Site icon InMarathi

कोटीच्या कोटी उड्डाणे; संजय राऊतच नव्हे, या मंडळींच्याही आहेत अलिबागमध्ये प्रॉपर्टीज

homes im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सेलिब्रिटी म्हणजे खरंतर ख्यातनाम व्यक्ती. यामध्ये ज्या व्यक्ती प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे राजकारणी, क्रिकेटर्स, ऍक्टर्स अशी अनेक मंडळी येतात. मात्र सेलिब्रिटी म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर येतात ते बॉलिवूड ऍक्टर्स.

या लोकांच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात सामान्य माणसाला रस असतो. मग ती कितीही छोट्यातली छोटी गोष्ट का असेना. त्यातच त्यांच्या घरांची, त्यांच्या गाड्यांचीही चर्चा आलीच, पण तीही शेवटी माणसंच आहेत. त्यामुळे त्यांनाही हा गजबजाट, गोंगाट कधीतरी नकोसा होतो आणि मग ते बाहेर फिरायला म्हणून जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आश्चर्य म्हणजे याही गोष्टीची चर्चा लपत नाही. म्हणून मग बऱ्याच लोकांनी शहराजवळच स्वतःचं दुसरं घर घेतलं आहे. त्यांची ही घरं लोणावळा आणि अलिबाग अशा मुंबईपासून काही वेळाच्याच अंतरावर आहेत.

अलिबागमध्ये तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींची घरं आहेत, पण यामध्ये बॉलिवूड ऍक्टर्सचा अमावेश जास्त आहे. कारण अलिबागजवळ मुंबई आणि मांडवा दरम्यान रोल ऑन-रोल ऑफ (रोरो)-कम-पॅसेंजर फेरी सेवा उपलब्ध आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी ४५ मिनिटं लागतात. ही फेरी २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती आणि त्यात १४५ कार आणि सुमारे ५०० प्रवासी बसू शकतात.

अलिबागमध्ये घर असलेले सेलिब्रिटी

शाहरुख खान आणि गौरी खान – 

 

 

बॉलिवूडचं स्टार कपल. यांचं अलिबागमधलं घरही तितकंच स्टार म्हणता येईल असं आहे. अतिप्रचंड मोठ्या या बंगल्यामध्ये शाहरुखचं स्वतःचं हेलिपॅड आहे. आता बोला! त्यात गौरी खान तर स्वतः इंटेरिअर डिझायनर आहे त्यामुळे कल्पना करा, की आणखी काय काय सोयी असतील.

या बंगल्याचं नाव देजा वू फार्म्स असं आहे आणि तो तब्बल ४ एकर्समध्ये पसरलेला आहे. शाहरुखनं त्याच्या काही वाढदिवसाच्या पार्ट्या या बंगल्यात दिल्या आहेत. या बंगल्यात स्विमिंग पूल, सुंदर असा डायनिंग एरिया, फॅन्सी लिव्हिंग रूम आणि ट्री-हाऊससारख्या पुष्कळ सुविधा आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

 

 

भारताचा स्टार खेळाडू आणि ऍक्ट्रेस अनुष्का शर्मा यांचाही एक बंगला मांडवाजवळ आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन होण्याआधीच हे दोघे जण त्या बंगल्यात जाऊन राहिले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनुष्काचे आईवडील आणि भाऊही होता.

केव्हिन पीटरसनसोबत केलेल्या इंस्टाग्राम लाइव्हमध्ये विराट कोहली म्हणाला होतं, की “आम्ही लकी ठरलो. परिस्थिती फार वाईट होण्याआधीच आम्ही गरजेच्या वस्तू गाडीत भरल्या आणि तिथून निघालो. मला माहीत होतं की हे जास्त वेळ चालेल. त्यामुळं मी माझं व्यायामाचं साहित्य बरोबर घेतलं होतं. शिवाय इथं चालण्यासाठी लहान अंगण आहे.”

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

 

 

दीपिका आणि रणवीर यांनी जे घर घेतलं आहे त्याची किंमत ऐकून सर्वसामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील. त्यांच्या या बंगल्याची किंमत २२ कोटी आहे. त्यांनी या घरासाठी स्टॅम्प ड्युटीच १ कोटी ३२ लाखांची भरली आहे. मापगावमध्ये असलेला हा बंगला सव्वा दोन एकरमध्ये पसरलेला आहे.

जुही चावला

 

 

जुही चावलाचासुद्धा मापगावमध्ये आलिशान व्हिला आहे. जवळजवळ पाऊण एकरमध्ये पसरलेल्या या बंगल्याची किंमत १ कोटी ८९ लाख आहे. या बंगल्यासाठी जुहीने ११ लाख ३२ हजारांची तर फक्त स्टॅम्प ड्युटीच भरली आहे.

रोहित शर्मा

विराट कोहलीशिवाय अलिबागमध्ये स्वतःची जागा असणारा दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. त्याने घेतलेली जागा जवळजवळ ४ एकर्सची आहे आणि त्याने त्याची पत्नी रितिकाच्या नावावर ती घेतली आहे. या जागेची किंमत साधारण ९ कोटी आहे.

इतर काही सेलिब्रेटी ज्यांची घरे अलिबागमध्ये आहेत

सुपरमार्केट चेन डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी यांच्या पत्नी श्रीकांतादेवी दमानी यांचं सहा एकरमध्ये पसरलेलं ८० कोटींचं घर. याशिवाय वेदांत रिसोर्सेसचे नवीन अग्रवाल, रेमंड्सचे गौतम सिंघानिया, युनिकेम लॅब्सचे प्रकाश मोदी, इन्फोसिसचे सलील पारेख, केकेआरचे संजय नायर आणि न्याकाच्या फाल्गुनी नायर आणि इक्विटी गुंतवणूकदार देवेन मेहता यांचीही घरे अलिबागमध्ये आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version