Site icon InMarathi

मनी लॉन्ड्रिंग ते हत्येचे आरोप: पाकिस्तानचा भावी पंतप्रधान म्हणून यांच्याकडे बघितलं जातंय

imran final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पाकिस्तान या देशात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या देशासाठी ते काही नवीन नाहीये. पाकिस्तानमधील राजकारणामुळे तिथे आजवर झालेल्या सर्वच पंतप्रधानांची त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतांना दमछाक झाली होती. बेनझीर भुट्टो यांचा खून होणे, परवेझ मुशर्रफ पंतप्रधान असतांना अचानक गायब होणे, नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरून काढून त्यांना देशद्रोही वगैरे लेबल लावणे अशा विचित्र घटनांचा हा देश साक्षीदार आहे.

इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर परिस्थिती बदलेल असा आशावाद पाकिस्तानच्या लोकांनी आणि राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. पण, मागच्या दोन दिवसांच्या घडामोडी बघितल्या की हे लक्षात येत आहे की, १९९२ चा क्रिकेट विश्वचषक जिंकणारा हा कर्णधार सुद्धा तिथल्या राजकीय वातावरणाचा बळी ठरणार आहे.

 

 

कमकुवत अर्थव्यवस्था, मूलभूत वस्तूंचे वाढलेले भाव, गॅसची कमतरता यामुळे आधीच ‘सलाईन’ वर असलेल्या या देशात आता पुन्हा एकदा निवडणुका होणार, नवीन पंतप्रधान होणार अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. ‘शहबाझ शरीफ’ यांचं नाव नवीन पंतप्रधान म्हणून समोर येत आहे. पण, या सर्वांशी आपला काय संबंध आहे ? ते त्यांच्या देशात काही का गोंधळ घालू देत भारतीय मीडियाने या घटनेला का महत्व द्यावं ? हे प्रश्न पडणं सहाजिक आहे.

 

 

या प्रश्नांचं उत्तर असं सांगता येईल की, एक महत्वाचा देश म्हणून नसला तरी शेजारचा एक ‘धोकादायक’ देश म्हणून केवळ आपण तिथे घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत.

शहबाझ शरीफ हा नव्याने पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ पाहणाऱ्या या व्यक्तीमध्ये देखील तिथे प्रगतीची क्रांती घेऊन येण्याची क्षमता नाहीये हे राजकीय विश्लेषकांनी आधीच घोषित केलं आहे. नवाज शरीफच्या या लहान भावाला लोक अकार्यक्षम पंतप्रधान असं का म्हणत आहेत? शहबाझ शरीफ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आजवर काय दिवे लावले आहेत ? हे जाणून घेऊयात.

 

 

शहबाझ शरीफ कोण आहे ?

शहबाझ शरीफ यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५१ रोजी लाहोर येथे एका काश्मिरी कुटूंबात झाला होता. त्यांचे वडील मोहम्मद शरीफ हे एक उद्योजक होते. मूळचे अमृतसरचे असलेले हे लोक फाळणीनंतर लाहोरला स्थलांतरित झाले आणि तिथे त्यांनी ‘इत्तेफाक ग्रुप’ नावाची बांधकाम क्षेत्रातील कंपनी सुरू केली. शहबाझ शरीफ हे आज या कंपनीचे मालक आहेत.

 

 

स्टील आणि बांधकाम क्षेत्रातील कामामुळे त्यांना १९८५ मध्ये लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

शहबाझ शरीफ हे आज ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’ या विरोधी पक्षाचे नेते आहेत. १९९७, २००८ आणि २०१३ या काळात ते पाकिस्तानमधील पंजाबचे मुख्यमंत्री होते.

शहबाझ शरीफ यांनी केलेली वादग्रस्त कामं:

१९९९ मध्ये पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. सरकार चालवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी शहबाझ शरीफ यांना ८ वर्षांसाठी सक्तीने सौदी अरेबियात पाठवून देण्यात आलं होतं.

२००३ मध्ये सौदी अरेबियात असतांना तिथून पाकिस्तानच्या पोलिसांमार्फत त्यांनी ५ धर्मप्रसारक विद्यार्थ्यांचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अतिरेकी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे खोटे आरोप त्या विद्यार्थ्यांवर शहबाझ शरीफने लावले होते.

२००७ मध्ये पाकिस्तानात परतल्यावर शहबाझ शरीफ यांना खुनाचा प्रमुख आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि एक वर्षासाठी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्याची त्यांना परवानगी नव्हती.

मार्च २०१८ मध्ये त्यांची ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’चे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. नवाझ शरीफ यांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्याच्या कारस्थानात शहबाझ शरीफचा देखील सहभाग असल्याचं बोललं जातं.

 

noumanafzal.wordpress.com

डिसेंबर २०१९ मध्ये शहबाझ शरीफ आणि त्यांचा मुलगा हमझा शरीफ यांना ‘नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो’ (एनएबी) म्हणजेच पाकिस्तानच्या ईडीने ‘मनी लौंड्रींग’ प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांच्या २३ मालमत्तांना सील केलं.

सप्टेंबर २०२० मध्ये ‘एनएबी’ने शहबाझ शरीफ यांना अटक केली आणि त्यांना लाहोर हायकोर्टात सादर केलं. पैशांच्या अफरातफरीचे आरोप सिद्ध झाले आणि शहबाझ शरीफ यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

एप्रिल २०२१ मध्ये भरपूर प्रयत्नानंतर लाहोर हायकोर्टाने शहबाझ शरीफ यांना जामीन दिला आहे. ‘मनी लौंड्रींग’चं प्रकरण आजही न्यायप्रविष्ट असतांना ती व्यक्ती एका देशाच्या पंतप्रधान पदाची दावेदार असू शकते ही एक आश्चर्याची बाब आहे.

 

हैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” का आहेत? विचारात पाडणारं “जळजळीत” वास्तव!

‘काश्मीर भारतापेक्षा चीनकडे जास्त सुखी राहील’, फारूक अब्दुल्लांची वादग्रस्त वक्तव्ये

सद्यस्थिती :

३४२ खासदार संख्या असलेल्या लोकसभेत १७६ खासदारांचं संख्याबळ असलेलं इम्रान खानचं सरकार हे मागील दोन दिवसात १६३ वर येऊन ठेपलं आहे. ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ या पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी नुकतीच शहबाझ शरीफ यांच्या नावाची ‘भावी पंतप्रधान’ म्हणून घोषणा केली आहे.

शहबाझ शरीफ यांची पंतप्रधान होण्याची शक्यता अधिक आहे कारण त्यांचे लष्करासोबत चांगले संबंध आहेत जे की पाकिस्तानमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. चीन आणि तुर्कीस्तान या देशांशी असलेले त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध देखील त्यांना या पदाचे दावेदार करतात असं सांगितलं जातं.

पाकिस्तानने नेहमीच आतांकवादाला खतपाणी घालत दुटप्पीपणाने प्रगत देशांकडून आर्थिक मदत हस्तगत केली आहे. ‘जसा देश तसा वेश’ या म्हणीप्रमाणे पाकिस्तान या देशाचा पंतप्रधान सुद्धा अगदी स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती असणं हे शक्यच नाहीये हे एव्हाना तिथल्या जनतेने सुद्धा मान्य केलं आहे.

 

 

शहबाझ शरीफ सुद्धा त्या देशाच्या धोरणाप्रमाणेच खोटं वागत राहतील. तिथले लोक त्यांची साथही देतील. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास किती मदत होईल ? हा एक मोठा प्रश्न आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version