Site icon InMarathi

या ७ प्राचीन भारतीय हत्यारांसमोर भलेभले शत्रू चळाचळा कापायचे!

pawankhind featured 3 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

युद्ध म्हणजेच लढाई किंवा भांडण हे फक्त आजच नाही तर हजारो वर्षांपासून सुरू आहे. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक कालखंडात आपल्याला युद्धाचे उल्लेख आढळून येतील. तसेच युद्ध कोणतेही असू द्या, त्या युद्धामध्ये लढण्यासाठी मनुष्य आणि शस्त्रे सर्वप्रथम आवश्यक असतात.

शस्त्रे आणि ते चालवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याशिवाय कोणतेही युद्ध जिंकणे कठीण आहे.

 

 

आज जगाने शस्त्र बनवण्यामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. प्रत्येक देशाकडे आज एकापेक्षा एक असे घातक शस्त्रे आहेत, परंतु जर आपण प्राचीन काळाबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळची शस्त्रे आजच्यासारखी आधुनिक तर नाही नव्हती, परंतु ही शस्त्र त्याकाळी अत्यंत प्रभावी होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

प्राचीन काळाबद्दल बोलले की आपल्याला फक्त एकाच प्रकारची शस्त्रे आठवतात…जसे की तलवारी, भाले, धनुष्य…पण प्राचीन काळात इतर अनेक प्रकारची शस्त्रे पण होती जी आपण विसरलो आहोत. आणि आजच्या लेखामध्ये आपण असेच काही प्राचीन शस्त्रांविषयी जाणून घेणार आहोत.

१. चक्रम :

 

 

चक्रम हे भारतीय पारंपारिक शस्त्र आहे. हे शस्त्र सपाट धातूपासून बनवले जायचे, जे सहसा स्टीलसारखे मजबूत आणि हलके होते. तथापि, ते पितळ आणि इतर काही धातूंमध्ये देखील पाहिले गेले आहेत. या शस्त्राच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर त्याचा व्यास ५ ते १२ इंच इतका असल्याचे आढळून आले आहे.

ते शस्त्र हाताने वापरले जात होते. ते धरण्यासाठी अंगठा आणि तर्जनी वापरली जायची. जर ते चालवणारी व्यक्ती तज्ञ असेल तर हे शस्त्र शत्रूंसाठी कोणत्याही कहरापेक्षा काही कमी नव्हते.

हे शस्त्र प्रामुख्याने कमी अंतराच्या लढाईत मोठ्या प्रमाणावर वापरले गेले होते. हे शस्त्र उत्तर भारतातील शीखांनी अनेक वर्ष वापरल्याचे मानले जाते. तसेच अशा शस्त्रांचा उल्लेख प्राचीन ग्रीसमध्येही आढळतो.

२. परशु :

 

 

परशु हे कुऱ्हाडीसारखेच दिसणारे एक शस्त्र आहे. परशु हा संस्कृत शब्द आहे, त्याला हिंदीत ‘फरसा’ म्हणतात. देवतांमध्ये, परशु हा भगवान शिवाचे सर्वात धाकटे पुत्र, भगवान गणपती, स्वतः महादेव आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले भगवान परशुराम हे शस्त्र धारण करत असत.

३. गदा :

 

 

गदा हे एक प्राचीन भारतीय पौराणिक शस्त्र आहे. त्याला एक लांब दांडा असतो आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला गोल आणि भरीव धातुचा जड भाग असतो.

अनेकदा तर या शस्त्राच्या फक्त एकाच प्रहाराने शत्रु धरातीर्थ पडायचे. गदा हे हनुमानाचे प्रमुख शस्त्र आहे. याशिवाय महाभारतात भीमसेन, दुर्योधन, दुशासन, बलराम इत्यादी पराक्रमी योद्ध्यांचे मुख्य शस्त्र देखील गदाचं आहे.

४. वाघनखं :

 

वाघनखं म्हणजे वाघाच्या पंज्यावर ज्याप्रकारची नखे असतात तसे नख असलेले शस्त्र. या नखांचा वापर राजपूत आणि मराठे करत होते. तसेच हे तेच हत्यार आहे ज्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला होता.

निहंग शीखदेखील या नखांना त्यांच्या पगडीच्या आतमध्ये ठेवतात. या शस्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते सहजपणे लपवले जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार शत्रुवर अचानकपणे हल्ला करता येते.

हे हत्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते.

५. दांडपट्टा :

 

 

दांडपट्टा हे एक प्राणघातक शस्त्र होते, ज्यामध्ये मराठा योद्धे चांगले निपुन होते असे म्हटले जाते. सोबतच मराठ्यांच्या प्रमुख शस्त्रांमध्येही याचा समावेश होता.

असे म्हटले जाते की ही तलवार इतर तलवारींपेक्षा लांब आणि लवचिक असायची, म्हणून पूर्व प्रशिक्षण न घेता हे तलवार चालवणे कोणालाही शक्य नव्हते, फक्त अनुभवी योद्धेचं या घातक तलवारीवर नियंत्रण ठेवू शकत होते.

या तलवारीची लांबी सुमारे ५ फुटच्या जवळपास असायची. या शस्त्राला पकडण्यासाठी जी पकड म्हणजेच हैंडल असायची ते इतर शस्त्रांच्या तुलनेने मोठे असायचे.

या शस्त्राला लोखंडी हातमोजे तलवार देखील म्हणत असे, कारण यामध्ये आपले हात पूर्ण झाकले जात असे.

६. खुकरी :

 

 

खुकरी हे एकप्रकारे चाकूसारखे शस्त्र असते. हे शस्त्र जरी लहान असले तरी त्याची बनावट अशी असते की त्याला खूप धार असते. प्राचीन काळात खुकरी मोठ्या प्रमाणात वापरले जायचे आणि सध्या हे शस्त्र गुरखा सैनिक वापरतात.

भारतीय सैन्यामध्ये जी गोरखा रेजिमेंट आहे, त्यांना खुकरी शस्त्र स्वतः जवळ ठेवण्याची परवानगी असते. याशिवाय अनेक ठिकाणी लग्नाप्रसंगामध्ये हे शस्त्र सोबत ठेवण्याची प्रथा आहे.

७. खंजीर :

 

 

खंजीर हे एक प्राचीन भारतीय शस्त्र आहे जे सहजपणे मुठीत सहज पकडता येईल अशा पद्धतीने बनवले जायचे. आकाराने जरी ते लहान होते तरी ते इतके मजबूत बनवले जायचे की, कोणत्याही व्यक्तीवर जर याने हल्ला केला तर तो गंभीर जखमी झाल्याशिवय राहणार नाही.

आकाराने लहान असल्यामुळे आपण त्याला सहज कुठेही लपवू शकतो. या शस्त्राविषयी कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही, परंतु असे मानले जाते की याचा शोध १७ व्या ते १८ व्या शतकाच्या दरम्यान झाला होता.

भारतातील मुघलांच्या आणि राजपूतांच्या राजवटीत त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत होता. ते लोखंड, चांदी, सोने इत्यादी अनेक धातूंपासून बनवले होते. तसेच आपण वाचलेच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनीही या शस्त्राचा वापर करून अफजल खानाला ठार केले होते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version