' उन्हाळ्यात सतत AC मध्ये राहताय? या ७ दुष्परिणामांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका – InMarathi

उन्हाळ्यात सतत AC मध्ये राहताय? या ७ दुष्परिणामांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं”, सुप्रसिद्ध कवी सौमित्र यांच्या गारवा या गाण्यातली सुरुवातीची ओळ दरवर्षीच्या उन्हाळ्याचं अगदी चपखल वर्णन करणारी आहे.

छान थंडी अनुभवल्यानंतर साधारण मार्चच्या अखेरीपासून जेव्हा आपल्या नजरा आईस्क्रीम, सरबतं, उसाच्या रसाची गुऱ्हाळं, नारळ पाणी, बर्फाचा गोळा या सगळ्यांकडे ओढल्या जातात तेव्हा उन्हाळा सुरू झालाय हे आपल्याला खरोखर जाणवू लागतं.

 

gola IM

 

सध्या सगळेच जण उन्हाने हैराण झालेत . ११ च्या सुमारासही बाहेर पडलं तरी भाजून निघाल्यासारखं वाटतंय. त्यामुळे घरून ऑफिसला गेल्यावर आणि ऑफिसमधून घरी आल्यावर कुठल्या गोष्टी आपण आधी करत असू तर ते पाणी पिणे आणि पंखा, एसी सुरू करणे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एक काळ असा होता जेव्हा घरात एसी असणं मध्यमवर्गीयांसाठी अप्रुपाचं होतं. त्यावेळी पंख्याचा वाराही आपल्याला समाधानाचा थंडावा द्यायचा. पण आता उन्हाळ्यात पंख्यातूनही गरमच वारा येतो त्यामुळे एसी घेण्याशिवाय लोकांकडे पर्याय उरला नाही.

हल्ली घरोघरी, कामाच्या ठिकाणी एसी असतोच. पण कोणे एके काळी चैन आणि त्यानंतर आपली गरज झालेल्या एसीची आपल्याही नकळत आपल्याला जास्तच सवय होत चाललीये की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

AC IM

 

एसीची गार हवा सुखावणारी असतेच. पण तासन् तास एसीत राहिल्याचे काही दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात. तुम्हीही उन्हाळ्यात सतत एसीत राहताय?

असं असेल तर वेळीच सावध व्हा आणि एसीच्या या ७ दुष्परिणामांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

१. डिहायड्रेशन :

 

dehydration IM

 

खोलीच्या तापमानाच्या तुलनेत एसी असलेल्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त आढळतं. एसी खूप कमी तापमानावर ठेवलाय आणि तुम्हाला खूप गार वाटतंय मात्र तरीही तहान लागतेय असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का हे आठवून पहा.

खोलीमधली आर्द्रता एसी जर जास्तच शोषून घेत असेल तर तुम्हाला डिहायड्रेटेड वाटतं.

२. डोकेदुखी :

 

headache IM

 

एसीमुळे डिहायड्रेटेड राहीलं तर डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्या उद्भवू शकतात. डिहायड्रेशन हा एक ट्रिगर आहे ज्याकडे बऱ्याचदा मायग्रेनचा संदर्भात दुर्लक्ष केलं जातं.

एसी असलेल्या खोल्या व्यवस्थित ठेवल्या नसतील तर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेन होऊ शकतो. एसीत बराच काळ राहिल्यानंतर लगेचच जर तुम्ही उन्हात गेलात तरीही तुमचं डोकं दुखण्याची शक्यता असते.

३. श्वसनाशी निगडीत त्रास :

 

breathing problem IM

 

एसीमध्ये फार काळ राहणाऱ्या लोकांना नाक आणि घशाशी संबंधित त्रासांचा सामना करावा लागू शकतो. तुमचा घसा कोरडा पडू शकतो, तुमच्या श्वसनात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला ऱ्हिनिटीसही होऊ शकतो.

ऱ्हिनिटीस ही अशी स्थिती आहे जी नाकातल्या श्लेष्मल त्वचेमध्ये जळजळ होण्याला प्रोत्साहन देते. व्हायरल इन्फेक्शन किंवा ऍलर्जी ही असं होण्यामागची कारणं असू शकतात. एसीमुळे सामान्यतः श्वसनाशी निगडीत समस्या उद्भवतात.

४. दमा आणि ऍलर्जी :

 

allergy IM

 

दमा किंवा ऍलर्जी असलेल्या लोकांची स्थिती एसीमुळे अधिकच खालावू शकते. प्रदूषणापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी संवेदनशील लोक बऱ्याचदा घरात राहणं पसंत करतात. पण हीच गोष्ट त्यांना महागात पडू शकते.

घरातल्या एसीची जर व्यवस्थित साफसफाई केली नसेल तर दमा आणि ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी ते अपायकारक ठरू शकतं आणि त्यांचा त्रास आणखीनच वाढू शकतो.

५. संसर्गजन्य आजार :

 

contagious deases IM

 

दीर्घकाळ एसीत राहिल्यामुळे तुमच्या नाकाचा मार्ग कोरडा होऊ शकतो. श्लेष्मल त्वचेच्या संदर्भातले त्रास त्यामुळे वाढू शकतात. संरक्षणात्मक श्लेष्माच्या अभावामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचा संभव जास्त असू शकतो.

६. कोरडी त्वचा आणि डोळे :

 

dry skin IM

 

दीर्घकाळ एसीत राहणाऱ्या लोकांमध्ये सामान्यतः त्वचा कोरडी पडणे आणि त्वचेला खाज येणे या समस्या दिसतात. एसीत जास्त वेळ राहण्याबरोबर तीव्र सूर्य किरणांच्या संपर्कात आल्यामुळेदेखील त्वचा कोरडी पडणे आणि त्वचेला खाज सुटणे या समस्या होऊ शकतात. काही तास बाहेर राहिल्यानंतर तुमची त्वचा पूर्ववत होऊ शकते.

मात्र जर त्वचा कोरडी पडण्याचा त्रास तुम्हाला असेल तर बराच काळ तुमची त्वचा तशीच कोरडी राहू शकते. त्यामुळे ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी या बाबतीत जास्त दक्षता घ्यावी. तुम्हाला जर डोळे कोरडे पडण्याचा त्रास असेल तर दीर्घकाळ एसीत राहिल्याने हा त्रास वाढू शकतो.

त्यामुळे कोरड्या डोळ्यांना अधिक खाज येऊ शकते आणि त्यांची जळजळ वाढू शकते. ज्यांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास आहे त्यांनी शक्यतो फार काळ एसीत राहू नये.

७. आळस :

 

lazinees IM

 

एसीच्या हवेमुळे आपल्याला गारवा मिळतो खरा, पण फारच छान वाटल्यामुळे आपला आळस वाढू शकतो. दीर्घकाळ एसीत राहणाऱ्या लोकांनी आळस वाढल्याच्या तक्रारी केल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

कुठलीही सुखावणारी गोष्ट आपल्याला जितकी मिळेल तितकी अधिक हवी असते. पण त्याचा अतिरेक झाला की ते आपल्याचसाठी नुकसानकारक ठरू शकतं. कशाचाही हव्यास वाईटच!

एसीच्या बाबतीतही हे लागू होतं. एसीची गरज आपल्याला असणारच आहे. पण एसीमुळे होणाऱ्या या समस्या लक्षात घेता एकदा थंड वाटलं की थोड्यावेळाने लगेच एसी बंद करणं नको टाळूया.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?