' तुमच्या हॉस्पिटल बिलात जबरदस्त कपात करू शकतात जेनेरिक औषधं; जाणून घ्या – InMarathi

तुमच्या हॉस्पिटल बिलात जबरदस्त कपात करू शकतात जेनेरिक औषधं; जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार,

डॉक्टर्स जर रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यायला लागले तर विकसित देशांमध्ये आरोग्य खर्च  ७०%  ने आणि विकसनशील देशांमध्ये त्याहूनही कमी होऊ शकतो.

जेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या तुलनेत १० ते १२ टक्केच विकली जातात. जेनेरिक औषधांमुळे मिळणारा कमी नफा आणि कमिशन यांमुळे औषध कंपन्या, मेडिकल स्टोर आणि डॉक्टर यांपैकी कोणालाच जेनेरिक औषधांची मागणी वाढावी असे वाटत नाही.

आज बाजारात जवळपास सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी असून गरीब माणूस देखील सहज ही औषधे विकत घेऊ शकतो.

अनेकवेळा काही डॉक्टर्स, स्वतःहून जेनेरिक औषधे लिहून देतात. उदाहरण द्यायचं झालं तर, क्रोसिन या गोळीतील मूळ औषधी घटक पॅरासिटेमॉल हा असतो. म्हणून डॉक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये पॅरासिटेमॉल असं लिहून देतील.

 

Generic-Medicine-marathipizza01

 

जेनेरिक औषधे कशाला म्हणतात?

जेनेरिक औषधांना ‘इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन’ देखील म्हटले जाते, ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधांसारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘एसेंशियल ड्रग’ लिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात.

 

generic-medicine-inmarathi

 

ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे  जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.

एखाद्या आजाराच्या उपचारासाठी रिसर्च आणि स्टडी केल्यानंतर एक रसायन (साल्ट) बनवले जाते. जे सहजरीत्या उपलब्ध करण्यासाठी त्यांना औषधांचे रूप दिले जाते. ह्या औषधांना प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या नावाने विकते.

काही कंपन्या महाग किंमतीत विकतात तर काही कंपन्या स्वस्त दरात विकतात.

जेनेरिक औषधे स्वस्त का असतात?

ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. पण या कंपन्या जेनेरिक औषधांची किंमत कशीही ठरवू शकत नाही. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते.

तुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्यामधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात. महाग औषधे आणि त्याच साल्ट मधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी पाच ते दहा पट अंतर असते.

काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये ९०% फरक असतो.

 

generic medicine inmarathi

हे ही वाचा – औषधांविना शांत झोप लागावी असं वाटत असेल तर हे ५ पदार्थ तुम्हाला हमखास मदत करतील

जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते.

सर्वात मोठे कारण हे आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या या औषधांची जाहिरात करत नाहीत. त्यामुळे ह्या औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात.

अर्थात, कुठल्याही जेनेरिक औषधाला परवानगी मिळण्यासाठी  त्याची योग्य गुणवत्ता सिद्ध होणे गरजेचे असते. याला शास्त्रीय भाषेत Bioequivalence असे म्हटले जाते. इतर देशांच्या तुलनेत याविषयीचे कायदे भारतात शिथिल आहेत.

जेनेरिक औषधे स्वस्त मिळत असली, तरीही त्याची गुणवत्ता मात्र कंपनीच्या नीतिमत्तेवर अवलंबून आहे, असे भारतात पाहायला मिळू शकते.

या आजारांची जेनेरिक औषधे स्वस्त असतात-

काहीवेळा डॉक्टर फक्त साल्टचे नाव लिहून देतात, तर कधी कधी फक्त ब्रँडेड औषधांचे नाव लिहून देतात. काही खास आजार आहेत ज्यांची जेनेरिक औषधे उपलब्ध असतात परंतु त्याच साल्टची ब्रँडेड औषधे महाग असतात.

जसे – न्युरोलोजी, युरीन, हार्ट डिजीस, किडनी, डायबिटीज, बर्न प्रोब्लेम, या आजारांच्या जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमध्ये खूप जास्त अंतर दिसून येते. एकाच स्लाटच्या दोन औषधांच्या किंमतीमधील मोठा फरकच जेनेरिक औषधांचा पुरावा आहे.

 

generic-medicine1-inmarathi

 

जेनेरिक औषधे कशी प्राप्त करू शकता?

जेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोर्सवर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा.

तसेच ही औषधे Healthkart Plus आणि Pharma Jan Samadhan यांसारख्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही सहज स्वस्तात मिळवू शकता.

 

Generic-Medicine-marathipizza03

 

जेनेरिक औषधे न मिळण्यामागची मुख्य समस्या

डॉक्टर्सनी जेनेरिक औषधे लिहून दिली असतील तरी सुद्धा मेडिकल स्टोर्स रुग्णाला दुसऱ्या महागड्या कंपनीची औषधे देतात. ही चलाखी करताना ते रुग्णाला हे कारण सांगतात की त्यांच्याकडे लिहून दिलेली औषधे नाही आहेत.

हे सर्व करून त्यांना केवळ फायदा मिळवायचा असतो.

कित्येकवेळा डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतात आणि ती मेडिकल स्टोर्स मध्ये मिळतात सुद्धा, परंतु त्या औषधांमध्ये कंपोजिशन आणि साल्ट त्या प्रमाणात नसते ज्या प्रमाणात ते असायला पाहिजे, त्यामुळे रुग्णाला त्या औषधांचा पूर्णपणे लाभ मिळत नाही.

यासाठी सरकारने कायदा करून त्याचा सक्तीने पालन करण्यास डॉक्टरांना सांगितले पाहिजे म्हणजे डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतील आणि मेडिकल स्टोर्सवाले काही कारण न सांगता ती औषधे लोकांना सहज उपलब्ध करून देतील.

 

medical-store-inmarathi

 

===

हे ही वाचा – जगातील सर्वात महागडं औषध! वाचा किंमत आणि त्यामागचं कारण…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?