Site icon InMarathi

‘मिस युनिव्हर्स’ हरनाझ संधू ज्या गंभीर आजाराचा सामना करतेय, तो नेमका काय आहे?

harnaz im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सेलिब्रिटीज म्हटलं की त्यांच्याभोवतीचं प्रचंड वलय, त्यांच्या एअरपोर्ट लुक्सपासून मासिकांच्या कव्हर्ससाठीचे त्यांचे फोटोशूट्स, त्यांचा फिटनेस, त्यांची जीवनशैली अशा अनेक गोष्टींचं आपल्याला अप्रूप असतं. त्यात आपल्या देशातली एखादी स्त्री जेव्हा ‘मिस युनिव्हर्स’चा बहुमान मिळवते तेव्हा देशासाठी ही अभिमानाची बाब असतेच पण आता ती व्यक्ती कायम लाइमलाईटमध्ये राहणार असते. सगळ्या अभिनेत्रींच्या बाबतीत हे घडतंच पण ज्या व्यक्तीचा तिच्या सौंदर्यासाठीच सन्मान केला गेलाय तिच्या बाबतीत हे जास्त घडतं.

 

 

हा मुकुट मिळाला त्यावेळचं तिचं सौंदर्य आणि बांधेसूदपणा तिने त्यानंतरही टिकवून ठेवलाय का याकडे लोकांचं बारीक लक्ष असतं. पण ‘मिस युनिव्हर्स’ असणारी ही व्यक्तीही आधी एक माणूसच असते आणि सगळ्या माणसांच्या आयुष्यात कधी ना कधी जसं अवघड वळण येतं तसं ते या व्यक्तीच्या आयुष्यातही येऊ शकतं ही शक्यता लोक विसरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मिस युनिव्हर्स हरनाझ संधू सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलीये. ‘बॉडी शेमिंग’ हा प्रकार कुणालाही नवा नाही. सेलिब्रिटीजच्या बाबतीत तर हे बॉडी शेमिंग हमखास होतंच. हरनाझ संधूचं वाढलेलं वजन हा दुर्दैवाने सध्या काही जणांच्या चेष्टेचा विषय ठरलाय. पण आपल्या वजनवाढीमागच्या कारणाचा खुलासा तिने इतक्यातच केलाय. तिला ‘सिलियॅक’ नावाचा आजार झालाय. काय आहे हा आजार? जाणून घेऊ.

 

 

‘मिस युनिव्हर्स २०२१’ ठरलेली हरनाझ इतक्यातच भारतात परतली. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये तिने रॅम्प वॉक केला आणि शिवम आणि नरेश या डिझायनर्ससाठी ती शोजटॉपर झाली. अनेकांनी जरी तिच्या ग्रेसफुल चालण्याचं कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र तिचं वाढलेलं वजन पाहून सोशल मीडियावर तिला ट्रोल केलंय. आपल्याला ‘सिलियॅक’ हा आजरा झाला असून त्यामुळे आपलं वजन वाढलं असल्याचं हरनाझने सांगितलंय.

 

 

‘सिलियॅक’ या आजाराबद्दल :

हा आजार पचनासंबंधित असून खाद्यपदार्थांमध्ये असलेलं ग्लूटन शरीराला चाललं नाही तर हा आजार होतो. ‘स्पृए’, ‘नॉनट्रॉपिकल स्पृए’ आणि ‘ग्लूटन सेन्सेटिव्ह एंटरोपॅथी’ अशी ‘सिलियॅक’ या आजाराची वेगवेगळी नाव आहेत. हा आजार असणाऱ्या व्यक्तींना ग्लूटन असलेल्या पदार्थांचं सेवन करणं पूर्णतः बंद करावं लागतं.

राई नावाचं एक धान्य, गव्हापासून बनवलेले पदार्थ, बार्ली, ब्रेड, पास्ता आणि तृणधान्यं हे पदार्थ आपल्या आहारातून कायमस्वरूमी बाद करावे लागतात. आपल्याला ग्लूटनची ऍलर्जी असल्याचं आणि वेगवेगळ्या देशांत गेल्यावर आपल्या शरीरात बदल होत असल्याचं हरनाझने ANI शी बोलताना सांगितलं.

 

 

चंदिगढ मधल्या एका कार्यक्रमात स्त्री म्हणून असलेल्या वैयक्तिक संघर्षविषयी ANI शी बोलताना ती म्हणाली, “मी त्या व्यक्तींपैकी एक आहे जिला आधी “ती खूप बारीक आहे” असं म्हणून खिजवलं गेलं आणि आता “ती जाड आहे” असं म्हणून खिजवलं जातंय. मला झालेल्या सिलियॅक या आजाराबद्दल कुणालाही माहीत नाही. त्यामुळे मला गव्हापासून बनलेले आणि आणखीही बाकी पदार्थ खाता येत नाहीत.”

ANI शी बोलताना ती पुढे म्हणाली, “वेगळ्या ठिकाणी गेलं की शरीरात फरक झालेला जाणवतो. जेव्हा एखादी व्यक्ती पंजाबला किंवा आणखी कुठल्या ठिकाणी जाते तेव्हा तिचं वजन वाढतं किंवा आपल्या शरीरात बदल झाल्याचं त्या व्यक्तीला दिसतं. माझ्या बाबतीत हेच घडलं. मी न्यू यॉर्कला गेले जे माझ्यासाठी पूर्णतः नवं होतं.”

आहारतज्ञांसाठी असलेल्या ‘टुडेज डाएटिशियन’ या मासिकानुसार, सिलीयॅकी या आजारामुळे वजन वाढूही शकतं किंवा कमीही होऊ शकतं. गोळा येणे, थकवा, लोहाची कमतरता, अशक्तपणा, मळमळ आणि उलटी, डोकेदुखी आणि थकवा, सांधेदुखी आणि कडकपणा आणि ‘डरमॅटिटीस हर्पेटीफॉर्मिस’ नावाचा त्वचारोग ही या आजाराची लक्षणं आहेत.

 

 

अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटीस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस’ च्या म्हणण्यानुसार, या आजारामुळे पचनाशी संबंधीत समस्या दीर्घकाळ उद्भवू शकतात ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेली पोषकमूल्यं शरीराला मिळत नाहीत. इंग्लंडच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’च्या म्हणण्यानुसार, सिलियॅक या आजारामुळे अशक्तपणा आणि हाडं कमकुवत होणे यासारखे त्रास दीर्घकाळ होऊ शकतात.

‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ने पुढे म्हटलंय की, “सामान्यतः आढळून न येणाऱ्या आणि अधिक गंभीर असलेल्या त्रासांमध्ये बॉवेल कॅन्सर सारखे काही प्रकारचे कर्करोग, जन्माच्या वेळी बाळाचं वजन कमी भरणं यासारख्या गरोदरपणावर परिणाम करणाऱ्या समस्या यांचा समावेश होतो.

‘सिलियॅक’ हा आजार बरा होऊ शकत नाही. मात्र रुग्ण त्याची लक्षणं नियंत्रणात ठेवू शकतात आणि ग्लूटन फ्री आहाराचं सेवन करून दीर्घकाळ होणारे त्रास टाळू शकतात. ग्लूटन खाणं पूर्णतः टाळून आपण संतुलित आणि निरोगी आहार कसा घेऊ शकतो याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेता येऊ शकतो.

 

‘कसंतरीच होतंय’ या त्रासदायक ठरणाऱ्या आजारावर “हे” आहेत घरगुती रामबाण उपाय

ही लक्षणं म्हणजे एका गंभीर समस्येची सुरुवात… अशा त्रासांकडे दुर्लक्ष करू नका

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ‘हिजाब’च्या संदर्भात स्त्रियांच्या हक्कांविषयी बोलताना हरनाझ संधू म्हणाली की, लोकांना जसं जगायचंय तसं त्यांना जगू द्यावं असं तिला वाटतं.

शरीराबाबतचा सकारात्मक संदेश देताना हरनाझ म्हणाली, “मी त्या धीट आणि आत्मविश्वास असलेल्या मुलींपैकी एक आहे ज्या जरी मी जाड असले, जरी मी बारीक असले तरी हे माझं शरीर आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे असा विश्वास बाळगतात.”

ट्रोलिंगचा आपल्यावर काहीही परिणाम होऊ न देता हरनाझ संधूने स्वतः ‘मिस युनिव्हर्स’ झालेली असूनही स्वतःचा, स्वतःच्या शरीराचा इतक्या प्रगल्भपणे स्वीकार करणं ही बाब नक्कीच प्रशंसनीय आहे. आपल्याला झालेल्या या आजाराविषयी ती उघडपणे बोलल्यामुळे हा आजार झालेल्या इतरांनाही यामुळे काहीसं बरं वाटेल.

‘बॉडी शेमिंग’ची मानसिकता बदलायला अजून काही काळ जाईल. पण हरझानच्या शब्दांमुळे सगळ्यांनाच, विशेषतः सर्वसामान्य मुलींना, स्त्रियांना आपण जसे आहोत तसा स्वतःचा स्वीकार करण्याचं बळ नक्कीच मिळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version