दुसऱ्या महायुद्धाचं लिपस्टिक कनेक्शन; हिटलरला यायचा लाल लिपस्टिकचा भयंकर राग
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बहुतांश महिलांना मेकअप आवडतो. मग त्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असोत. काही महिलांना जास्त मेकअप आवडतो तर काहींना एकदम हलका मेकअप आवडतो. खूप कमी स्त्रिया अशाही आहेत ज्यांना मेकअप हा प्रकार अजिबात आवडत नाही.
मात्र या महिलांच्या मेकअप किटमधली म्हणता येईल अशी एक वस्तू आहे जी सर्व वयोगटातल्या महिला वापरतात म्हणजे वापरतातच. ती वस्तू म्हणजे लिप्स्टीक. वेगवेगळ्या रंगांमध्ये येणारी ही एक छोटीशी नळी, पण याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी जाताना होतोच होतो.
या लिप्स्टीकच्या छटा त्यांच्या अर्थाप्रमाणेच भिन्न आहेत. आत्मविश्वास, कामुकता, सामर्थ्य, धैर्य, खेळकरपणा आणि अगदी बंडखोरीसुद्धा. लिप्स्टीक हे खरं तर एक सौंदर्यप्रसाधनाचं साधन आहे, मग तुम्ही म्हणाल त्यात बंडखोरीचा काय संबंध? लाल लिप्स्टीक ही इतिहासात बंडखोरीचं साधन म्हणून वापरली गेली होती.
याबाबत रीड माय लिप्स नावाच्या एका पुस्तकात वाक्य आहे की, “मी घरातून बाहेर पडताना माझा स्विस आर्मी चाकू आणि लिप्स्टीक घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. कारण माझ्या मते एका स्त्रीची ही दोन शस्त्रे आहेत. पण मग आता या महिलेच्या एका ‘शस्त्राचा’ हिटलरसारख्या मनुष्याला राग का येत होता? या लाल लिप्स्टीकमध्ये असं काय वेगळं आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा…
हिटलरला लाल लिप्स्टीकचा राग का यायचा?
लाल लिप्स्टीक ही त्याकाळात महिला खूप मोठ्या प्रमाणात वापरत. त्याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कामाच्या बाबतीत पुरुषांची जागा महिलांनी घेतली. त्यामुळं महिलांचं महत्त्व वाढलं होतं. त्यानंतर त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक म्हणून लाल लिप्स्टीक वापरली गेली.
दुसऱ्या युद्धाच्या सुरुवातीला आधी ब्रिटनमधल्या आणि नंतर अमेरिकेतल्या महिलांना देशाचे आणि सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी म्हणून लाल लिप्स्टीक वापरण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं, पण नेमक्या याच लाल लिप्स्टीकचा अडोल्फ हिटलरला भयंकर तिटकारा होता.
—
- हिटलरच्या विचित्र सवयी, त्याचं “शेवटचं जेवण” आणि मृत्यू अशा प्रकारे उलगडला!
- हिटलरने आत्महत्या केली नव्हती, तो ९५ वर्षे जगला? वाचा यामागचं थक्क करणारं सत्य!
—
हिटलरच्या मते शुद्ध, न घासलेले चेहरा म्हणजे आर्य चेहरा. त्याच्या तुलनेत हा रंगवलेला चेहरा म्हणजे त्याच्या दृष्टीने अन-आर्यन होता. हिटलरने दावा केला होता, की लिप्स्टीक गटारातल्या प्राण्यांच्या चरबीपासून बनवली आहे आहे. त्यामुळं त्यानं आपल्या सभोवतालच्या स्त्रियांना लिप्स्टीक लावू दिली नाही.
हिटलरच्या देशात जाणाऱ्या महिला व्हिसिटर्ससाठी त्यांनी काय काय करू नये याची एक मोठी यादीच तयार केली होती. त्यामध्ये जास्त सौंदर्यप्रसाधने लावू नयेत, लाल लिप्स्टीकचा वापर टाळावा आणि कोणत्याही परिस्थितीत नेलपेंट म्हणजे नखांना रंग लावू नये. मात्र मित्र देशांतल्या महिलांनी हिटलरच्या या विरोधाला न जुमानता लाल लिप्स्टीक लावलीच.
एवढंच नव्हे तर कंपन्यांनी ‘विक्ट्री रेड’ आणि ‘मॉन्टेझुमा रेड’ या शेडमधल्या लिप्स्टीक तयार केल्या. त्याबरोबरच युद्धादरम्यान अमेरिकेतल्या सैन्यात असलेल्या महिलांच्या पोशाखात आणि पेहरावात लाल लिप्स्टीक कंपल्सरी केली होती.
हिटलरचा हाच विरोध ब्रिटनच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी मुद्दाम त्यांच्या देशातल्या महिलांना देशभक्तीचं एक प्रतिक म्हणून लिप्स्टीक वापरायला सांगितली. अगदी नर्स आणि रेड क्रॉस स्वयंसेवी महिलांनीही प्रोटोकॉल म्हणून लिप्स्टीक लावली. त्यावेळेला ‘फाइटिंग रेड’, ‘पॅट्रियट रेड’ आणि ‘ग्रेनेडियर रेड’ अशा नावांनी लाल लिप्स्टीक विकली जात होती.
या लिप्स्टीकचा उगम नेमका केव्हा झाला?
इतिहास शोधायला जायचं तर अगदी सुरुवातीच्या संस्कृतींपाशी लिप्स्टीकचा इतिहास जातो. मेसोपोटेमियाच्या चार प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणजे प्राचीन ‘उर’ची राणी शुब-अडने (अंदाजे ३,५०० BC) पांढर्या शिशाच्या आणि पिचलेल्या लाल रत्नांचा आधार असलेले लिप कलरंट वापरले.
त्यानंतर ते तिथून असासुर आणि ईजिप्शियन लोकांकडे गेले. क्लिओपात्राने चिरडलेल्या कार्माइन बीटल आणि मुंग्यांपासून ओठ रंगवण्यासाठी लाल रंग तयार केले, असे म्हटले जाते.
सिंधू संस्कृतीतील स्त्रिया देखील त्यांचे ओठ रंगवत असत अशा ओळखल्या जातात. असा आपण इतिहास जितका उगाळू तितका तो आपल्याला आणखी खोलात नेईल, लिप्स्टीक महिलांच्या आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ करणारी असली तरी ती महिलांच्या ज्वलंत इच्छा आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.