Site icon InMarathi

जाणून घ्या जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कसे निवडले जातात राष्ट्रपती?

president-election-marathipizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

राष्ट्रपती म्हणजे देशातील सर्वोच्च नागरिक. भलेही आपल्या देशात राष्ट्रपतीचे कामकाज कागदावर सह्या करण्यापर्यंत मर्यादित आहे, परंतु आपल्या राजकारणात राष्ट्रपतींच्या निवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे झालं आपल्या देशाचं… तुम्हाला काय वाटतं, इतर दुसऱ्या देशांमध्येही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला इतकेच महत्त्व दिले जात असेल का? कश्या पार पडत असतील तिकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका? चला आज याचं प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

१. रशिया

latimesblogs.latimes.com

रशिया मध्ये मागील राष्ट्रपती निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. या देशात पूर्वी दर चार वर्षांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असे, आता हा कालावधी वाढवून सहा वर्षांचा करण्यात आला आहे. येथे राष्ट्रपती निवडणूक दोन राऊंड्स मध्ये होते. जर पहिल्या राऊंड मध्ये कोणत्याही उमेदवाराला बहुमत मिळाले नाही तर सर्वात जास्त वोट मिळणाऱ्या उमेदवारांमध्ये निवडणूक होते.

 

२. फ्रांस

news.sky.com

फ्रांस मध्ये सुद्धा राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया रशियासारखीच असते. इथे राष्ट्रपतीला सरळ देशाचे नागरिक निवडतात. आपल्या आवडत्या उमेदवाराच्या चिठ्ठीमागे x लिहून वोट केले जाते. जर कोणत्याही उमेदवाराला पूर्ण बहुमत न मिळाल्यास सर्वात जास्त वोट मिळालेल्या दोन उमेदवारांमध्ये परत निवडणूक होते. फ्रांसमध्ये ह्याच वर्षी एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या आहेत, ज्यामध्ये इमॅनुअल मॅक्रॉन हे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.

 

३. पाकिस्तान

csmonitor.com

भारताचा शेजारी असलेल्या या देशामध्येही राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया जवळपास भारतासारखीच आहे. इथेही राष्ट्रपती Indirect Election द्वारे निवडला जातो. यासाठी संसदच्या दोन्ही सदनाचे सदस्य आणि राज्यांच्या विधानसभेचे सदस्य आपले मत देतात.

 

४. इराक

wikipedia.org

इराकचे राष्ट्रपती म्हटलं की सगळ्यात पहिले सद्दाम हुसैनचे नाव तोंडावर येते. अमेरीकेबरोबर झालेल्या भीषण युद्धाचा मार सहन केलेल्या इराकचे विद्यमान राष्ट्रपती फवाद मासूम आहेत. येथे सदस्यांच्या २:३ मतांच्या  समीकरणाने बहुमतात असलेल्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून निवड केली जाते.

 

५. नेपाळ

नेपाळ २००८ मध्ये प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यात आले. राम बरन यादव नेपाळचे पहिले राष्ट्रपती होते. या देशाला प्रजासत्ताक होऊन अजून १० वर्षसुद्धा पूर्ण झालेली नाहीत आणि नेपाळ पहिली महिला राष्ट्रपती लाभली आहे. सध्या विद्या देवी भंडारी नेपाळच्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतीची निवडणूक नेपाळमध्ये भारतासारखीच होते, म्हणजे यामध्ये संसदेचे सदस्य आणि राज्यांच्या विधानसभेचे सदस्य भाग घेतात.

 

६. दक्षिण आफ्रिका

africanexaminer.com

दक्षिण आफ्रिकेमध्ये राष्ट्रपतीची निवड संसदेच्या कनिष्ठ सदनाचे सदस्य करतात. १९९४ मध्ये पहिल्यांदा वर्णद्वेष न ठेवता राष्ट्रपती निवडणूक झाली होती. तेव्हापासून अनेकवेळा देशातील सर्वात मोठी पार्टी अफ्रीकन नॅशनल काँग्रेसचे नेतेच राष्ट्रपती होत आहेत. ही निवडणूक मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थिती मध्ये होते. १९९४ मध्ये नवीन संविधान लागू झाल्यानंतर नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती बनले होते. दक्षिण आफ्रिकेचे सध्याचे राष्ट्रपती जॅकब जुमा आहेत.

 

७. इजिप्त

pressall.wordpress.com

इजिप्तने मागील काही वर्षांपासून कित्येकवेळा राजकीय संकटांचा सामना केला आहे. २००७ सालपासून इथे राष्ट्रपती सरळ नागरिकांद्वारे दिलेल्या मताने निवडले जातात .ह्या अगोदर ही निवडणूक दोन भागांमध्ये होत असे.पहिल्या भागात संसदेच्या कनिष्ठ सदनातील सदस्य राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांचे नामांकन करत होते. त्यांना सदनातील २:३ या नियमाने बहुमत मिळवणे गरजेचे होते. त्यानंतर दुसऱ्या भागात जनमताचा कौल घेतला जात असे.

हे देखील वाचा : (अमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते? सोप्या उदाहरणाने समजून घ्या)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version