Site icon InMarathi

सावधान, जिममध्ये ओळख झालेल्या बिझनेसमनने अभिनेत्रीला करोडो रुपयांना गंडवलंय

rimi sen im 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सामान्य माणूस असो की सेलिब्रिटी, प्रत्येकाला पैशांची गरज लागतेच. आपण सगळेच भविष्याच्या दृष्टीने तरतूद म्हणून पैशांची गुंतवणूक करतो. पण एखाद्या वेळेस अशी गुंतवणूक केल्यावर आपल्याला त्यातून एका पैशाचाही फायदा न होता आपल्याजवळ होते ते पैसेदेखील आपल्याकडून हडप केले गेले तर?

सेलिब्रिटी मंडळींकडे असते तशी कोटींची मालमत्ता आपल्याकडे नसते, तरी आपले पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत याचा ताण मनावर वागवणं म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच माहीत असतं. गुंतवणुकीच्या नावाखाली कधीकधी खोटी आमिषं दाखवून काही भामटे लोकांना गंडवतात. अगदी एखाद्याला आयुष्यातून उठवण्यापर्यंतही अशा घटनांची तीव्रता असू शकते.

आपल्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेली अशी फसवणूक आपल्या कानांवर आलेली असते. कोरोनाच्या काळात तर असे भामटे चांगलेच सोकावले आणि त्यांनी अनेक भाबड्या माणसांना लुबाडलं. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीजही अशा घटनांचे बळी ठरतात.

अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना एका अभिनेत्रीच्या बाबतीत घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. एका बिझनेसमनने आपल्याला तब्बल ४.१४ करोड रुपयांना गंडवलंय अशी एफआयआर रिमी सेन या अभिनेत्रीने नोंदवली आहे. इतका मोठा धक्का बसल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. काय आहे ही सबंध घटना? जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रिमी सेन या अभिनेत्रीने गोरेगावमधल्या एका बिझनेसमनने आपल्या तब्बल ४.१४ करोड रुपयांना गंडवलंय असा दावा केला आहे. तिने केलेल्या तक्रारीनुसार, २९ मार्चला यासंदर्भात खार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवली गेली आहे.

नोंदवलेल्या एफआयआर नुसार, रौनक जतीन व्यास असं या आरोपीचं नाव असून तो गोरेगावमधला एक बिझनेसमन आहे. ४० वर्षांच्या असलेल्या या अभिनेत्रीचं खरं नाव शुभमित्रा सेन असून आपण एक प्रॉडक्शन हाऊस चालवतो आणि खार पश्चिम ला आपलं कार्यालय आहे अशी माहिती तिने पोलिसांना दिली.

 

 

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, आपल्या ‘हंगामा’ आणि ‘बाघबान’मधल्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री २०१९ मध्ये या माणसाला अंधेरी पश्चिम इथल्या डीएन नगर परिसरातल्या जिममध्ये भेटली. ‘फोमिंगो बेव्हरेजेस’ नावाची आपली एक कौटुंबिक संस्था आहे. त्यामार्फत गुंतवणूक करता येते असा त्याने दावा केला होता.

काही महिन्यांतच या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्याने तिला आपण एक नवा बिझनेस सुरू करत असल्याचं सांगितलं आणि एका इन्व्हेस्टमेंट प्लॅनचं तिला आमिष दाखवून गुंतवणूक केलेल्या रकमेवर आपण ३०-४० टक्के व्याज देऊ असं वचन दिलं.

या गुंतवणुकीसंदर्भात आपल्या बिझनेस पार्टनरशी चर्चा करून तिने व्यास याच्याशी करार केला. त्यावेळी तिला त्याच्याकडून ३.५० करोड रुपयांच्या सिक्युरिटी अमाऊंटचा चेकही मिळाला होता.

या अभिनेत्रीने आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून फेब्रुवारी २०१९ पासून नोव्हेंबर २०२० पर्यंत एकूण ४.१४ करोड रुपये गुंतवले, मात्र जेव्हा तिने त्याला पैशांबाबत विचारणा करायला सुरुवात केली तेव्हा तो आरोपी तिचे फोन घेणं टाळू लागला. तिच्या खात्यात फक्त ३ लाख रुपये जमा झाले.

 

 

त्याने आधी तिला दिलेला चेक तिने जमा करायचं ठरवलं तेव्हा या आरोपीने कधीच नवा व्यवसाय सुरू केला नव्हता आणि त्याने आपल्याला गंडवलंय हे लक्षात येऊन तिला धक्का बसला. त्यानंतर तिने यासंबंधी पोलिसात तक्रार नोंदवली.

खार पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात एफआयआर नोंदवली गेली असून ४०९ आणि ४२० या दोन आयपीसी कलमांअंतर्गत त्याच्या विरोधात खटले नोंदवण्यात आले आहेत. मात्र आरोपीला पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नसून आरोपीचा शोध सुरू आहे.

रिमी सेन २०१५ साली ‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली होती. ‘फिर हेरा फेरी’, ‘गोलमाल’, ‘धूम’, ‘हंगामा’, ‘गरम मसाला’, ‘बाघबान’, ‘क्यूँ की’ या चित्रपटांतून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. हिंदीप्रमाणेच बंगाली आणि तेलगू चित्रपटांमध्येही तिने कामं केली आहेत.

 

 

रिमी सेन कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना इतक्यातच उधाण आलं होतं. ‘इ टाइम्स’शी बोलताना ती म्हणाली की, ती लवकरच एका म्युझिक व्हिडियोमध्ये दिसणार आहे. या व्हिडियोसाठी ती प्रेरणा अरोरासोबत एकत्र येत आहे. या म्युझिक व्हिडियोचं शूटिंग अद्याप सुरू झालेलं नाही.

 

 

प्रलोभनांना भुलून गुंतवणूक करायला गेलं तर त्याचे केवढेतरी गंभीर परिणाम भोगावे लागतात. गुंतवणुकी करताना आपल्याला दिवसेंदिवस किती जास्त जागरूक रहावं लागणार आहे हेच रिमी सेनच्या या घटनेवरून आपल्या लक्षात येतं. त्यामुळे यापुढे जेव्हा आपण कुठेही गुंतवणूक करू तेव्हा ती योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे केली जातेय की नाही याची खातरजमा आधी करून घ्यायला हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version