Site icon InMarathi

३ लग्नं, असंख्य लफडी आणि क्रिकेट : राजकारणी इम्रान खानचा वादग्रस्त प्रवास!

imran khan im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका बाजूला श्रीलंका तर दुसरीकडे पाकिस्तान; दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची सध्याची अवस्था फारशी बरी नाही. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय, तर दुसरीकडे मिम्सचा सुद्धा पाऊस पडतोय.

पाकिस्तानमध्ये गदारोळ माजलाय आणि त्याची चर्चा भारतीय सोशल मीडियावर होत नाहीये, असं घडणं काहीसं कठीणच! त्यात सध्या पाकिस्तानात ज्याच्यामुळे गोंधळ निर्माण झालाय, तो इम्रान खान तर पूर्वाश्रमीचा क्रिकेटपटू सुद्धा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पाकिस्तान आणि क्रिकेट असे दोन्ही विषय एकत्र आलेत, मग मंडळी ‘चर्चा तर होणारच’!तसं पाहायला गेलं तर, इम्रान खान म्हणजे वाद हे समीकरण सुद्धा फार नवीन नाही.

 

 

क्रिकेटपटू होता तेव्हापासूनच वादग्रस्त ठरलेला इम्रान आता तर राजकारणी आहे. राजकारणात आल्यावर, त्यातही पाकिस्तानच्या राजकारणात आल्यावर, वादग्रस्त ठरावं लागतं असा अलिखित नियमच आहे; असं म्हटलं तरी कदाचित ते वावगं ठरणार नाही. क्रिकेटर इम्रान खान ते पंतप्रधान इम्रान खान हा प्रवास सुद्धा असाच काहीसा असणार हे तर तुम्हाला माहित असेलच! चला तोच प्रवास जाणून घेऊ.

शिक्षण परदेशात पण…

इम्रान खानचा जन्म १९५२ सालच्या नोव्हेंबर महिन्यातला! हा मुलगा उच्चशिक्षणासाठी चक्क इंग्लंडमध्ये होता. आधी एचीसन कॉलेजात शिक्षण घेतलं. त्यानंतर इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड कॉलेजच्या रॉयल ग्रामर स्कुल आणि केबल कॉलेजचा ते भाग होते.

लहानपणापासूनच त्यांनी क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहिलं. वयाच्या सोळव्या वर्षीच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करत, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं मोठं पाऊल टाकलं. त्यानंतर क्रिकेटर म्हूणन इम्रानची यशस्वी घोडदौड सुरु झाली.

 

CricketCountry.com

१९७० साली पाकिस्तान संघात स्थान मिळवणारा इम्रान पुढे जगभरातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक ठरला. १० वर्षातच हे दैदिप्यमान यश त्याच्या पदरी पडलं. पुढे १९८१ साली राष्ट्रीय संघाच्या कप्तानीची माळ त्याच्या गळ्यात पडली. याचं फलित म्हणून १९९२ चा विश्वचषक पाकिस्तानने जिंकला.

आईच्या नावाने कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना :

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर इम्रान याने राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. १९९६ साली तहरीक-ए-इंसाफ या पक्षाची स्थापना करत त्यांनी राजकारणाच्या मैदानात प्रवेश केला. तहरीक-ए-इंसाफ या शब्दाचा अर्थ ‘न्यायासाठी केलेलं आंदोलन’ असा होतो. दरम्यानच्या काळात आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी एक मोठं पुण्याचं कामही केलं.

 

 

जगप्रसिद्ध अशा कॅन्सरवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलची निर्मिती, इम्रानच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीतील महत्त्वाची घटना ठरली. शौकत खानम मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल हे आज कॅन्सरवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्समधील एक जगप्रसिद्ध हॉस्पिटल आहे.
अर्थात राजकारणात सुरुवातीच्या काळात त्यांची दांडी गुल झाल्याचंच पाहायला मिळालं. स्वतः इम्रान १९९७ च्या निवडणुकीत पराभूत झाला होता. म्हणजेच राजकीय कारकिर्दीत पहिल्या प्रयत्नात त्याची विकेट पडली होती.

राजकारणात यश :

राजकारणात काही कालावधी व्यतीत केल्यावर तिथे सुद्धा इम्रानचा जम बसला. २००२ साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेची निवडणूक जिंकत त्याने पहिल्यांदा राजकीय यश संपादन केलं. मात्र २००७ साली परवेझ मुशर्रफ यांची पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर राजीनामा देणाऱ्या ८० सदस्यांपैकी इम्रान खान एक होता.

 

 

दरम्यानच्या काळात सर जेम्स गोल्डस्मिथ यांची मुलगी जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी इम्रानचा पहिला विवाह झाला होता. या दोघांना दोन मुलं सुद्धा होती. मात्र अब्जाधीश वडिलांच्या मुलीशी इम्रानचा विवाह टिकला नाही. २००४ साली ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर पत्रकार रेहम नय्यर हिच्याशी इम्रानने लग्न केलं. मात्र हे लग्न सुद्धा फार काळ टिकू शकलं नाही. सध्या अध्यात्मिक गुरु बुशरा बीबी ही इम्रान खानची पत्नी आहे. २०१८ साली हे लग्न पार पडलं होतं.

पंतप्रधान पदाची वाटचाल :

जवळपास दोन दशकांचा अनुभव घेतलेला इम्रान यांचा पक्ष २०१८ साली बराच यशस्वी झाला. यावर्षी ११६ सीट्स जिंकणाऱ्या इम्रानच्या पक्षाने २०१३ च्या निवडणुकीतही खास छाप पाडली होती. २०१८ च्या यशानंतर इतर लहान पक्षांना हाताशी धरून एक सरकार स्थापन करण्यात इम्रानला यश आलं. १८ ऑगस्ट २०१८ साली पाकिस्तानचे पंतप्रधान म्हूणन इम्रान खानने शपथग्रहण केलं.

 

या १२ सेलिब्रिटीजचा दयनीय शेवट: जीवन कधीही कोणतंही वळण घेतं, याचा पुरावाच

राजकारणातील ‘बाप’ मंडळी घरी ‘बाबा’ म्हणून अशी असतात! एक दुर्मिळ फोटो अल्बम

सत्तास्थापन केल्यावर ‘कल्याणकारी’ राज्याची निर्मिती करत असल्याची घोषणा इम्रानने केली होती. त्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांकडे बघून यात तथ्य असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. केवळ राजकीय दबाव आणि घराणेशाहीला बळी न पडता, योग्य उमेदवारांना इम्रान खानने मंत्रिमंडळात संधी दिली. एवढंच नाही, तर भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील असेन, या मताचा इम्रानने अनेकदा पुनरुच्चार सुद्धा केला होता. सध्या मात्र त्याने पंतप्रधानपद सोडलं असून, येत्या काही दिवसात पाकिस्तानात पुन्हा निवडणूक व्हाव्यात अशी मागणी सुद्धा केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version