' जेव्हा M.S धोनी CSK साठी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळला होता – InMarathi

जेव्हा M.S धोनी CSK साठी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उद्या परवापासून IPL चा नवा हंगाम चालू होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्येक फ्रेंचायझीने आपल्यासाठी खेळाडू निवडले आहेत. या हंगामात नवीन गुजरात आणि लखनऊ हे नवीन संघ सामील झाले आहेत. प्रत्येक संघाने त्यांची संघनिवड केल्यानंतर मोठा प्रश्न होता तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बऱ्याच संघांनी त्यांचे जुने कर्णधार रिटेन करून ठेवले होते. ज्यामध्ये मुंबईचा रोहित शर्मा, हैद्राबादचा केन विल्यम्सन, दिल्लीचा रिषभ पंत, राजस्थानचा संजू सॅमसन आणि चेन्नईचा एम.एस. धोनी यांचा समावेश होता.

 

ipl inmarathi

 

काल धोनीने अचानकपणे चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवली. २००७ साली धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा व्यवस्थितपणे हाताळली. यात संघाला अनेक विजय मिळवून दिले. २०१४ ला कसोटी आणि २०१६ ला टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून देखील धोनीने कर्णधारपद सोडले.

 

ravindra jadeja inmarathi
county.com

त्यानंतर तो सतत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतासाठी खेळत होता. यंदाच्या IPL च्या हंगामात तो रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. पण २००७ पासून ही पहिली वेळ नाही जेव्हा धोनी दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळत असेल. याआधी धोनी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळलेला आहे.

 

dhoni ipl captain inmarathi

IPL च्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नईचा कर्णधार होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने चेन्नईला चारवेळा IPL च विजेतेपद मिळवून दिल. या प्रवासात त्याचा सर्वात भरवसाचा साथी होता सुरेश रैना. काही घटना खूप कमी वेळा घडतात. अशीच एक घटना म्हणजे धोनीने सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळणे.

२०१२ साली चॅम्पियन लीगच्या एका सामन्यात धोनीने कर्णधारपद रैनाकडे सोपवली आणि स्वतः फक्त एक खेळाडूच्या भूमिकेत खेळला. या सामन्यात त्याने यष्टीरक्षणाची जबाबदारी सुद्धा वृद्धिमान सहाकडे सोपवली होती. चेन्नई संघासाठी हा सामना इतका महत्त्वाचा नव्हता आणि म्हणूनच यॉर्कशायर विरुद्ध धोनीने कर्णधारपदाची धुरा रैनाकडे सोपवली. हा सामना आफ्रिकेतील डर्बनच्या मैदानात झाला होता. तसेच कर्णधारपदापासून काही दिवस विश्रांती हवी म्हणून देखील त्याने पद सुरेश रैनाकडे सोपवले होते असे ही बोलले गेले होते.

 

suresh raina IM

 

या सामन्यात यॉर्कशायरने १४०/६ केल्या होत्या. धोनीने या सामन्यात २३ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. चेन्नईच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या सुब्रमण्यम बद्रीनाथ याने ३८ चेंडूत केलेल्या ४७ धवांच्या खेळीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले आणि चेन्नईचा या सामन्यात विजय झाला होता.

ज्या धोनीमुळे लोक csk संघाची मॅच बघायचे तेच लोक आता धोनी कर्णधारपदी नाही म्हणून बघतील का ही शंका आहेच, धोनीने टीम इंडियाच्या कप्तानपदावरून राजीनामा दिला होता तेव्हा देखील त्याचे चाहते नाराज झाले होते, त्यामुळे आता रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली काय कमाल करतो हे आपण बघुयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?