आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जसं हॉलीवूडमध्ये Me Too मुव्हमेंटने खळबळ माजवली त्यानंतर हा प्रकार गेल्या काही वर्षात आपण बॉलिवूडमध्येसुद्धा पाहिला. Me Too अंतर्गत खूप जुन्या केसेससुद्धा बाहेर येऊ लागल्या.
साजिद खान, विवेक अग्निहोत्रीसारख्या दिग्दर्शकापासून आलोक नाथ, नाना पाटेकरसारख्या ज्येष्ठ कलाकारांवर भयंकर आरोप केले गेले. त्यात नेमकं तथ्य किती आहे हे अजूनही कोणाला ठाऊक नाही!
ही सगळी प्रकरणं आत्ता कुठे थंड होत आहेत तोच पुन्हा बॉलिवूडमधला एक भयानक प्रकार समोर आला आहे. सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्यावर त्याच्याच एका को-डान्सरने यौन उत्पीडनचे आरोप केले आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
यामुळे पुन्हा बॉलिवूडचा विद्रूप चेहेरा उघडकीस आला आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊया!
खरंतर गणेश आचार्य यांच्यावर २०२० मध्येच त्यांच्या को-डान्सरने लैंगिक शोषण करण्याचे आरोप लावले होते. याबद्दल पोलिस तपास करत होते. नुकतंच पोलिस ऑफिसर संदीप शिंदे यांनी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन मैजिस्ट्रेट कोर्टात याबद्दल चार्जशीट फाइल केली आहे.
इंडियन पिनल कोंड अंतर्गत लैंगिक शोषण, जबरदस्ती पोर्न फिल्म्स दाखवणे, पाठलाग करणे, विनम्रतेचा अपमान करणे, अशा वेगवेगळ्या आरोपांची चार्जशीट पोलिसांनी गणेश आचार्य आणि त्यांच्या असिस्टंटच्या विरोधात सादर केली आहे.
दीपिका पदूकोण, श्रद्धा कपूर, रणवीर सिंह अशा कित्येक बॉलिवूड कलाकारांना गणेश यांनी त्यांच्या तालावर नाचवलं आहे. नुकत्याच जबरदस्त हिट झालेल्या पुष्पा सिनेमातल्या oo antaava या गाण्याची कोरियोग्राफीसुद्धा गणेश यांनीच केली होती.
सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि समंथा यांचं हे आयटम सॉन्ग चांगलंच लोकप्रिय झालं त्यावर लाखों करोडो रील्स बनले. यातला सेक्सी अदासुद्धा लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतल्या.
—
- कॉर्पोरेटमधील तरुणींची असुरक्षितता पुन्हा उजेडात – TVF च्या अरुनभ कुमारवर विनयभंगाचा आरोप!
- नाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा
—
गणेश यांनी हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं आधीच स्पष्ट केलं असलं तरी या चार्जशीटमुळे सध्या हे प्रकरण पुन्हा चांगलंच तापलं आहे.
जेव्हा गणेश आचार्य यांनी त्या को-डान्सरकडे sexual demand केली तेव्हा तिने साफ नकार दिला, आणि त्यानंतरच गणेश यांनी तिचं लैंगिक शोषण करायला सुरुवात केली. कोरिओग्राफर त्या डान्सरवर अश्लील टिप्पणी करायचे, पॉर्न व्हिडिओज दाखवून लैंगिक शोषण करायचे असं तिने पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नमूद केलं आहे!
पीडित महिलेने यावर आणखीन खुलासा करत सांगितले की २०१९ मध्ये गणेश आचार्य यांनी तिला सांगितले होते की “यशस्वी व्हायचं असेल तर माझ्यासोबत सेक्स करावाच लागेल!” आणि त्या महिलेने तेव्हासुद्धा साफ नकार दिला होता.
२०२० मध्ये गणेश आचार्य यांच्या वर्तणूकीचा विरोध करताना त्यांच्या असिस्टंटने या महिलेला मारहाणदेखील केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वप्रथम पोलिसांनी या महिलेचे तक्रार non-cognisable offence म्हणून नोंदवून घेतली.
जेव्हा त्या को-डान्सरने वकिलांची मदत घेतली तेव्हा हे प्रकरण पुढे गेलं आणि आज त्यासंदर्भात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
अजूनही गणेश आचार्य यांनी याबद्दल अधिकृत असं काहीही स्टेटमेंट दिलं नसलं तरी हे प्रकरण इतक्यात थंड होणारं नाहीये. शेवट निकाल काय लागतोय किंवा नेमकं सत्य समोर येणार का हे येणारा काळच ठरवेल!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.