' चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली – InMarathi

चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महासत्ता बनण्याची इच्छा बाळगून असलेला चीन देश हा आपला हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे त्याने कोरोना व्हायरस तयार करून दाखवून दिलं आहे. चीनकडे ‘क्रेडिट’ नावाचा अजून एक व्हायरस आहे हे त्याने मागील एक वर्षात दाखवून दिलं आहे. हा व्हायरस एखाद्या व्यक्तीला शोधून त्रास देत नाही तर तो पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला आपल्या विळख्यात घेतो आणि हतबल करून सोडतो.

पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि काही आखाती देश सध्या हा अनुभव घेत आहेत. चीनची रणनीती अशी असते की, तो नेहमीच आपल्या देशात उत्पन्न होणाऱ्या वस्तूंची विक्री करता यावी म्हणून नवनवीन देश शोधत असतो. सुरुवातीला त्या देशांमध्ये वस्तू विकायच्या, मग त्या देशांना ‘अर्थसहाय्य’ करण्याचं आमिष दाखवायचं आणि आपल्या जाळ्यात ओढायचं, कर्ज आणि त्यावरचं व्याज वाढवत रहायचं. देश बरोबर भिकेला लागतो आणि तुम्हाला शरण येतो.

 

china 1 inmarathi

 

आपल्यापैकी कित्येक लोक वापरत असलेल्या ‘क्रेडिट कार्ड’ सारखं चीन देश हा कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या देशांसोबत वागत असतो. क्रेडिट लिमिट आहे म्हणून आपण ते कार्ड वापरत जातो आणि एकवेळ अशी येते की, मूळ रक्कम आणि त्यावर लागलेलं व्याज यांचा एक डोंगर ‘क्रेडिट स्टेटमेंट’ रूपाने आपल्या समोर येत असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मग, आपण ते कार्ड बंद करण्यासाठी दुसरं कर्ज काढतो आणि हे चक्र असंच सुरू रहातं. हे चक्र थांबवण्यासाठी एक ‘नियंत्रण’ हवं असतं. देश चालवणं देखील फार काही वेगळी गोष्ट नसते. भारताचे शेजारी राष्ट्र कसे चीनच्या क्रेडीट कचाट्यात अडकत गेले ? जाणून घेऊयात.

श्रीलंका चीनच्या जाळ्यात कशी अडकली ?

श्रीलंकेत उदभवलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी त्यांच्या विद्यमान राष्ट्रपती गोताब्या राजपक्स यांची चीनसोबत झालेली मैत्रीला सर्वाधिक जबाबदार मानलं जात आहे. श्रीलंका देशाने आपल्या देशात रस्ते, फ्लायओव्हर बांधण्यासाठी चीनकडून भलं मोठं कर्ज घेतलं आणि तिथून हा ‘सिलसिला’ सुरू झाला. जमीन हस्तांतरण, बांधकामाची गती यामुळे प्रकल्प लांबत गेले.

चीनचं कर्जावरील व्यज़ाचं मीटर मात्र आधीच सुरू झालं होतं. चीनचं व्याज भरता भरता श्रीलंकेची त्रेधा झाली आणि त्यांनी रिजर्व्ह बँकेच्या संपत्तीला हात घातला. ही संपत्ती देशावर एखादी आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी असते.

 

gota im

 

श्रीलंकेने रिजर्व्ह बँकेचे पैसे चीनला देऊन ती आपत्कालीन परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतली. आज श्रीलंकेत अन्नधान्य, पेट्रोल यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. लोक देश सोडून पळून चालले आहेत. जे देशात आहेत ते राजापक्स यांच्या घरासमोर निदर्शनं करत आहेत. अत्यंत आवश्यक नसतांना घेतलेलं एक कर्ज तुम्हाला कुठे नेऊन ठेवू शकतं त्याचं उदाहरण म्हणून श्रीलंका देशाकडे सध्या बघितलं जात आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था गडगडण्यामागे सुद्धा चीनकडून घेतलेलं कर्ज हेच कारण अर्थतज्ज्ञांकडून समोर आलं आहे. नुकताच पायउतार झालेला पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने सुद्धा अमेरिकेचा रोष पत्करून प्रत्येकवेळी अर्थसहाय्यासाठी चीनचे पाय धरले. चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्र, व्यापार आणि आर्थिक मदत करत गेला आणि आज ही परिस्थिती आहे की, पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर चीनचं नियंत्रण आहे.

 

sri crisis im

 

नेपाळचे पंतप्रधान शेर बहाद्दूर देऊबा यांनी मागच्या आठवड्यात भारतीय पंतप्रधानांची भेट घेतली. आपल्या भेटीत त्यांनी हे सांगितलं की, चीनचे अर्थमंत्री वांग ली हे त्यांच्या देशावर कर्ज घेण्यासाठी एका प्रकारे दबाव टाकत आहेत. नेपाळ मधील रस्ते बांधकाम करण्याच्या एका प्रकल्पात चीनने रुची दाखवली आहे. अट एकच आहे की, त्यासाठी लागणारा पूर्ण पैसा हा कर्ज स्वरूपाने बीजिंगहून काठमांडूला येईल आणि नंतर त्या पैशाची व्याजासकट वसुली केली जाईल.

बेल्ट रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) हे या प्रकल्पाचं नाव आहे. अजूनही प्रस्ताव विचाराधीन आहे. कोणत्याही करारावर अजूनतरी स्वाक्षरी झालेली नाहीये. पण, चीनने आपले कर्जाचे पत्ते नेपाळ समोर ठेवून त्यांना एकाप्रकारे संभ्रमित केलं आहे.

चीन देशाने अशाप्रकारे दक्षिण आशियात ४.७ बिलियन यूएस डॉलर्स पासून सुरुवात करत ४० बिलियन यूएस डॉलर्स (२,८०,००० कोटी रुपये) इतकं आपल्या कर्जाचा विळखा वाढवला आहे. पाकिस्तान देशावर असलेल्या सर्व कर्जाच्या १०% पेक्षा अधिक रक्कम ही त्यांनी चीनकडून कर्जरुपाने घेतली आहे.

 

china dragon inmarathi

इम्रान खान सरकार पडल्याचं खापर ज्याच्यावर फोडतोय, त्याचं आहे भारताशी कनेक्शन?

भारत – पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या मार्गावर? याचं उत्तर येणारा ‘काळच’ देईल!

चीन देश हा आज जगभर कर्ज देत सुटला आहे. पण, पाकिस्तान, श्रीलंका सारख्या देशांकडून आपलं कर्ज वसूल करतांना त्याला चांगलेच परिश्रम घ्यावे लागतील हे नक्की. चीनचा असाही मनसुबा असू शकतो की, कर्ज वसूल करायचं नाही आणि ते इतकं वाढू द्यायचं की एकवेळ पूर्ण देशावरच आपल्याला ताबा घोषित करता येईल. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपल्यावर जगातील इतर देशांमध्ये या कर्जवसुली करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते हे स्पष्ट आहे.

अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे असं आकडे सांगतात. पाकिस्तान, श्रीलंका आणि तत्सम देशांनी चीनसोबत केलेली ही जवळीक ही अमेरिकेला देखील खटकणारी आहे. पण, आता हे देश चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले असल्याने इतर कोणती भूमिका देखील घेऊ शकत नाहीत ही वसुस्थिती आहे.

 

china pak inmarathi
india.com

 

श्रीलंकेने याआधी असं आर्थिक संकट आलं होतं तेव्हा त्यासाठी भारताला दोषी ठरवलं होतं. पण, आजची परिस्थिती ही त्यांनी स्वतःहून ओढवून घेतली आहे. पाकिस्तानने देखील “शत्रूचा शत्रू, आपला मित्र” असं म्हणत चीनला जवळ केलं. पण, आज ते त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

येणाऱ्या काळात आपले शेजारी देश प्रशासनाचे, देशाला श्रीमंत करण्याचे काही धडे भारताकडून घेतील आणि चीन रुपी कर्जातून स्वतःची सुटका करून घेतील अशी आशा व्यक्त करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?