Site icon InMarathi

लगेज हरवलं म्हणून या पठ्ठ्याने एयरलाईन कंपनीला शिकवला ‘जगावेगळा’ धडा..!

nandan kumar featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेकदा प्रवासादरम्यान सामानाची आदलाबदली होण्याच्या किंवा सामान हरवण्याच्या घटना काही आपल्यासाटी नवीन नाहीत. अगदी एसटीचा प्रवास असुदे नाहीतर विमानाचा, सामान हरवण्याच्या घटना सगळीकडेच घडतात. कधी पिशव्या एकसारख्या असतात नाहीतर सूटकेसेस सारख्या असतात. घाईमध्ये त्या बदलल्या जातात.

त्यानंतर ते हरवलेले सामान शोधाशोधीसाठी होणारा मनस्ताप तो वेगळाच. हा असा सामान हरवण्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मित्रांनो असाच अनुभव बेंगलोर स्थित एका IT अभियंत्याला देखील आला तेव्हा त्याने या समस्येवर काय उपाय शोधला आणि आपले बदलले गेलेले सामान परत कसे मिळवले ते आपण जाणून घेणार आहोत या लेखातून. तेव्हा चला पाहू नक्की काय झाले होते.

 

 

तुम्ही जर वारंवार विमान प्रवास करत असाल तर सामान बदलले जाण्याच्या घटना तुमच्यासाठी नवीन नसतील आणि त्यानंतर बदलले गेलेले सामान पुन्हा परत मिळवताना त्या विमान कंपनीच्या ग्राहक सेवेशी सतत संपर्क साधून आपले सामान परत मिळवणे हे किती जिकिरीचे काम असते याचाही तुम्हाला अनुभव असेलच.

नंदन कुमार यांनी मात्र आपली समस्या सोडवण्यासाठी चक्क संबंधित विमान कंपनीची वेबसाईट हॅक केली.

झाले असे की बेंगलोरचे IT अभियंता असलेले नंदन कुमार पटण्याहून इंडिगो एयरलाईन्स च्या विमानाने बेंगलोरला परत आले. या प्रवासात त्यांच्या बॅगेची त्यांच्या सहप्रवाशाच्या बॅगेसोबत आदलाबदली झाली.

 

 

घरी परत आल्यानंतर त्यांच्या पत्नीने ही बॅग बादलीची गोष्ट त्यांच्या नजरेस आणून दिली कारण कुमार यांच्या बॅगची लॉक सिस्टम वेगळी होती. आपली बॅग बदलली गेल्याचे लक्षात येताच कुमार यांनी विमान कंपनीच्या ग्राहक कक्षाशी संपक साधला व आपली समस्या संगतली,पण त्यांना ग्राहक कक्षाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

तरीही सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत त्यांनी पुढचा पूर्ण दिवस वाट पहिली पण काहीच उपाय मिळाला नाही आणि बॅग ही मिळाली नाही. तेव्हा नंदन कुमार यांनी स्वत: प्रयत्न करून पाहण्याचे ठरवले.

विमान कंपनीच्या ग्राहक कक्षाकडून मदत न मिळाल्याने नंदन यांनी कंपनीची वेबसाइट हॅक करण्याचे ठरवले. आपल्या ट्विटर वर पोस्ट करताना त्यांनी संगितले की, ” मी माझ्या डेव्ह इन्स्टिंक्टने सुरुवात केली आणि मी माझ्या संगणकाच्या कीबोर्डवरील F12 बटण दाबले आणि @IndiGo6E वेबसाइटवर डेव्हलपर कन्सोल उघडले आणि नेटवर्क लॉग रेकॉर्डसह संपूर्ण चेकइन प्रवाह सुरू केला.”

शेवटी नेटवर्कच्या एका प्रतिसादात कुमार यांना प्रवाशांचे सर्व तपशील सापडले. याला त्यांनी ‘हॅकर मोमेंट’ म्हटले आहे. ज्या प्रवाशासोबत नंदन यांची बॅग बदलली गेली होती तो सुदैवाने नंदन यांच्या घरापासून काही अंतरावर राहणारा निघाला. दोघांनी कुठेतरी मिड पॉइंटला भेटून आपआपल्या बॅग एक्सचेंज केल्या.

 

 

त्यांनी हे सर्व एअरलाइनच्या मदतीशिवाय केले आणि नंदनने इंडिगोसाठी काही सूचना देखील केल्या आहेत. त्यांनी एअरलाइनला त्यांचा IVR दुरुस्त करण्यास, ग्राहक सेवा अधिक चांगली बनवण्यास सांगितले आणि सर्वांत महत्त्वाचे: त्यांच्या वेबसाइटचे निराकरण करण्यास सांगितले कारण ती संवेदनशील ग्राहक डेटा लीक करते.

विमान कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतीनिधीने दावा केला की त्यांची वेबसाइट कोणत्याही प्रकारे हॅक झाली नसून संबंधित सहप्रवाशाला तीनवेळा कॉल करण्यात आला होता.

नंदन यांनी त्या सहप्रवाशाला यासंबंधी विचारणा केली असता असा कोणताही कॉल आपल्याला आला नसल्याचे त्याने स्पष्ट केले. तेव्हा मित्रांनो प्रवास कोणताही आणि कोणत्याही वाहनातून केलेला असो, आपले समान आपणच सांभाळावे हेच योग्य नाही का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version