' आयफोन ८ आहे, १० सुद्धा आहे, पण ‘आयफोन ९’ नाही, असं का बरं?? – InMarathi

आयफोन ८ आहे, १० सुद्धा आहे, पण ‘आयफोन ९’ नाही, असं का बरं??

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ॲपलचा आयफ़ोन जगभरातल्या मोबाईल वापरकर्त्यांसाठी नेहमीच औत्सुक्याची बाब असते. दरवर्षी येणारा नवीन आयफ़ोन हा नुसताच चर्चेचा नाही तर बातम्यांचाही विषय असतो.

मोबाईलच्या बाजारपेठेतील हा उच्चभ्रू ब्रॅण्ड आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. आज आयफ़ोन १३ धुमाकूळ घालत असताना आपण या ब्रॅण्डच्या फ़्लॅशबॅकमधे डोकावणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एक सुरस वस्तुस्थिती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आयफ़ोन सतत नवीन आश्चर्यकारक फ़िचर्स आणून वापरकर्त्यांना आश्चर्याचे धक्के देत असतो. आता यापुढे तंत्रज्ञान जाऊच शकणार नाही असं वाटत असताना येणार्‍या प्रत्येक नवीन वर्षात आयफ़ोन पूर्वी अस्तित्वात नसणारं फ़िचर आणून जगभरात बातम्यांचा विषय बनतो.

फ़ेस आयडी (कोविड कालखंडात मास्क घातलेला चेहरा ओळखणंही आयफ़ोनमधे सामावलं गेलं आहे). फ़ेस टाईम (वॉटसएप व्हिडिओ कॉलिंग नव्हतं, त्या काळात आयफ़ोनचं फ़ेसटाईम प्रचंड लोकप्रिय होतं) सात एस आणि एस प्लसमधे प्रथमच वायरलेस चार्जिंगचं फ़िचर आणण्यात आलं.

मेमोजी, सफ़ारी ब्राऊजर, आयफ़ोन सातच्या जनरेशनमधे प्रथमच वायरलेस चार्जिंगचं फ़िचर आणणं अशा अनेक गोष्टी या ब्रॅण्डला इतरांहून वेगळं सिध्द करतात.

 

iphone inmarathi

 

आयफ़ोन, आयफ़ोन थ्रीजी, थ्रीजीएस,आयफ़ोन फ़ोर, फ़ाईव्ह असा हा २००७ साली सुरू झालेला प्रवास आज आयफ़ोन तेरा पर्यंत येऊन ठेपला आहे. २०१७ साली आयफ़ोन ८ आणि ८ प्लससोबतच आयफ़ोन दहाही लॉन्च करण्यात आला. याचं कारण म्हणजे हे आयफ़ोनचं दहावं वर्षं होतं.

मात्र आयफ़ोन दहाचं बारसं रितीनुसार आयफ़ोन दहा असं न करता आयफ़ोन एक्स (रोमन दहा) असं करण्यात आलं. दहाव्या वर्षाचं सेलिब्रेशन करत असतानाच आयफ़ोननं एक नवीन सुरवातही केली होती.

अनेक गेमचेंजर फ़िचर यात आणले गेले. यापैकीच एक म्हणजे फ़ेस आयडी. फ़ोन कुलूपबंद करणं आणि तो वापरकर्त्याच्या चेहर्‍यानं उघडणं ही सुरक्षितता नविन होती, जिनं अपेक्षेनुसार धमाल उडवली.

आयफ़ोन एसई (२०२०) आल्यावर आयफ़ोन आठला कायमचा निरोप देण्यात आला. या सगळ्यात तुम्ही नोंद घेतली असेल तर एक विचित्र गोष्ट लक्षात आली असेल ती ही की, आयफ़ोनच्या नावात नऊ कधीच नव्हता. आयफ़ोननं त्यांची नऊ ही सेरीज कधीच बनविली नाही. आठनंतर थेट दहावर उडी मारण्याचं काय बरं कारण असेल?

 

iphone-inmarathi

 

ज्याप्रमाणे विंडोजनं आठ नंतर थेट विंडोज दहा आणत नऊला गाळलं त्याचप्रमाणे ॲपलनंही नऊ गाळलं. याचं अधिकृत कारण देताना असं सांगितलं गेलं, की एक नवीन सुरवात म्हणून दहा हा आकडा घेण्यात आला.

हा दहा अंक निवडताना ॲपलच्या इतिहासात प्रथमच अंकाऐवजी अक्षर निवडण्यात आलं. जगभरात ॲपल एक्स म्हणून ज्याची ओळख बनली तो खरंतर दहा होता. अनेक ऐतिहासिक बदल या फ़ोनमधून कंपनीनं केले.

एक चर्चा अशीही आहे, की काही देशांत नऊ अंक अशुभ मानला जातो. चिनी भाषेत याचा अर्थ शाप, जपानी भाषेत वेदना असा आहे. या भावना लक्षात घेत नऊ अंकाला वगळण्यात आल्याचं सांगितलं जातं.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?