Site icon InMarathi

पत्त्यातील राजा-राणी-गुलाम म्हणजे चक्क इतिहासातील “हे” लोक आहेत…

king queen inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

प्रवासात म्हणा, किंवा कुठे निवांत वेळ मिळाला तर टाईमपास म्हणून बहतेक जण एकाच खेळाला प्राधान्य देतात तो खेळ म्हणजे पत्त्यांचा खेळ!

ज्याला आपण कॅट म्हणतो, बरेच जण पत्ते खेळणे म्हणजे जुगार असंच समजतात, भले त्यात पैसा लावलेला असो वा नसो!

आपल्या पोराच्या हातात पत्ते दिसले की बऱ्याच पालकांच्या माथ्यावर आठ्या उमटल्याशिवाय राहत नाहीत, त्यामुळे बहुतेक वेळा मित्रमंडळींसोबतच पत्ते खेळावे लागतात.

शाळा संपली की शाळकरी मुलं पत्त्यांचा फड रंगावतात, सोसायटी मधली वयस्कर मंडळी पत्ते कुटतात, घरी खूप पाहुणे राहायला आले की पत्त्यांचा डाव रंगतो, असे कित्येक प्रसंग असतात जेंव्हा आपण सगळेच पत्ते खेळतो!

बदाम सात, झब्बू, मेंढी कोट, जजमेंट, पाच तीन दोन या अशा खेळांपासून अगदी भिकार सावकार पर्यंत सगळेच गेम बहुतेक सगळेच आवडीने खेळतात, एखाद्याला पत्ते खेळायला आवडत नाहीत असा माणूस विरळाच!

अगदी काहीच नाही तर आपण सगळ्यांनीच लहानपणी पत्त्यांचा बंगला बांधणे किंवा डाव लावणे असे उद्योग केलेच आहेत त्यामुळे पत्ते ही आपल्या आयुष्यातल्या करमणुकीचा एक भाग आहेत!

 

 

पण हा पत्त्यांचा खेळ खेळायला मजा येते हे मात्र खरं. ५२ पत्त्यांच्या सेटसोबत कितीतरी असंख्य खेळ खेळले जाऊ शकतात, त्याची गणती नाही.

हा पत्त्यांचा डाव तुम्ही देखील कधी न कधी रंगवला असेल, पण काय हो, तुम्हाला पत्त्यांमधील चार राजे, चार राण्या आणि चार गुलाम कोण आहेत माहितीये का? नाही माहित?

चला तर आज या मागचं रंजक गुपित जाणून घेऊया.

बदामच्या राजाला ” Suicide king” म्हणतात कारण हा पत्ता तुम्ही नीट बघितला तर राजाच्या मस्तकात तलवार घुसलेली दिसेल.

 

पत्त्यांच्या चार राजांमधे चार्लस दुसरा हा एकमेव राजा आहे ज्याच्या हयातीतच त्याला त्याच्या चित्राचा पत्ता पहायला मिळाला.

चार्लस दुसरा खुप आजारी पडला तेव्हा तिथुन पुढील आयुष्य अंथरूणातच काढण्याची वेळ त्याच्या वर आली आणि तेव्हा तो पत्त्यांचा black jack हा प्रकार खेळत असे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या दुर्दैवामागे पत्त्यांमधे राजाचा क्रमांक तेरावा आहे हेच कारण असल्याचे त्याच्या मनाने घेतले होते. त्याचे वेड वाढतच गेले आणि एक दिवस त्याने तलवार डोक्यात खुपसून आत्महत्या केली.


गुलामाचे पत्ते प्रसिद्ध सरदारांचे प्रतिनिधीत्व करतात.

बदामची राणी म्हणजे बायबल मधील एक पात्रं “ज्युडीथ”

 

 

इस्पिकचा राजा म्हणजे बायबल मध्ये उल्लेख असलेला “डेवीड”

 

चौकटची राणी म्हणजे बायबल मधील एक पात्रं “रेचल”

 

 

चौकटचा राजा म्हणजे रोमन राजा “सिझर”

 

 

इस्पिकची राणी म्हणजे ग्रीक देवता “अथेना”

 

किलवरचा राजा म्हणजे जगप्रसिद्ध राजा ” अलेक्झांडर”

 

 

किलवरची राणी म्हणजे “argine” आणि या लॅटीन शब्दाचा अर्थ होतो “राणी”

 

 

बदामचा राजा म्हणजे फ्रान्सचा राजा “चार्लस दुसरा”

 

 

इस्पिकचा गुलाम म्हणजे “ogier the dane”

 

 

बदामचा गुलाम म्हणजे “La Hire”

 

 

चौकटचा गुलाम म्हणजे “Hector”

 

 

किलवरचा गुलाम म्हणजे “Lancelot”

 

 

असे आहेत पत्त्यांमधील “खरे” चेहरे!

कधी वाटलं होतं का या पत्त्यांना इतक्या प्राचीन इतिहासाचा वारसा असेल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version