आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रुपेरी पडद्यावर काही जोड्या अमर आहेत. अलिकडील काळातील शाहरुख-काजोल असोत, की मागच्या जमान्यातले अमिताभ-रेखा किंवा त्याही आधीचेधर्मेंद्र- हेमा. मात्र धर्मेंद्रची हेमासोबत रिल आणि रियल जोडी लोकप्रिय होण्यापूर्वी धर्मेंद्रचं नाव आणखीन एका प्रख्यात अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं.
या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होतीच, मात्र यांच्या ऑफ़स्क्रिन केमिस्ट्रीच्या चर्चांनीही रंग आणला होता. धर्मेंद्र चित्रपट सृष्टीत आला तोच मुळी लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न साकार करायला.
लहानपणापासून त्याला चित्रपटात हिरो बनायचं होतं. एका टॅलेंट हंटींग शोमधून त्याची निवड झाली आणि हा पंजाब दा पुत्तर मुंबापुरीत नशीब आजमावयला आला. दिसायला देखणा आणि माचोमॅन असणारा धरम चित्रपटात नशीब अजमावयला आला खरा पण इथे प्रवेश मिळणं आणि टिकाव धरणं सोपं नव्हतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पहिल्या चित्रपटाला म्हणावं तसं यश न मिळाल्यानं धरम नावाचा नवोदित आला आहे याची फ़ारशी दखलही घेतली गेली नाही. नंतर त्याचा परिचय तो जिचा जबरी फ़ॅन होता अशा अभिनेत्रीशी झाला. कवीमनाची, हळवी, मृदू हळव्या सौंदर्यांचं मूर्तीमंत प्रतिक, टॉपवर असूनही व्यक्तिगत आयुष्यात एकाकी अशी ही अभिनेत्री देखण्या धरमकडे आकृष्ट झाली.
—
- सनी धावून आला नसता तर धर्मेंद्रची अॅडल्ट फिल्म बीग स्क्रीनवर झळकली असती
- “बेशरम मी तुझ्या बायकोला ओळखते..” असं म्हणत तनुजाने धर्मेंद्रच्या कानाखाली मारली!
—
धरमही नरम दिल का बंदा होता. तिचं एकाकीपण त्याच्या नुसत्या असण्यानं संपलं होतं. ही अभिनेत्री होती मीना कुमारी. पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असणारी मीना कुमारी, प्रसिध्दीच्या सतत झोतात वावरणारी मीनाकुमारी व्यक्तिगत आयुष्यात मात्र प्रचंड एकाकी होती. आपल्या माणसाच्या शोधात असणारी मीनाकुमारी तिच्यावर प्रेम करणार्या प्रत्येकाला सर आंखो पर बसवत होती.
खर्या अर्थानं प्रेमाची भुकेली असणारी ही शायरा शेवटपर्यंत खर्या प्रेमापासून वंचित राहिली. तिच्या आयुष्यात अनेकदा प्रेम येऊन गेलं मात्र ते चिरकाल स्थिरावलं नाही ही मीनाकुमारी या सौंदर्याची शोकांतिकाच म्हणली पाहिजे.
धरमेंद्र तिच्या आयुष्यात आला आणि हे एकाकीपण काही काळापुरतं का होईना नाहिसं झालं. चित्रपटात फ़ारसं यश न मिळविलेल्या धर्मेंद्रची शिफ़ारस तिनं चालू केली आणि धर्मेंद्रची अडखळत चालणारी गाडी सुसाट सुटली.
जोवर चित्रपट मिळत नव्हते तोवर धर्मेंद्र मीनाकुमारी सोबत होता मात्र जसं त्यानं यश पहायला सुरवात केली त्यानं ही साथ सोडली आणि मीनाकुमारीच्या आयुष्यात पुन्हा एकदा एकाकीपणा आला.
मीनाकुमारीच्या चाहत्यांनी धर्मेंद्रला खूप शिव्या शाप दिले, मात्र धर्मेंद्र आपल्या मतावर तेंव्हाही ठाम होता आणि आजही आहे. त्याचं मीनाकुमारीवरचं प्रेम त्यानं कधीच नाकारलं नाही, मात्र ते प्रेम प्रियकराचं प्रेयसीवर असलेलं नव्हतं तर एका निस्सीम चाहत्याचं त्याच्या आवडत्या अभिनेत्रीवर असणारं होतं. या प्रेमाचा शाप केवळ मीना कुमारीलाच भोवला असं नाही तर धर्मेंद्रलाही याचा फ़टका बसला.
पाकिजाची जुळवाजुळव चालू झाली. मुख्य भूमिकेत मीनाकुमारी होती आणि नायक म्हणून धर्मेंद्रचा विचार चालला होता. मात्र त्यांच्या या प्रेमप्रकरणाच्या चर्चेमुळेच मीनाकुमारीवर प्रेम करणार्या कमाल अमरोहीनी धर्मेंद्रला डच्चू देऊन त्याच्या राजकुमारला घेतलं.
राजकुमारनं ही भूमिका अजरामर करून टाकली आणि भारतीय चित्रपट इतिहासाचा महत्वाचा भाग असणार्या चित्रपटाचा एक भाग बनण्याची संधी धर्मेंद्रच्या हातातून गेली. आज पाकिजा म्हणलं, की मीनाकुमारीच्या बरोबरीनं राजकुमारच आठवतो, त्याची या भूमिकेसाठीची निवड इतकी चपखल होती की त्याच्याजागी धर्मेंद्रची कल्पनाही करवत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.