मशिदींवरील भोंग्यावर मनसेच नव्हे तर जावेद अख्तरसुद्धा विरोधात होते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
यंदाचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने साजरा झाला, गेली दोन वर्ष सण समारंभसाध्या पद्धतीने साजरे केले जात होते, सगळीकडेच नाराजीचे वातावरण होते मात्र सरकारने पूर्णपणे निर्बंध उठवल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार झाले, स्वागतयात्रा ठिकठिकणी जोरात निघाल्या, मोठया प्रमाणावर वाहन विक्री झाली.
या सगळ्यामध्ये एक गोष्ट झाली ती म्हणजे तब्बल दोन वर्षांनी राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला मिळाले, नेहमीप्रमाणे लाखो मनसैनिक त्यांच्या भाषणाला हजर होते. तब्बल ५८ मिनिटांच्या या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला आणि त्यातला एका मुद्दा सध्या गाजतोय तो म्हणजे मशिदीवरील भोंग्याचा, कालच्याच दिवशी मनसैनिकांनी घाटकोपरमध्ये मनसेच्या शाखेवर भोंगा लावून त्यावर हनुमान चालीसा लावली.
घाटकोपर नंतर आता सगळीकडे हनुमान चालीसा लावली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. मशिदीवरील भोंगा हा खरं तर एक वादच मुद्दा आहे, केवळ मुंबईतच नव्हे तर उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात सारख्या राज्यात यावर बंदी घालण्याची मागणी होताना डोसून येत आहे.
मशिदीवरील भोंगा हा खरं तर मुस्लिम धर्मियांना प्रार्थनेसाठी आवाहन करायला लावला जातो, मात्र याच भोंग्याचा आवाजाचा इतरांना त्रास होतो म्हणून यावर बंदी घालावी अशी मागणी आहे, काही मुस्लिम धर्मीयदेखील याच्याशी सहमत आहे, जेष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी देखील भोंग्याविषयी आपले मत व्यक्त केले होते, ते नेमके काय म्हणाले होते…
नेमकं काय म्हणाले होते जावेद अख्तर?
मशिदीवरील भोंगा हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे मात्र जावेद अख्तर यांनी दोन वर्षांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून या वादावर भाष्य केले होते ते असं म्हणाले की भारतात गेल्या ५० वर्षांपासून जो अजान होत आहे तो हराम आहे, आणि आता तो हलाल झाला आहे इतका हलाल झाला आहे की याला आता अंत नाही पण हे कुठेतरी थांबले पाहिजे. अजान ठीक आहे पण लाऊडस्पिकरमुळे इतरांना त्रास होतो. मला आशा आहे की यावेळी ते स्वतः कमी करतील.
–
शिया मुस्लिम खरंच अन्नात थुंकून ते वाढायचे का? वाद घालण्यापुर्वी हे सत्य जाणून घ्या
तबलिकी जमात आणि मरकज : भारताला ‘कोरोनाच्या’ संकटात ढकलणाऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती
–
ट्विटर जेव्हा आपले त्यांनी आपले मत व्यक्त केले होते तेव्हा लगेच यूजर्स मंडळींनी त्यांवर कॉमेंट्स करण्यास सुरवात केली होती. एका यूजरने विचारले होते की मशिदींप्रमाणे मंदिरांमध्ये देखील मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावले जातात त्यावर तुमचं काय मत?
त्यावर जावेद अख्तरांनी उत्तर दिले की मशीद असो किंवा मंदिर सणांमध्ये लाऊडस्पिकर लावणे योग्य आहे मात्र रोजच्या रोज लावणे चुकीचे आहे. अजान गेली हजारो वर्ष दिली जात आहे, ते ही लाऊड स्पीकरशिवाय, मुळात अजान हे तुमच्या विश्वासाचा अविभाज्य घटक आहे ते काही गॅजेट नाही.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाकाळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता त्याच दरम्यान देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरु झाला होता त्यामुळे जावेद अख्तरनी सगळ्या मुस्लिम बांधवांना घरात बसूनच रमजान साजरे करण्याची विनंती केली होती.
जावेद अख्तर कायमच आपले मत प्रखरपणे मांडत असतात, मग ते देशाबद्दल असो किंवा धार्मिक वाद असो, मध्यंतरी आरएसएसच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले होते. निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी मंडळींना भोंगा नावाचा एक नवा विषय मिळाला आहे आता यावरून राजकरण किती तापतंय हे कळेलच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.