' डकवर्थ लुईस नियम आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो याबाबत तुम्हाला नक्कीच ठाऊक नसणार – InMarathi

डकवर्थ लुईस नियम आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो याबाबत तुम्हाला नक्कीच ठाऊक नसणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्याच्या घडीला क्रिकेट हा खेळ भारताबरोबरच जगातील कित्येक देशांमध्ये लोकप्रिय झाला आहे. क्रिकेटप्रेमींना या खेळाबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे,

परंतु आजकाल क्रिकेट जगतात बराच चर्चेत असणारा विषय म्हणजे डकवर्थ लुईस नियम अजूनही अनेकांना बुचकळ्यात पाडतो. हाच डकवर्थ लुईस नियम आज आम्ही समजावून सांगत आहोत.

अनेकदा पावसामुळे क्रिकेटच्या सामन्यामध्ये व्यत्यय येतो. आताच पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कित्येक सामन्यांमध्ये पावसामुळे व्यत्यय आला.

पावसामुळे व्यत्यय येणाऱ्या एकदिवसीय आणि T-२० सामन्यांमध्ये निर्णय मिळवण्यासाठी जो नियम वापरला जातो त्याला डकवर्थ लुईस नियम म्हटले जाते.

डकवर्थ लुईस नियमाचे जनक

डकवर्थ लुईस नियमाचा शोध संख्या विशेषतज्ञ फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांनी लावला होता, त्यांच्याच नावावर या नियमाला डकवर्थ लुईस असे नाव पडले.

duckworth-lewis-marathipizza01kaieteurnewsonline.com
kaieteurnewsonline.com

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा डकवर्थ लुईस नियमाचा वापर १९९६-९७ मध्ये झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांदरम्यान झालेल्या सामन्यात करण्यात आला होता.

या सामन्यात झिम्बाब्वे संघ डकवर्थ लुईस नियमानुसार ७ धावाने जिंकला होता. आयसीसी कडून १९९९ मध्ये पावसामुळे व्यत्यय येणाऱ्या एकदिवसीय सामन्यात लक्ष्य निश्चित करण्यासाठी डकवर्थ लुईस या नियमाला मान्यता देण्यात आली होती.

नोव्हेंबर २०१४ मध्ये फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांच्या सेवानिवृत्तीनंतर स्टीव स्टर्नला डकवर्थ लुईस नियमाचा संरक्षक बनवण्यात आले आणि या नियमाचे नाव बदलून डकवर्थ लुईस स्टर्न ठेवण्यात आले.

 

duckworth-lewis-marathipizza02
sportskeeda.com

 

डकवर्थ लुईस स्टर्न नियम वापर करण्याची पद्धत

डकवर्थ लुईस स्टर्न नियमानुसार क्रिकेट खेळणाऱ्या दोन्ही संघांकडे अधिकाधिक धावा बनवण्यासाठी दोन साधने (Resources) उपलब्ध असतात- एकूण उरलेल्या ओवर आणि बाकी उरलेले विकेट.

सामन्याच्या कोणत्याही वळणावर संघाला तारून नेण्याची क्षमता याच दोन साधनांवर अवलंबून असते, या आधारावर फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांनी एक यादी बनवली आहे.

ज्यामुळे हे समजते की, सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाकडे किती टक्के साधने उपलब्ध आहेत.

duckworth-lewis-marathipizza07
jagranjosh.com

 

या यादीकडे पाहून हे स्पष्ट होते की, डाव सुरु होण्याच्या वेळी जेव्हा पूर्ण ५० ओवर आणि १० विकेट बाकी असतात तेव्हा धावा बनवण्याचे साधन १०० टक्के हातात असते.

यानंतर संघ जसजसे आपल्या ओवर वापरत जातात आणि जसजसे त्यांचे विकेट बाद होत जातात, तसतशी त्यांची साधने सुद्धा त्या हिशोबाने कमी कमी होत जातात.

आपण एक उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

समजा जर एखादा संघ सामन्यातील २० ओवर खेळला आहे आणि त्यांच्याकडे ३० ओवर बाकी आहेत, सोबत त्यांचे २ विकेटसुद्धा पडले आहेत, तर अश्या स्थितीमध्ये त्या संघाच्या हातामध्ये ६७.७ टक्के साधने आहेत.

या स्थितीमध्ये असताना अचानक पाउस पडला आणि परत सामना सुरु होईपर्यंत १० ओवरांचा वेळ वाया गेला.

म्हणजे आता त्या संघाकडे फक्त २० ओवर बाकी राहतात आणि २ विकेट पडले आहेत तर नियमाच्या यादीनुसार या स्थितीमध्ये त्या संघाच्या हातात ५२.४ टक्के साधने आहेत.

वरील उदाहरणात जेव्हा पाऊस सुरु झाला होता, तेव्हा ६७.३ टक्के साधने हातात होती आणि जेव्हा सामना परत सुरु झाला तेव्हा त्यांच्याकडे ५२.२ टक्के साधने उरली होती.

अर्थात संघाला ६७.३ – ५२.४ = १४.९ टक्के साधनांचे नुकसान झाले. संघाला पूर्ण १०० टक्के साधने वापरायला मिळायला हवी होती. ज्यामधील १४.२ टक्के साधने वाया गेली, त्यामुळे या संघाने १०० – १४.२ =८५.८ टक्के साधने वापरली.

 

duckworth-lewis-marathipizza03
wikipedia.org

अश्या पेचाच्या स्थितीमध्ये दोन्ही संघाबरोबर न्याय तर झालाच पाहिजे. यासाठी  दोन्ही संघाना योग्य त्या साधनांचा वापर करायला देणे गरजेचे आहे.

म्हणूनच पावसाने जर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळात व्यत्यय आणला तर वरील नियमानुसार दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या विरुद्ध संघांच्या लक्ष्यात (Target) वाढ केली जाते आणि जर पावसाने दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला व्यत्यय आणला तर त्यांच्या लक्ष्यात घट केली जाते.

हे देखील आपण उदाहरणाने समजावून घेऊ.

उदाहरण १:  जर पावसाने दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळात व्यत्यय आणला आणि सामना पुढे झाला नाही तर-

समजा पहिल्या संघाने ५० ओवर मध्ये ३०० धावा केल्या आहेत आणि दुसऱ्या संघाने पाऊस येईपर्यंत ४० ओवर मध्ये ५ विकेट गमावून २५० धावा केल्या आहेत आणि यानंतर पावसामुळे सामना थांबवला, तर यावेळी डकवर्थ लुईस स्टर्न नियम वापरण्यात येतो.

त्यामधून सामन्याचा निर्णय देण्यात येतो. पहिल्या संघाने पूर्ण ५० ओवर खेळल्याने त्यांनी आपल्या साधनांचा १०० टक्के वापर केला आहे आणि दुसऱ्या संघाने २५० धावा ४० ओवरला केल्या आहेत व त्यांचे ५ विकेट सुद्धा गेले आहेत.

त्यांच्याकडे डावाच्या सुरवातीला १०० टक्के साधन होते परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे ते पुढील १० ओवर खेळू शकले नाहीत त्यामुळे त्यांना २६.१ टक्के साधनांचे नुकसान झाले. म्हणजे त्यांनी १०० – २६.१ = ७३.९ टक्के साधनांचा वापर केला.

याचा अर्थ दुसऱ्या संघाला पहिल्या संघापेक्षा कमी साधने वापरण्यास मिळाले त्यामुळे त्यांच्या लक्ष्यामध्ये त्यांना मिळालेल्या साधनांच्या अनुरूप घट करावी लागेल. म्हणजे त्यांचे लक्ष ३०० x ७३.९/१०० = २२१.७  धावा असेल.

यावरून दुसऱ्या संघाला २२२ धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या, पण  त्यांनी अगोदरच २५० धावा केल्या आहेत त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ २८ धावा अधिक करून ५ विकेट राखून हा सामना जिंकेल.

duckworth-lewis-marathipizza04
livemint.com

उदाहरण २ : जर पावसाने पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला व्यत्यय आणला तर-

समजा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४० ओवरमध्ये २०० धावा केल्या आहेत आणि त्यांचे ७ विकेट पडले आहेत आणि यावेळी पावसाने व्यत्यय आणल्याने वेळेचे नुकसान झाले आणि त्यांचा डाव तिथेच समाप्त करण्यात आला.

तर अशावेळी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळण्यासाठी ४० ओवरच दिल्या जातात परंतु त्यांचे लक्ष्य नवीन असते.

डकवर्थ लुईसच्या हिशोबाने जेव्हा पहिल्या संघाचा डाव संपला तेव्हा त्यांच्याकडे १७.९ टक्के साधने उरली होती. १०० – १७.९ = ८२.१ म्हणजे त्यांनी एकूण ८२.१ साधनांचा वापर केला.

आता दुसऱ्या संघाला देखील ४० ओवर खेळण्यासाठी मिळणार परंतु त्यांना सुद्धा पहिल्या संघाप्रमाणे  ५० ओवर खेळण्यास मिळायला पाहिजे होत्या, म्हणजे त्यांचे सुद्धा १० ओवरचे नुकसान झाले आहे.

डकवर्थ लुईस यादीनुसार दुसऱ्या संघाकडे ४० ओवर बाकी आहेत आणि त्यांनी एकही विकेट गमावला नाही आहे म्हणजे त्यांच्याकडे ८९.३ टक्के साधने शिल्लक आहेत.

याचा अर्थ त्यांच्याकडे पहिल्या संघापेक्षा ८९.३ – ८२.१= ७.२ टक्के जास्त साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष ७.२ टक्क्याने वाढवावे लागणार. आयसीसीच्या नवीन नियमानुसार ५० ओवरच्या एकदिवसीय सामन्याची सरासरी धावसंख्या २२५ असते.

याचा अर्थ शेवटी दुसऱ्या संघाला सामना जिंकण्यासाठी आता ४० ओवर मध्ये २०० + २२५ चे ७.२ टक्के म्हणजेच २०० + १६.२ = २१६.२ = २१७ धावा बनवणे गरजेचे आहे.

duckworth-lewis-marathipizza05
wikipedia.org

 

अश्या या डकवर्थ लुईस स्टर्न नियमाच्या काहीश्या डोक्यावरून जाणाऱ्या गणितामुळे बऱ्याच वेळा जिंकत असलेली टीम हरली आहे, तर हरत असलेली टीम जिंकली देखील आहे. त्यामुळे बऱ्याचदा या नियमाबद्दल क्रिकेट वर्तुळात नाराजी नाट्य देखील रंगलेलं आहे.

 

 

duckworth-lewis-marathipizza06
espncricinfo.com

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?