Site icon InMarathi

अनुपम खेरच नव्हे तर या ७ काश्मिरी पंडितांनी बॉलीवूड गाजवले आहे

raina im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काश्मीर नैसर्गिक सौंदर्यामुळे ओळखलं जातच पण दुसरीकडे दहशतवादी घटनांमुळे देखील चर्चेत असतं. असं म्हंटलं जात की स्थानिक नेते आणि POK (पाकव्याप्त काश्मीर) जबाबदार आहे. ‘काश्मिरी पंडितांना काश्मीर मधून पळवून लावलं’ या सारख्या भीषण घटना देखील काश्मीरशी जोडल्या गेलेल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

निसर्गाने भरभरून दिलेल्या या प्रदेशाला कशी दहशतवादाची काळी बाजू आहे तशी कलेची देखील बाजू आहे, याच काश्मीरच्या वादीयांमध्ये काही कलाकारांनी जन्म घेतला आहे ते नेमके कोण ते आजच्या लेखात जाणून घेऊयात..

 

scroll.in

 

नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ मध्ये देखील या घटनांचा समावेश आहे. या घटनांमध्ये होरपळले गेलेले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरदेखील या चित्रपटाचा भाग आहेत, त्यांच्या परिवाराला देखील १९९० साली या घटनांचा सामना करावा लागला होता. असेच बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत जे कश्मिरी पंडित आहेत.

 

 

१. मोहित रैना

टेलिव्हिजन, बॉलीवूड व ओटीटी मधील एक ओळखीचं नाव म्हणजे मोहित रैना. ‘देवों के देव महादेव’ या सिरियल मध्ये भगवान शिव शंकरांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला चेहरा. सिरियलच नव्हे तर अनेक बॉलीवूडचे सिनेमे आणि ओटीटीवरील सिनेमेदेखील मोहित रैना यांनी केले आहेत. ‘भौकाल’ या वेबसिरीजमधून त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. उरी सिनेमात छोटेखानी भूमिकेत तो भाव खाऊन गेला.

मोहित रैना हे एक ‘कश्मिरी पंडित’ आहेत, ज्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९८२ साली झाला. जम्मूच्या केंद्रीय विद्यालयात मोहित यांचं शिक्षण झालं व जम्मू मध्येच ते मोठे झाले.

 

 

२. कुणाल खेमू

खूप जणांना हे माहीत नसेल पण कुणाल खेमू हे ही एक ‘काश्मिरी पंडित’ आहेत. यांचा जन्म २५ मे १९८३ साली एका काश्मिरी ब्राह्मण परिवारात झाला. कुणाल वडिलांचे नाव रवी खेमू आहे आणि आईचे नाव ज्योती खेमू आहे. कुणालचा जन्म जम्मू मध्ये झाला आणि नंतर ते परिवाराबरोबर मुंबईत आले.

 

 

३. एम. के. रैना

गंगुबाई काठीयावडी, रब ने बना दी जोडी व तारे जमीन पर सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले एम. के. रैना (महाराज कृष्ण रैना) एक काश्मिरी पंडित आहेत. त्यांचा जन्म २४ जुलै १९४८ साली श्रीनगर इथे झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा च्या १९७०च्या बॅचचे ते आहेत.

 

 

४. किरण कुमार

एक असा बॉलीवूड अभिनेता जो अनेक वर्ष सातत्याने बॉलीवूडमध्ये काम करत आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९६० च्या दशकात लव इन शिमला या सिनेमाने केली. किरण कुमार यांचं काश्मिरी पंडितांशी जवळचं नातं आहे कारण त्यांचे वडील जीवन कुमार हे काश्मीरमधून मुंबईत आले होते.

 

 

५. राज कुमार

अभिनेते राजकुमार हे एक काश्मिरी पंडित आहेत आणि त्यांचं खरं नाव कुलभूषण पंडित आहे. राजकुमार यांचा जन्म एका काश्मिरी पंडित परिवारात लोरालई (पाकिस्तान) इथे झाला.

 

 

६. जीवन

खलनायकांचे सरताज अभिनेते जीवन यांचं खरं नाव ओंकार नाथ धर आहे. यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१५ साली एका काश्मीरी पंडित परिवारात झाला. त्यांच्याबद्दल असं म्हणतात की काश्मीरहून मुंबईला ते फक्त २६ रुपये घेऊन पळून आले होते. अभिनेते किरण कुमार हे जीवन यांचे पुत्र आहेत.

 

७. संजय सूरी

अभिनेते संजय सूरीदेखील एक काश्मिरी पंडित आहेत. १९९० साली काश्मिरी पंडितांनी जे नाईलाजाने पलायन केले त्यात संजय सूरी यांचा परिवार देखील सामील होता. खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की ३२ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांना एका दहशतवादी हल्ल्यात गोळी घालून मारलं होतं.

 

 

एवढं सगळं या अभिनेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडूनसुद्धा ते आज बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहेत आणि छान आयुष्य जगत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version