Site icon InMarathi

बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना Jr NTR ने या पद्धतीने दिले सडेतोड उत्तर

jr final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याच्या काळात बॉलिवूडला टक्कर देण्यासाठी टॉलिवूडने कंबर कसली आहे. पुष्पा सिनेमाच्या भव्य यशानंतर रौद्रम रणम रुधिराम म्हणजेच आर आर आर ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. इमोशन आणि अँक्शन यांचा भडिमार असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच मनोरंजन करण्यात कोणतीच कसर सोडत नाही. त्यातील ‘ नाचो.. नाचो ‘ या गाण्याने आणि त्यावरच्या हुक स्टेप्सने तरुणाईला वेड लावलं होत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनाआधीच सोशल मीडियावर बरेच दिवस ट्रेडिंग होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेमाचे हिरो ज्युनियर एनटीआर आणि राम चरण ह्यांच्या जुगलबंदीने सिनेमात जान आणली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या ज्युनियर एनटीआर ह्या हिरोला कधीकाळी बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा खुद्द त्यानेच एका शो दरम्यान केला होता.

 

 

ज्युनियर एनटीआरने आपल्या करियरची सुरवात बाल कलाकार म्हणून केली. २० वर्षांच्या करियरमध्ये त्याने ३० हुन अधिक सिनेमात काम केले आहे, प्रसिद्ध तेलगू अभिनेते टी रामराव हे त्याचे आजोबा त्यामुळे अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले. तसेच त्याने कुचिपुडी नृत्यप्रकार शिकला आहे

ज्युनियर एनटीआरने लोकप्रिय टीव्ही शो इवारु मीलो कोटीस्वरुलु म्हणजेच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या तेलगू अवताराद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ह्या शोला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि चाहत्यांना त्याचे होस्टिंग कौशल्य देखील आवडले. ह्याच शो दरम्यान एका स्पर्धकाशी त्याच्या टक्कल समस्यांबद्दल बोलत असताना त्याने आपला बॉडी शेमिंगचा अनुभव शेयर केला.

 

RRR च्या आधी साऊथचा तडका असलेले राजामौलींचे हे ९ सिनेमे नक्की बघा!

रजनीकांतने नाकारलेली ही भूमिका केवळ ‘नाना’मुळे अजरामर झाली!

आपल्या वाढलेल्या वजनावरून अनेकांनी हिणवलं असल्याची कबुली त्याने दिली. लोकांनी माझ्यावर लठ्ठ आणि कुरूप अशी टिप्पणी केली होती. जास्तीच्या वजनावरून माझी खिल्ली उडवली जायची त्यानंतर यम डोंगा या चित्रपटासाठी मेहनत करून वजन कमी केल्याचे सांगितले. आपलं जीवन नेहमी खासगी ठेवनाऱ्या या अभिनेत्याने सर्वांसमोर हा अनुभव शेयर केल्याने अनेकांनी त्याचे कौतुक केले होते.

ज्युनियर एनटीआर ने राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली रौद्रम रणम रुधिराम (RRR) चित्रपटात केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित तेलुगू सिनेमांपैकी हा एक सिनेमा असून अभिनेता राम चरण या चित्रपटाचा सहनायक आहे.

RRR हा सिनेमा भारतातील दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनाचे काल्पनिक वर्णन आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण, श्रिया सरन, ऑलिव्हिया मॉरिस, अ‍ॅलिसन डूडी आणि रे स्टीव्हन्सन यांसारख्या विविध भाषिक लोकप्रिय अभिनेत्यांनी देखील महत्त्वाच्या भूमिकेत काम केले आहे.

 

 

आपल्या कडे सुद्धा विद्या बालन, ऐश्वर्या रॉय बच्चन अशा अनेकींना बॉडी शेमींगचा सामना करावा लागला होता. त्यावर काहींनी मीडियामध्ये सडेतोड उत्तर दिलं तर काहींनी शांत राहून कामावर फोकस करण्याचा निर्णय घेतला. बॉडी शेमिंगचा वाईट अनुभव पचवून सुद्धा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून यशाला गवसणी घालता येते हे या अभिनेत्याने दाखवून दिले आहे.

वजन कसे कमी केले?

आपल्या वजनावर लक्ष दिले पाहिजे म्हणून ज्युनियर एनटीआरने फ्लोरिडावरून खास दोन ट्रेनरना आमंत्रितक केले होते. आठवड्यातून सहा दिवस जिममध्ये वर्कआउट ते ही सकाळी ६.३० वाजता असे आठ महिने नित्यनियमाने केले. त्याचबरोबरीने डाएटचा समावेश देखील होता.

 

 

भारतीय जेवणात प्रोटीनची कमतरता असल्याने तसेच एनटीआरला मसल्स वाढावायचे असल्याने त्याच्या डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश जास्त करण्यात आला असे त्याच्या ट्रेनरने एका मुलाखतीत सांगितले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version