Site icon InMarathi

कश्मिर फाईल्स मधले ७ सीन्स सेन्सॉरने हटवले, नाहीतर वाद आणखीन चिघळला असता!

the kashmir files uncut scenes featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१९९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात कट्टरपंथीय आतंकवाद्यांकडून काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला. यावरील चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ जेव्हापासून रिलीज झाला आहे, तेव्हापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे.

हा चित्रपट आता लोकांच्या भावनेचा विषय बनला आहे. या चित्रपटाला घेऊन आता पुन्हा एकदा एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

 

 

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे कुठलेही सीन कट न करता, याला रिलीज करण्याची परवानगी दिल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांचेही यांवर असलेले ट्विट व्हायरल झाले आहे.

यात त्यांनी लिहिले आहे की, चित्रपटामध्ये एकही कट असल्याचे आढळून येत नाही. तसेच विवेक अग्निहोत्री सेन्सॉर बोर्डात असल्याचेही आरोप त्यांनी केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

साकेत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सेन्सॉर बोर्डाच्या काही फाईल्स बघत होतो. त्यात एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. सेंसर बोर्ड ने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला कोणतेही कट न करता सेन्सॉर प्रमाणपत्र दिले आहे. याचबरोबर अजुन एक गोष्ट म्हणजे हा चित्रपट बनवणारा विवेक अग्निहोत्री हा CBFC बोर्डाचा सदस्य आहे.”

या ट्विटला विवेक अग्निहोत्रीने यांनीदेखील ट्वीटच्या माध्यमातून साकेत गोखले यांना उत्तर दिले आहे.

 

● विवेक अग्निहोत्री यांचे प्रतिउत्तर :-

गोखले यांच्या ट्वीटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. या लेखात असे सांगण्यात आले आहे की, द काश्मीर फाइल्स ७ कटसह रिलीज करण्यात आली आहे. विवेकने यासोबत लिहिले की, ‘कृपया नेहमीप्रमाणे फेक न्यूज पसरवणे थांबवा, निदान मरण पावलेल्या लोकांचा तरी आदर करा.’

 

 

तरीही लोकांमध्ये सुरु चर्चा आहे की, चित्रपटात खरच एकही सीन कापला गेला नाही का? किंवा जर सीन कट केले गेले आहे तर ते सीन्स कुठले होते?

● चला तर जाणून घेऊया कट केलेल्या त्या ७ सीन विषयी :-

१) एका दृश्यात भारताचा ध्वज जमिनीवर पडतांना दिसत आहे. या सीनला चित्रपटातून कट करण्यात आले आहे.

२) दहशतवादी म्होरक्या बिट्टा कराटेच्या घराच्या भिंतीवर भारताच्या माजी पंतप्रधानांचे चित्र टांगले दिसत होते. या सीनला देखील चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

 

 

३) चित्रपटात झी टीव्हीचा लोगो अनेक ठिकाणी दिसत होता. याला ही काढण्यात आले.

४) काही सीन हे विद्यापीठाच्या आतमधील होते, ज्यामध्ये मुलांनी हातात घेतलेल्या बॅनरवर बलात्कार आणि रेप हे शब्द शब्द लिहिले होते. तसेच विद्यापीठाच्या अनेक भिंतीवरही हा शब्द दिसत होता. ज्या-ज्याठिकाणी हे शब्द दिसत होते, तिथे ते ब्लर म्हणजेच धूसर करण्यात आले.

५) चित्रपटात दाखवलेल्या विद्यापीठाचे नाव जेएनयु आहे परंतु त्याचे नाव बदलून ANU करण्यात आले.

 

 

६) चित्रपटात एका ठिकाणी डिस्को सीएम लिहिले आहे, ते काढून टाकण्यात आले आहे.

७) चित्रपटातील ज्या ज्या भागात ‘पंडित’ आणि ‘हिंदू’ या शब्दांकरीता अपशब्द वापरले गेले होते ते सर्व भाग काढून टाकण्यात आले आहेत.

याचबरोबर या फ़िल्मला एडल्ट सर्टिफिकेट देण्यात आले आहे . म्हणजे हे चित्रपट बघण्याकरीता कमीत कमी वयाची १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.

ही फिल्म बॉक्स ऑफिस वर अजुनही कमाल करत आहे. या चित्रपटाने २०० कोटीचा आंकड़ाही पार केला आहे. कोणत्याही प्रमोशनशिवाय एवढ्या कमी कालावधीत एवढी मोठी कमाई करणारा हा बहुदा पहिलाच सिनेमा आहे. येणाऱ्या काळात तो राजामौली यांच्या RRR वरसुद्धा भारी पडणार का? ते येणारा काळच ठरवेल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version