Site icon InMarathi

काश्मिरी पंडितच नव्हे, तर अनेक तमिळ कुटुंब या कारणामुळे सोडत आहेत श्रीलंका

refugee im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“सारे जहा से अच्छा, हिंदोस्ता हमारा” हे आता फक्त एक गाणं राहिलं नसून एक वसुस्थिती झाली आहे. ज्या लोकसंख्येमुळे एकेकाळी भारत देश हा आर्थिक संघर्ष करत होता आज त्याच लोकसंख्येने भारताला एक ‘ग्लोबल मार्केट’ बनवलं आहे.

भारताच्या शेजारचे श्रीलंका, पाकिस्तान सारख्या देशांची आपण जेव्हा आर्थिक परिस्थिती बघतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, ज्याप्रकारे लोकसंख्येचा उपयोग हा मार्केटची परिस्थिती सुधारण्यासाठी भारतात होत आहे तसा तो कुठेच होत नाहीये. परिणामी, श्रीलंका सारखे देश हे आज आर्थिक अडचणीत सापडल्याचं आपण बघत आहोत.

 

 

श्रीलंकेत सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, नोकऱ्या कमी झाल्या आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत, नवीन उद्योजकांनी श्रीलंकेकडे पाठ फिरवली आहे ही वस्तुस्थितीआहे. श्रीलंकेतील जाफना शहरात राहणारे दोन कुटुंब मध्यंतरी समुद्रमार्गे रामेश्वरम येथे दाखल झाले आणि त्यांनी श्रीलंकेतील आर्थिक महासंकटाची दाहकता त्यांनी सांगितली.

 

 

श्रीलंकेतील आर्थिक संकट हा विषय भारतात तेव्हापासून अधिकच गांभीर्याने घेतला जात आहे. कोण आहेत हे लोक ? त्यांच्यासोबत श्रीलंकेत काय घडलं ? त्यांना आपला देश सोडून पळून जावंसं का वाटलं असावं ? हे जाणून घेऊयात.

कोरोनाच्या वैश्विक महामारी नंतर ज्याप्रकारे भारत देश सावरला आहे तसं श्रीलंकेला ते जमलंच नाही. श्रीलंकेतील जाफना शहरातील गजेंद्रन हा २४ वर्षीय कामगार जेव्हा नोकरी गेल्याने आपली २३ वर्षीय पत्नी मेरी क्लेरीनला घेऊन भारतात निघून येतो त्यावरून आपण श्रीलंकेतील सद्यस्थितीचा अंदाज लावू शकतो.

श्रीलंकेतील जाफनाहून तलाईमन्नार मार्गे रामेश्वरमला पोहोचण्यासाठी लागणारे प्रत्येकी १०,००० रूपये सुद्धा गजेंद्रनने आपल्या नातेवाईकांकडून मागून आणले होते असं त्याने चौकशी करणाऱ्या पोलिसांना सांगितलं.

 

 

गजेंद्रन आणि मेरी यांच्यासोबत त्यांचं चार महिन्याचं बाळ सुद्धा आहे. हे सर्वच २४ तासांपूर्वी जेवले होते. “रामेश्वरमला जा, तिथे तुम्हाला कोणीतरी मदत करेल” इतक्या आशेवर केवळ हे लोक त्या आंतरराष्ट्रीय बोटीत बसले होते.

जन्माने श्रीलंकेचे नागरिक असलेला हा परिवार जेव्हा भारतात नोकरी करण्यासाठी अशा अवैध मार्गाने आले तेव्हा भारतीय जलसंरक्षक अधिकारी सुद्धा स्तब्ध झाले होते की यांना अवैध मार्गाने, विना पासपोर्ट आल्याने शिक्षा करावी की माणुसकीच्या नात्याने यांची मदत करावी ?

‘देवरी’ नावाची एक अजून २८ वर्षीय महिला सुद्धा आपल्या ९ वर्षाच्या ‘एस्थर’ आणि ६ वर्षाच्या ‘मोसेस’ या दोन मुलांना घेऊन याच बोटीतून २२ मार्च रोजी भारतात दाखल झाली आहे. देवरीने सुद्धा पोलिसांना दिलेल्या माहितीत हेच सांगितलं की, “श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती ही सध्या खूप भयानक आहे. काम करूनही खाण्यासाठी पुरेसं अन्न उपलब्ध होत नाहीये. मला काम करण्याची इच्छा होती पण दोन मुलांना पुरेल इतकं अन्न मिळत नव्हतं, म्हणून मी भारतात काही नातेवाईकांच्या भरवश्यावर भारतात निघून आलो आहोत.”

 

 

भारतीय जलसंरक्षक खात्याने पत्रकार परिषद घेऊन याबाबत ही माहिती जाहीर केली आहे, “सहा श्रीलंकन नागरिक भारतात जलमार्गाने दाखल झाले आहेत. यामध्ये दोन महिला आहेत, एक पुरुष, दोन लहान मुलं आहे आणि एक बाळ आहे. मंडोपन या दक्षिण भारतातील बेटावर त्यांना पकडण्यात आलं आहे. २१ मार्च २०२२ रोजी रात्री १०.३० वाजता श्रीलंकेहून निघून हे लोक मंगळवारी सकाळी ८.३० वाजता भारतात पोहोचले आहेत. पुढील चौकशी, कारवाई आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करत आहोत.”

तामिळनाडू राज्यात आजवर एकूण १६ श्रीलंकन नागरिक दाखल झाल्याचं जलखात्याने जाहीर केलेल्या माहितीत निष्पन्न झालं आहे. श्रीलंकेत सध्या दुध, पेट्रोल, डिझेल सारख्या अत्यावश्यक वस्तूंची कमतरता झाली आहे. इतकंच नाही तर, शाळांनी परीक्षा घेणं रद्द केलं आहे कारण, त्यांच्याकडे परीक्षांच्या प्रश्नपत्रिका छापण्याइतके सुद्धा पैसे नाहीयेत.

 

१९८० मध्ये अशीच परिस्थिती श्रीलंकेत उदभवली होती जेव्हा तिथून नागरिकांनी पलायन करणं पसंत केलं होतं. २०२२ ची परिस्थिती ही जास्त विदारक आहे. जवळपास ६०,००० श्रीलंकन नागरिकांनी देश सोडल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. एकट्या तामिळनाडू मध्ये १०७ कॅम्प मध्ये सध्या ३०,००० श्रीलंकन राहत आहेत. कधी आणि कसं होणार यांचं पुनर्वसन ? उत्तर कोणाकडेच नाहीये.

 

 

श्रीलंका देश हा जागतिक बँकेकडून एक मोठं आर्थिक कर्ज घेऊन आपली आर्थिक परिस्थिती बदलेलही. पण, त्यामुळे देशाला लोकांचा विश्वास परत कमवता येईल का ? हा एक मोठा प्रश्न आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version