बस ड्रायव्हरची प्रसंगावधानता, ५ वर्षाच्या मुलासाठी केले कौतुकास्पद काम
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रोजच्या धकाधकी च्या जीवनात पैशाने श्रीमंत असणारी अनेक माणसे आपल्याला भेटतील परंतु मनाने श्रीमंत असणारी माणसे मात्र दुर्मिळ असतात. यासोबतच एखाद्या आव्हानात्मक प्रसंगी प्रसंगावधान राखून, वेळेत विचार करून कार्य तडीस नेणारी माणसे सुद्धा खूप कमी भेटतात. अशीच मनाची श्रीमंती आणि प्रसंगावधान राखून अचानक आलेले संकट टाळणार्या बेस्ट बस कर्मचार्याची मुंबई ला घडलेली घटना आम्ही आपणास सांगणार आहोत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
घडले असे की शिवम पारकर नावाचा ५ वर्षीय मुलगा आपली आई पूजासोबत बस मार्ग क्रमांक ३३ वरून प्रवास करत होता. अचानक त्याला झटके येऊ लागले, घडत असलेला हा प्रकार बस कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच चालक किशोर वसंत दाणे, सहाय्यक वाहतूक अधिकारी राजेश विचारे, बस वाहक आप्पासाहेब तुळशीराम लोहार या सर्व कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बस मधून खाली उतरण्यास सांगितले.
यानंतर त्यांनी बस ठाकूर हॉस्पिटल, शिवाजी पार्ककडे वळवली आणि शिवमला वेळेत हॉस्पिटल मध्ये पोहोचवले. त्याला आवश्यक ते उपचार मिळत आहेत की नाहीत याची ही खात्री केली. त्यांनी शिवमला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे असलेली दिवसभराची रक्कमही जमा केली.
या त्यांच्या उच्चव प्रशंसनीय कृती मुळे शिवमचे प्राण वाचले बेस्टचे जीएम लोकेश चंद्र यांच्यासह अनेक जणांनी क्रूचे कौतुक केले. ते म्हणाले, आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. या प्रसंगी त्यांचा सत्कार ही करण्यात आला. त्या वेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेली एक फेसबुक वापरकर्ता तन्वी गवाणकर हीने ही घटना पाहिली आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरचे कौतुक करताना तिचा अनुभव कथन केला.
तिने संगितले की “काउंटरवर चौकशी केल्या नंतर मला समजले की मुलाला त्याच्या आईसोबत बसमध्ये असताना तापाचे झटके आले (#फिट) # आणि बस कंडक्टरने सकाळपासून जमा केलेली संपूर्ण रोकड मुलाला दाखल करून घेण्यासाठी जमा केली ( अज्ञात कुटुंबासाठी ही आर्थिक जोखीम त्यांनी पत्करली),”असे ती लिहिते.
या घटनेने ऑनलाइन वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले व कर्मचार्यांचे कौतुक करण्याची संधी साधून घेतली , ज्यावर क्रिकेट चा देव असणार्या सचिन तेंडुलकर यांनी देखील “आज इंटरनेटवर तुम्हाला दिसणारी सर्वोत्तम गोष्ट!” अशी सुंदर टिपणी (कमेंट) केली॰
–
- देशासाठी काम करणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतर खरंच ठार केलं जातं का, सत्य जाणून घ्या
- मुलांना कसं वाढवावं? सुधा मूर्तींनी सांगितलेल्या या टीप्स पालकांनी वाचायलाच हव्यात
–
खरं तर आपल्याकडे असं म्हंटल जात संकटात मदत करतो तोच खरा मित्र, मात्र आपल्या आयुष्यात अशा ही काही अनोळखी व्यक्ती येऊन जातात आणि आपल्याला मदत करून जातात, कधी कधी आपले आप्तस्वकीय देखील पाठ फिरवतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात कोण कधी कमी येईल हे सांगू शकत नाही त्यामुळे एखादी व्यक्तीने आपल्याला संकटकाळी मदत केली असेल तर त्याचे ऋण आयुष्यभर जपा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.