Site icon InMarathi

३२,००० मुलींची तस्करी आणि धर्मपरिवर्तनाचं भयावह वास्तव ‘केरळ स्टोरी’मधून येणार समोर!

the kerala story featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, आजच्या प्रेक्षकाला सत्यकथा बघण्यात, सत्यघटना जाणून घेण्यात जास्त रस आहे. बॉलीवूड सिनेमा हा आता केवळ एखाद्या उद्यानात झाडांभोवती गाणं म्हणत फिरणाऱ्या नायक-नायिकांचा राहिलेला नाहीये.

मनोरंजनाचे असंख्य माध्यम असल्याने आजचा प्रेक्षक स्मार्ट झाला आहे. “विषय पटला तरच मी ट्रेलर, सिनेमा बघेन, नाही तर माझ्याकडे वेळ नाहीये” हे प्रत्येकाच्या मनात अगदी क्लिअर असतं.

अशाच प्रगल्भ प्रेक्षकांसाठी ‘द केरला स्टोरी’ हा एक धगधगतं सत्य मांडणारा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

 

 

विपुल अमृतलाल शाह यांनी या विषयावर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्याचं धाडस केलं आहे. सुदीप्तो सेन यांच्या दिगदर्शनात तयार होणाऱ्या या सिनेमात मागच्या दहा वर्षात केरळ मधून गायब झालेल्या ३२,००० मुलींचं सत्य जगासमोर येणार आहे.

२२ मार्चला निर्माता विपुल शाह यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे एक मिनिटाचा टिझर् लाँच केला ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काश्मीरमध्ये घडलेल्या नरसंहाराची कथा मोठ्या पडद्यावर बघितल्यानंतर प्रेक्षकांना आता आयसिस या अतिरेकी संघटनेच्या केरळ मधील छुप्या कारवायांची माहिती ‘द केरला स्टोरी’ या सिनेमात बघायला मिळणार आहे.

केरळ मधील मुलींचं अपहरण करणे, त्यांना सक्तीने धर्मपरिवर्तन करायला लावणे, सक्तीने त्यांचं लग्न लावून देणे हे भयानक सत्य इतके वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडियाला कधीच ‘ब्रेकिंग न्यूज’ वाटलं नाही यावर सध्या आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

 

केरळ, आंध्रप्रदेश येथील ‘चंदन तस्करी’ बद्दल इतक्या वर्षात ऐकून आहोत, त्यावर कित्येक सिनेमे बनले आहेत. पण, त्याच केरळ मधून होणारी ‘मनुष्य तस्करी’ हा विषय कोणत्याच कथाकार, निर्मात्याला इतक्या वर्षात ‘इंटरेस्टिंग’ वाटला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल.

१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतात एखाद्या व्यक्तीच्या जीवापेक्षा मौल्यवान वस्तूंचं महत्व, आकर्षण अधिक आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

केरळ म्हंटलं की, नेहमीच तिथला सुंदर निसर्ग, तिथे होणाऱ्या बोटिंगच्या स्पर्धा, बोट हाऊस वगैरे गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण, आयसिस सारख्या संघटनांना केरळचं सौंदर्य बघवलं नाही.

केरळ हे एक ‘मुस्लिम राज्य’ म्हणून घोषित व्हावं या मनसुब्याने त्यांनी मुलींचं अपहरण करण्याच्या कारवाया सुरु केल्याचं नेहमीच बोललं जातं.

विपुल शाह यांनी पत्रकारांसोबत सिनेमाबद्दल बोलतांना असं सांगितलं आहे की, “केरळ मधील मुलींच्या अस्तित्वाची ही संघर्षगाथा बघून सर्वांचेच डोळे पाणावतील. लेखक, दिगदर्श सुदीप्तो सेन यांनी ४ वर्ष या विषयावर संशोधन करून ही कथा लिहिली आहे. जेव्हा मी ही कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हाच मला अश्रू अनावर झाले होते. तेव्हाच मी या विषयावर सिनेमा करण्याचं ठरवलं. आमचा हा प्रामाणिक प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल अशी आम्ही आशा करत आहोत.”

 

‘द केरला स्टोरी’ बद्दल बोलतांना लेखक, दिगदर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या, “२००९ पासून केरळ, मँगलोर येथून ३२००० मुलींचं अपहरण करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं जात आहे. अफगाणिस्तान आणि सीरिया येथील आयसिस या अतिरेकी संघटनेचे प्रतिनधी या कारवाया घडवून आणतात असं आमच्या संशोधनात समोर आलं आहे.

आम्ही जेव्हा या भागांमध्ये फिरलो तेव्हा आम्हाला कित्येक आईंनी त्यांचं दुःख सांगितलं. सकाळी घरातून काम करण्यासाठी गेलेली मुलगी रात्री जेव्हा घरी येत नाही तेव्हा एका आईच्या काय भावना असतील हे आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

‘द केरला स्टोरी’च्या टिझर् मध्ये २००६ ते २०११ या काळात केरळचे मुख्यमंत्री राहिलेले कम्युनिस्ट पक्षाचे व्ही.एस.अच्युतानंदन यांच्या एका मुलाखतीचा अंश दाखवण्यात आला आहे.

 

 

या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, “केरळला एक मुस्लिम राज्य करण्यासाठी ‘द पॉप्युलर फ्रंट’ हे सतत प्रयत्न करत आहेत. पुढील २० वर्षात परिस्थिती बदलली नाही तर हे लोक त्यांच्या मनसुब्यात यशस्वी होतील अशी आम्हाला भीती वाटत आहे. केरळ मधील ३२००० महिलांना आयसिस संघटनांना विकल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.”

विपुल शाह यांनी ‘द केरला स्टोरी’च्या आधी नुकतीच ‘ह्युमन’ नावाच्या एक संवेदनशील वेबसिरीजची निर्मिती केली होती ज्याचं समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. विपुल शाह यांच्या पत्नी शेफाली शाह यांनी या सिरीजमध्ये प्रमुख भूमिका केली होती.

 

 

‘द केरला स्टोरी’ मधून प्रेक्षकांना भारतात घडत असलेल्या अजून एका अन्यायाबद्दल माहिती मिळेल.

अशा कथा मनोरंजन, महितीसोबतच प्रेक्षकांना सतर्क देखील करत असतात आणि म्हणूनच त्या आजच्या प्रेक्षकाला आवडतात असं समीक्षकांचं मत आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version