‘आईच्या दुधाचा’ वापर दागिन्यात करून ही कंपनी कमावतेय करोडो रुपये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आई होणे ही जगातली सगळ्यात सुंदर आणि नितळ भावना आहे आई आणि लेकरा मध्ये असलेले भावनिक संबंध अगदी सुरुवातीपासून शब्दात वर्णन करणे कठीणच असते . आई आपल्या बाळाला दुध पाजते तेव्हा तीच त्याची भुकेची भावना समजून घेऊ शकते अशा कितीतरी माता आहेत ज्या आपले दूध जतन करता येण्याचे मार्ग आणि आठवण जपण्याची साधने शोधत असतात आणि आता ते उपलब्ध ही आहेत . ब्रेस्ट मिल्की ज्वेलरी हा देखील असाच एक नवनीत मार्ग आहे..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आपल्या घरात लहान मुल येणार या नुसत्या बातमीने घरातील आई-वडील व कुटुंबातील इतर सदस्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरतो आई-वडिलांना आपल्या मुलाची प्रत्येक आठवण जपून ठेवायची असते मुलाचे पहिले पाऊल असो की त्याचा पहिला हसणं काही काही पालक तर आपल्या मुलाचे पहिल्या रडणे देखील रेकॉर्ड करून ठेवतात..
आपल्याला हे माहीत आहे का की ज्या महिलांचे दूध स्तनपान करून उरते त्या दुधाचे दागिने देखील बनवता येतात. विश्वास नाही बसत ना? पण हे अगदी शंभर टक्के खरे आहे बऱ्याच लोकांनी पहिल्यांदाच या दुधाच्या दागिन्यां बद्दल ऐकले असेल.मॅजेन्टा फ्लॉवर्स या युके मधील कंपनीचे संस्थापक सोफिया आणि ऍडम रियाज ही जोडी स्तन दुधाचे दागिने बनविण्याचे काम करते .
त्यांचा हा व्यवसाय अतिशय भरभराटीला येत आहे. काही लोकांना हे हसण्यासारखे वाटत असले तरी आईचे दुधा पासून बनवण्यात येणारे दागिने व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध होत आहे आज-काल ब्रेस्ट मिल्क ज्वेलरीचे वाढत आहे सफिया आणि रियाज यांनी यशस्वी रीतीने ब्रेस्ट मिल्क ज्वेलरीचे कलेचे व्यवसायात रूपांतर आहे २०१९ मध्ये स्थापित झालेल्या फ्लॉवर्स या कंपनीने आतापर्यंत जगभरात चार हजाराहून जास्त ऑर्डर्स पूर्ण केले आहेत २०२३ पर्यंत कंपनी £1.5 दशलक्षचा व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे.
- मूल ‘जन्माला’ घालण्यासाठी स्त्रीची गरज लागणार नाही…विज्ञानाचा चमत्कार?
- योग्य फिटिंगची ‘ब्रा’ कशी घ्याल? मोजमाप करण्याची योग्य पद्धत बघा
–
स्वत: तीन मुलांची आई असलेल्या सफियाला आई म्हणून स्तनपान करताना किती आनंद होतो हे माहित होते परंतु जेव्हा मूल स्तनपान करणे सोडून देते तेव्हा बऱ्याच मातांना याचा त्रास होऊ शकतो. मूल आणि आई दरम्यान असलेला भावनिक संबंध जपण्यासाठी म्हणून त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली.
मॅजेन्टा फ्लॉवर्स कडून ‘ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी’वर आईच्या दुधाचा रंग टिकून राहावा यासाठी सतत संशोधन होत आहे. सरतेशेवटी सफियाने एक तांत्रिक उपाय शोधून काढला ज्यामध्ये द्रव कोरडे करणे आणि उच्च-गुणवत्तेच्या नॉन-यलोइंग इपॉक्सीमध्ये मिसळणे समाविष्ट होते जेणेकरून दागिने वर्षानुवर्षे टिकून राहतील.
सफिया म्हणाल्या की, दागिने हे स्तनपानाच्या अनुभवाच्या आनंददायी आणि आव्हानात्मक दोन्ही भागांचे जतन आणि सन्मान करण्याचे साधन आहे, ज्यामुळे मातांना त्यांचे मातृत्व प्रवास वर्णन दाखवता येते . त्यांनी बनवलेले दागिने वर्षानुवर्षे आपल्या अस्सल रंगात आणि जसे च्या तसे राहतील असा कंपनीचा दावा आहे.
साफिया सांगते की, अनेक महिलांप्रमाणे ती स्वतःही आपल्या मुलांना जास्त काळ स्तनपान करू शकली नाही. यामुळे त्या मातांच्या समस्या तिला चांगल्या प्रकारे समजून घेता येतात . आईचे दूध जपून ठेवता येते याबद्दल तिला माहीत नव्हते, असे माहीती असते तर तिने तो क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी आईच्या दुधापासून दागिने बनवले असते.
मॅजेंटा फ्लॉवर्स आईच्या दुधापासून हार, कानातले, मोहिनी आणि अंगठ्या बनवतात. जेव्हा एखादा ग्राहक दागिने बनवण्याची ऑर्डर देतो तेव्हा साफिया त्यांना किमान ३०मिली आईचे दूध पाठवण्याचा सल्ला देते. प्रत्येक दागिना हा सर्वात खास तयार करण्यासाठी कंपनी विशेष प्रयत्न करते . हे मुलाच्या नावासह किंवा कोणत्याही रत्नासह असू शकते. ग्राहकांचे मत समजून घेऊनच कंपनी दागिन्यांची निर्मिती करत असते .
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.