' “तुम बिलकूल भगत जैसे दिखते हो”, जेव्हा मनोज कुमार भेटले भगतसिंग यांच्या आईला.. – InMarathi

“तुम बिलकूल भगत जैसे दिखते हो”, जेव्हा मनोज कुमार भेटले भगतसिंग यांच्या आईला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कलाकारांच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात, की ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात रहातात. अभिनय म्हणजे परकाया प्रवेश. मात्र हा करताना आपलं अस्तित्व विसरुन भूमिकेत विरघळावं लागतं.

जर चित्रपट एखाद्या जिवंत अथवा मृत व्यक्तीवर आधारीत असेल तर ही भूमिका जगणं आणखिन आव्हानाचं असतं. त्या व्यक्तीसारखं दिसणं, बोलणं, वावरणं जमणं हे कलाकाराचा कस लावणारं असतं. मात्र जेव्हा प्रेक्षकांतून या व्यक्तिमत्वाला पसंतीची पावती मिळते, तेव्हा कलाकाराचं आयुष्य सफ़ल होतं.

देशप्रेमावर आधारीत चित्रपट बनविण्यात ज्यांची खासियत त्या मनोज कुमार यांच्याही आयुष्यात अशी एक घटना घडली, की त्यांना आपलं आयुष्य कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही घटना १९६६ सालची आहे. बॉलिवुडमधील प्रसिध्द दिग्दर्शक एस.राम. शर्मा यांचा शहिद हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोजकुमार यांनी शहिद भगतसिंह यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.

याच दरम्यान मनोज कुमार यांच्या कानावर बातमी आली, की भगसिंह यांच्या मातोश्री विद्यावती प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंदीगढ मधील एका इस्पितळात भरती आहेत. शहिद चित्रपटाचे निर्माते कश्यप यांच्यासह मनोज कुमार विद्यावती यांची भेट घेण्यासाठी गेले.

 

bhagat singh mother im

 

भगतसिंह यांचे बंधू, कुलतार सिंह यांनी आईला मनोज कुमार यांची ओळख करुन देताना सांगितलं, की भतसिंहांवर एक चित्रपट बनला असून त्यात भगतसिंहांची भूमिका साकाराणारे ते हेच आहेत. हे ऐकल्याबरोबर विद्यावतींनी मनोज कुमार यांना अपादमस्तक न्याहाळलं. जसं काही त्या मनोज कुमारला “स्कॅन” करत होत्या.

मनोज कुमारना न्याहाळून झाल्यानंतर त्या हळुवार आवाजात म्हणाल्या की,”हां, तुम बिलकूल भगत जैसे ही दिखते हो”. हे ऐकून मनोज कुमारला एकाच वेळेस अभिमानानं ऊर भरुन आल्यासारखं आणि अत्यानंदानं धडधड वाढल्यासारखं झालं.

भगतसिंहांच्या मातोश्रींकडून कौतुकाची थाप मिळणं ही फ़ार मोठी गोष्ट होती. कोणत्याही पुरस्कारापेक्षाही मोठी, आयुष्यभर जपून ठेवावी अशी ही आठवण. या भेटी दरम्यानच विद्यावतींना तपासायला डॉक्टर आले. त्यांनी तक्रार केली, की त्या औषधं घेण्यास टाळाटाळ करतात.

हे ऐकून मनोज कुमार यांनी विद्यावतींना प्रेमाने औषधं घेण्याचा आग्रह केला आणि त्यांनी तो ऐकलाही. जसं काही त्यांचा लाडका मुलगा भगतच त्यांना औषधं देत होता.

 

manoj kumar im

 

या भेटीची आणखीन एक अभिमानास्पद आठवण म्हणजे याचवेळेस त्याठिकाणी बटुकेश्वर दत्तही आले होते. त्यानंतर मनोज कुमार आणि बटुकेश्वर यांच्या वारंवार भेटी गाठी झाल्या.

शहिद हा पहिलाच असा चित्रपट होता ज्यानं तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी विद्यावतीदेवींनी उपस्थित रहावं अशी मनोजकुमार यांची इच्छा होती, त्यानुसार त्यांचे वडील स्वत: पंजाबला गेले आणि विद्यावतीदेवींना जातीनं घेऊन आले.

या पुरस्कार समारंभाला तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी उपस्थित होत्या. विद्यावती मंचावर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करुन वंदन केलं आणि पायांना मिठी मारली. या चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार मनोज कुमार यांनी विद्यावतीदेवींच्या हातात ठेवला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?