इम्रान खान सरकार पडल्याचं खापर ज्याच्यावर फोडतोय, त्याचं आहे भारताशी कनेक्शन?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तान या देशात नेहमी काही ना काही उलट-सुलट घडत असते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानातील राजकीय संकट अधिकच गुंतागुंतीचे होतांना दिसत आहे. इम्रान सरकार विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यामुळे आणि नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्यानंतर विरोधकांचा संताप अधिकच वाढला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
इस्लामाबादमध्ये सध्या प्रचंड अनिश्चितता आहे, कधी काय घडेल याची कोणालाही शाश्वती नाही. पाकिस्तानमधील घटनातज्ज्ञ इम्रान खान आणि त्यांच्या विरोधकांना पुढे काय करता येईल यावर विचार आणि चर्चा करत आहेत. मात्र अशावेळी इमरान खान यांनी अमेरिकेवर काही तरी भलतेच आरोप केले आहेत.
अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी डोनाल्ड लू यांनी आपले सरकार पाडण्याचा कट रचल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. अमेरिकेमधील विदेश मंत्रालयात दक्षिण आशियाई घडामोडींवर देखरेख ठेवणारे सर्वोच्च अमेरिकन मुत्सद्दी डोनाल्ड लू यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे आपले सरकार उलथून टाकायचे होते, असा दावा इम्रानने केला. डोनाल्ड लू यांनी अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद मजीद यांच्यामार्फत धमकीचे पत्रही पाठवले होते, ही बातमी पाकिस्तान मधील प्रमुख वृत्तपत्र ‘द डॉन’ ने छापली आहे.
याचबरोबर इम्रान यांनी आरोप केले आहे की, “पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) बंडखोर नेते सातत्त्याने अमेरिकन दूतावासात जात असल्याची पुरावे माझ्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, ‘काय कारण आहे की जे नेते आम्हाला सोडून गेले आहेत ते गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन दूतावासातील लोकांना वारंवार भेटत आहेत.”
● डोनाल्ड लू आहेत तरी कोण ?
डोनाल्ड लू हे अमेरिकेचे परराष्ट्र सेवेमधील अधिकारी आहेत ज्यांना ३० वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे. २०१० ते २०१३ पर्यंत ते भारतामध्ये यूएस मिशनचे उपप्रमुख म्हणून काम बघत होते. तसेच त्यांची नियुक्ती यूएस स्टेट डिपार्टमेंटमध्ये दक्षिण आशियाई मध्ये घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक परराष्ट्र सचिव म्हणून केली गेली आहे.
याआधी त्यांनी २०१५ ते २०१८ मध्ये अल्बेनिया येथे तर २०१८ ते २०२१ पर्यंत किर्गिझस्तानमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केले आहे. अल्बानियामध्ये पोस्टिंग करण्यापूर्वी, लू यांनी पश्चिम आफ्रिकेतील इबोला संकटाच्या वेळी उप समन्वयक म्हणून काम केले आहे.
डोनाल्ड लू यांनी १९९७ ते २००० पर्यंत भारतात राजकीय अधिकारी म्हणून काम केले. तर १९९६-१९९७ मध्ये नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावास मध्ये यूएस राजदूतांचे विशेष सहाय्यक म्हणून काम केले आहे. इंग्रजी बरोबरच रशियन, जॉर्जियन, अल्बेनियन, अझरबैजानी, हिंदी, उर्दू आणि पश्चिम आफ्रिकन क्रिओ या ८ भाषांमध्ये ते पारंगत आहेत.
● मार्च च्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठवले होते.
द डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी राजदूताला पत्रामध्ये सांगण्यात आले होते की, दोन्ही देशांमधील संबंधांचे भवितव्य अविश्वास प्रस्तावावर अवलंबून असेल, जे विरोधी पक्ष त्यावेळी इम्रान यांच्या विरोधात आणण्याची योजना आखत होते. जर इम्रान खान त्या अविश्वास प्रस्तावानंतर बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरले तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानी राजदूताला देण्यात आले होते.
–
अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.
तिसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली? ही १० लक्षणं बरंच काही सांगून जातात…
–
हे पत्र ७ मार्च रोजी पाठवले गेल्याचे सांगितले जात आहे, याच्या ठीक एका दिवसानंतर विरोधी पक्षांनी इम्रान विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आणि त्यावर मतदान करण्यासाठी नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली.
● या आरोपावर अमेरिकेचे उत्तर.
मात्र इम्रान खान यांनी केलेल्या आरोपाला अमेरिकेने फेटाळले आहे. प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेने सांगितले की, पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी कुठल्याही व्यक्तीला कोणतेही पत्र पाठवलेले नाही.
● इम्रान यांची अमेरिका विरोधी विदेश धोरण
याचबरोबर इम्रान यांची विदेश नीति अमेरिका विरोधी असल्याचे ही म्हटले जात आहे. २०१८ मध्ये सत्तेत आल्यापासून इम्रान खान यांच्या वक्तव्यावरून आणि कृतीवरून दिसून आले आहे की खान यांचे धोरण नेहमीच अमेरिकेच्या विरोधात होते. अलीकडच्या काळात इम्रान खान यांनी चीन आणि रशियाशी जवळीक वाढवल्याचे अनेक संकेत दिले होते.
जसे की ज्यादिवशी युक्रेनवर आक्रमण सुरू झाले त्याचदिवशी त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. रशियासोबतची चर्चा एका बलाढ्य देशाला पसंत नसल्याचे ही इम्रान यांनी नुकतेच म्हटले होते. याचबरोबर चीन सोबत असलेली पाकिस्तान ची जवळीक अमेरिकेला खटकत होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.