Site icon InMarathi

गेल्या आर्थिक वर्षावर एक नजर आणि त्याविषयी नीरज बोरगांवकर यांची खास टिप्पणी!

neeraj borgaonkar featured IM 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

दिनांक – २८ मार्च २०२२

निफ्टी 17222.00 (69.00)
सेन्सेक्स 57593.49 (231.29)
बँकनिफ्टी 35710.50 (300.40)
डॉलर 76.16

Nifty High low – 17,003.90 – 17,235.10

 

 

निफ्टीमधील टॉप गेनर्स – BHARTIARTL COALINDIA AXISBANK EICHERMOT ICICIBANK

निफ्टीमधील टॉप लूझर्स – UPL SBILIFE NESTLEIND HDFC HDFCLIFE

2021-2022 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत आहे. या निमित्ताने आज आपण या आर्थिक वर्षामधील शेअर मार्केटचा एक आढावा घेणार आहोत. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 एप्रिल 2021 रोजी आपला निफ्टी निर्देशांक सुमारे 14800 च्या पातळीवर ट्रेड करीत होता. वर्षाचे पहिले सात महिने बाजारामध्ये प्रचंड मोठी तेजी बघायला मिळाली.

या कालावधीमध्ये निफ्टी 18600 च्या उच्चांकापर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यानंतर बाजारामध्ये थोडेसे प्रॉफिट बूकिंग सुरु झाले आणि बाजार 15600 या पातळीपर्यंत घसरला आणि आता पुन्हा थोडासा वर जाऊ लागलेला दिसत आहे.

या सर्व वर्षामध्ये बर्‍याच शेअर्सनी गुंतवणूकदारांना अतिशय जबरदस्त असे रिटर्न्स दिलेले दिसून येतात. उदाहरणार्थ हिंदाल्कोच्या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षामध्ये सुमारे 93% परतावा दिला. बजाज फिनसर्व्ह या कंपनीच्या शेअरने सुमारे 73% परतावा दिला.

ओएनजीसी, टाटास्टील, टायटन, जेएसडब्ल्यु स्टील, सनफार्मा, टेक महिंद्रा या निफ्टीमधील कंपन्यांनी पन्नास ते साठ टक्क्यांहून अधिक रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिलेले दिसून येत आहे.

 

 

वरील सर्व कंपन्या या लार्ज कॅप श्रेणीमध्ये येतात. म्हणजेच अश्या कंपन्यांमध्ये धोक्याचे प्रमाण अतिशय कमी असते असे आपण म्हणू शकतो.

इतर श्रेणींमधील कंपन्यांनी (मिड कॅप, स्मॉल कॅप इत्यादी) तर गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केल्याचे दिसून येते. जसे टीटीएमएल या कंपनीचा गेल्या वर्षामधील परतावा सुमारे 1084% दिसत आहे. म्हणजे या वर्षाच्या सुरुवातील कोणी टीटीएमएल या कंपनीमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे अकरा ते बारा लाख झालेले दिसत आहे.

या व्यतिरिक्त फ्लुरोकेम, बीएसई, ट्रायडेंट, जेएसडब्ल्यु एनर्जी, टाटा एलेक्सी, केपीआयटी टेक्नॉलोजी, केपीआर मिल्स, हिकल, जीएनएफसी अश्या असंख्य शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे डबल किंवा ट्रिपल केल्याचे दिसून येत आहे.

(वरील सर्व माहिती इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध असून एनएसई व बीएसईच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही ही माहिती बघू शकता)

एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून आपण जेव्हा एखाद्या बॅंकेमध्ये मुदत ठेवींसारखी गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला वार्षिक 5% ते 6% इतकाच परतावा मिळत असतो जो परतावा महागाईवरदेखील मात करु शकत नाही.

आपण शेअर बाजाराकडे निश्चितपणे वळले पाहिजे. कारण हा एकमेव पर्याय असा आहे ज्यामध्ये महागाईवर मात करुन आपली संपती दीर्घकाळामध्ये वाढविण्याची क्षमता आहे.

शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करणे धोक्याचे वाटत असल्यास आपण म्युच्युअल फंड्स या पर्यायाचादेखील विचार करु शकतो. गेल्या आर्थिक वर्षामध्ये अनेक म्युच्युअल फंडांनीदेखील अतिशय उत्तम अशी कामगिरी दाखवून दिलेली आहे.

 

 

उदाहरणार्थ BOI AXA Small Cap Fund ने गेल्या वर्षभरामध्ये 47% परतावा दिलेला आहे. तसेच Axis Small Cap Fund ने गेल्या वर्षभरामध्ये 45% परतावा दिलेला आहे. PGIM India Midcap Fund चा गेल्या वर्षाचा परतावा 40% आहे. म्युच्युअल फंडांमध्ये तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत.

गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती नियमितरित्या मिळवण्यासाठी आपला Neeraj Borgaonkar हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करुन ठेवा

नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनलची लिंक – https://marathimarket.in/youtube

अजून एक महत्वाचे

शेअर बाजारामध्ये “इंट्राडे ट्रेडिंग” करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे.

पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल – https://marathimarket.in/free-trial

 

 

फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल. हे करीत असताना काही शंका आली तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.

“गुंतवणूक कट्टा” हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणार एक उपक्रम असून यामध्ये एक “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.

या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री ९ वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल.

वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.

रजिस्ट्रेशन लिंक – https://www.guntavnook.com/webinar

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version