साली पूर्ण झाली. त्यामुळे त्याचा वापर करणारे पहिले पंतप्रधान भाजपचे नरेंद्र मोदी ठरले.

५. उपहारांसाठी खास पंचवटी…

पंतप्रधान त्यांना नेहमीच काही ना काही उपहार येतच असतात. अशाच उपहारांसाठी चक्क एक पंचवटी सजलेली आहे.

 

 

२-३ कॉन्फरन्स रूम्स आणि एक मोठा बँक्वेट हॉल असणारी ही पंचवटी म्हणजे एक बांगलाच आहे. पंतप्रधानांना मिळणारी सन्मानचिन्ह, उपहार यासारख्या गोष्टी इथे मांडून ठेवण्यात येतात.

६. बगीचा तर असायलाच हवा

पंतप्रधान मोदी यांना असणारी पक्षी आणि प्राण्यांची आवड काही लपून राहिलेली नाही. मग अशा पंतप्रधानांसाठी त्यांच्या निवासस्थान परिसरात बगीचा तर हवाच नाही का! गुलमोहर, अर्जुन अशी विविध झाडं असणारा भलामोठा बगीचा या परिसरात फार आधीपासूनच आहे.

 

 

राष्ट्रीय पक्षी असणारा मोर, इतर अनेक पक्षी आणि असंख्य चिमण्या यामुळे या बागेची शोभा वाढते.

७. सुरक्षा महत्त्वाची

एसपीजी सुरक्षारक्षकांची व्यवस्था असणारं हे भारतातील एकमेव निवासस्थान आहे. इथली सुरक्षा इतकी उच्च दर्जाची आहे, की समोरच्या परिसरात असलेल्या एका भल्याथोरल्या हॉटेलमधील चौथा मजला सरकारी ताब्यात आहे.

 

 

पंतप्रधानांचे निवासस्थान असल्याने इथे प्रवेश करणं अत्यंत जिकीरीचं काम आहे. कुठल्याही व्यक्तीला आत प्रवेश करण्याआधी एसपीजी सुरक्षा व्यवस्थेतूनच जावं लागतं. त्यामुळे सर्वप्रथम ९ नंबर बंगल्यातूनच जावं लागतं. प्रवेशासाठी हा एकमेव मार्ग आहे. प्रवेश करणार असलेल्या व्यक्तींच्या नावाची यादी आधीच एसपीजी सुरक्षेकडे दिलेली असतात. या यादीत नाव असलेल्या व्यक्तींनाच आत प्रवेश मिळतो. याशिवाय तुमच्याकडे अधिकृत ओळखपत्र असणं सुद्धा आवश्यक ठरतं.

८. थियेटर आणि विद्युत केंद्र सुद्धा

पंतप्रधान निवास परिसरात अनेक माणसे राहतात. सचिव पदावरील अधिकारी, त्यांचे कर्मचारी, जवळपास ५० माळी यांच्यासह मोची आणि इलेक्ट्रिशियन सुद्धा याच परिसरात वास्तव्याला आहेत. त्यामुळेच इथे वेगळं विद्युत केंद्र उभारण्यात आलं आहे. याशिवाय या परिसरात खास स्क्रीनिंग आणि चित्रपट बघण्याकरिता एक थियेटर सुद्धा आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एम्समधील डॉक्टर आणि नर्सेस इथे २४ तास तैनात असतात. एका ऍम्ब्युलन्ससह सहा बीएमडब्ल्यू गाड्या कायम पंतप्रधानांच्या सेवेसाठी हजर असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version