Site icon InMarathi

शेअर मार्केटमधील सर्वात घातक वृत्ती – “असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर शिमगा!”

share market borgaonka featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

दिनांक – 5 एप्रिल 2022

निफ्टी 17957.40 -96.00
सेन्सेक्स 60176.50 -435.24
बँकनिफ्टी 38067.90 -567.30
डॉलर 75.29

Nifty High Low – 17,921.55 – 18,095.45

 

 

निफ्टीमधील टॉप गेनर्स – ADANIPORTS NTPC TATAMOTORS POWERGRID TATACONSUM

निफ्टीमधील टॉप लूझर्स – HDFCBANK BAJAJFINSV HDFC KOTAKBANK INDUSINDBK

गेल्या दोन वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये नविन रिटेल ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली दुय्यम उत्पन्नाची गरज व लॉकडाऊन हे या वाढीमागचे प्रमुख कारण आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये सुमारे ११६०० वर असलेला निफ्टी एका महिन्यामध्ये ७५०० पर्यंत कोसळला. याच सुमारास सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे लोकांकडे बराच रिकामा वेळ होता आणी त्याचबरोबर काहेतरी नविन करण्याची एक प्रचंड मोठी गरज व उर्मी होती.

त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपली डीमॅट अकाऊंट्स सुरु करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक व ट्रेडिंग करणे सुरु केले. मार्च २०२० अखेरीस बाजारामध्ये रिकव्हरी सुरु झाली आणि सुरु झाला तेजीचा महाभयानक प्रकोप! ७५०० पर्यंत तुटलेला बाजार वाढत वाढत ऑक्टोबर २०२१ मध्ये १८६०० च्या पातळीवर जाऊन पोहोचला.

यामुळे खूप लोकांना फार मोठे फायदे या शेअर बाजारामधून मिळवता आले. या सर्व तेजीमुळे आणि झालेल्या फायद्यामुळे नविन गुंतवणूकदाराच्या मनामध्ये एक बेफिकिरीची भावना निर्माण होऊ लागते.

गेली दोन वर्षे म्हणजे मिडास राजाच्या गोष्टीप्रमाणे “हात लावीन त्याचे सोने होईल” अश्या प्रकारची गेलेली आहेत. परंतु गेल्या शेकडो वर्षांचा आंतरराष्ट्रीय बाजारांचा व गेल्या काही दशकांचा भारतीय बाजाराचा बारकाईने अभ्ह्यास केल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे शेअर बाजार हा “सायकल्स”मध्ये चालत असतो.

या बाजारामध्ये तेजीच्या सायकल्स असतात तश्याच मंदीच्या सायकल्सदेखील असतात. आणि तेजी झाली की मंदी झालीच पाहिजे आणि मंदी झाली की तेजी झालीच पाहिजे हे बाजाराचे तत्व आहे.

 

 

भारतीय शेअर बाजारामधील तेजीच्या सायकल्सची काही वर्षे
1991 ते 1992
1993 ते 1994
1998 ते 2000
2003 ते 2008 (महा तेजी)
2009 ते 2020 (दीर्घ पल्ल्याची महा तेजी)
2020 ते चालू (महा तेजी)

तसेच शेअर बाजाराने मंदीच्या सायकल्सदेखील बरेचदा बघितल्या.

भारतीय शेअर बाजारामधील मंदीच्या सायकल्सची काही वर्षे
1992 ते 1993
1994 ते 1998 (संथ मंदी)
2000 ते 2003 (गंभीर मंदी)
2008 ते 2009 (वर्षानुवर्षांची कमाई धुवून टाकणारी मंदी)
2020 (करोनामुळे आलेली मिनी मंदी)

या सर्व मंदीच्या सायकल्समध्ये २००८ मध्ये आलेली मंदी हे सर्वात भयानक होती. कारण यामध्ये लोकांचे वर्षानुवर्षे मिळालेले प्रॉफिट्स क्षणात होत्याचे नव्हते झाले. अमेरिकेत उद्भवलेल्या लेहमन ब्रदर्स आणि सबप्राईम समस्येमुळे जगभरामध्ये ही मंदी आलेली होती.

हे सर्व आकडे तुमच्यासमोर देण्याची दोन प्रमुख कारणे आहेत –

१ – बाजारामध्ये तेजी येते तशीच मंदीदेखील येते याची तुम्हाला जाणीव करुन देणे
२ – भविष्यामध्ये येऊ शकणार्‍या मंदीला हाताळण्याकरिता योग्य मानसिकता तुमच्यामध्ये तयार करणे

या लेखाचे शीर्षक – “असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा” असे मुद्दाम दिलेले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे बर्‍याच यशस्वी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक बेफिकिरीची भावना निर्माण झालेली आहे. परंतु ही भावना व्यवसायामध्ये अत्यंत घातक ठरत असते. गुंतवणूक किंवा ट्रेडिंग याकडे एक व्यवसाय या अर्थानेच बघितले पाहिजे. त्यामुळे चलाख व्यावसायिक जसा कायम सजग असतो त्याचप्रमाणे आपणदेखील बाजारामध्ये सजग राहिले पाहिजे.

मंदी ही सर्दीच्या रोगाप्रमाणे आहे. आपल्याला सर्दी होणार असते तेव्हा त्याची पूर्वसूचना आपल्याला कायम मिळत असते बघा. आपले नाक खाजू लागते, घसा खवखवतो, बोलताना आवाजामध्ये एक सूक्ष्म बदल घडू लागतो आणि आपल्याला समजते की आता काही काळात आपल्याला सर्दी होणार. तसेच मंदीदेखील येताना पूर्वसूचना देत असते.

 

 

आपल्याला शेअर्सच्या चार्ट्सवरील इंडिकेटर्समध्ये मंदीच्या सूचना दिसू लागतात. फॉरेनचे गुंतवणूकदार आपापले पैसे बाजारामधून काढून घेऊ लागतात. ट्रेंड फॉलोविंग इंडिकेटर्समध्ये निगेटिव्ह क्रॉसओव्हर्स दिसू लागतात. अश्या बर्‍याच सूचना मंदी आपल्याला येण्यापूर्वी देत असते. या सर्व सूचना आपण वाचल्या पाहिजेत. आणि मंदीची चाहूल लागताच आपण सजग राहून जमेल तसे प्रॉफिट बूकिंग किंवा पोर्टफोलिओ हेजिंग करुन स्वतःला सुरक्षित केले पाहिजे. हे सर्व वाचण्यासाठी अवघड वाटत असले तरी शिकण्यासाठी अत्यंत सोपे आहे आणि सर्वसामान्य कोणीही व्यक्ती हे आत्मसात करुन घेऊ शकतो.

तसेच आपली सर्व गुंतवणूक ही शेअर बाजारामध्ये न ठेवता त्याचे विविध ठिकाणी विभाजन करुन ठेवली गेली पाहिजे. तसेच आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काही रक्कम ही सदैव तयार ठेवली पाहिजे. गुंतवणूकदार हा राजा असतो. व त्याचा पैसा हे त्याचे सैन्य असते.

राजा हा स्वतःकडील सर्व सैन्य एकाच लढाईवर कधीच पाठवित नसतो. तसेच काही शिपाई कायम राजाच्या सुरक्षिततेसाठी तैनात ठेवलेले असतात. आपल्या पैश्यांच्या बाबतीत हेच धोरण जर राबवले तर आपल्यावर “असेल तेव्हा दिवाळी अन्‌ नसेल तेव्हा शिमगा” अशी वेळ कधीच येणार नाही!

शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत.

गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती नियमितरित्या मिळवण्यासाठी आपला Neeraj Borgaonkar हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करुन ठेवा

नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनलची लिंकhttps://marathimarket.in/youtube

अजून एक महत्वाचे

शेअर बाजारामध्ये “इंट्राडे ट्रेडिंग” करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल – https://marathimarket.in/free-trial

 

 

फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल. हे करीत असताना काही शंका आली तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.

“गुंतवणूक कट्टा” हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणारा एक उपक्रम असून यामध्ये एक “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.

या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल.

पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री ९ वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.

रजिस्ट्रेशन लिंक – https://www.guntavnook.com/webinar

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version